AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूनंतर माझं….; वाढदिवशी मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Manoj Jarange Patil Birthday : वाढदिवशी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. वाढदिवसानिमित्त मनोज जरांगे समर्थकांनी जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मोठी गर्दी केली आहे. उपस्थितांना मनोज जरांगेंनी संबोधित केलं. तेव्हा त्यांनी मृत्यूनंतर काय करावं याबाबतची मोठी घोषणा केली आहे.

मृत्यूनंतर माझं....; वाढदिवशी मनोज जरांगेंची मोठी घोषणा
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 01, 2024 | 3:46 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अंतरवालीमध्ये मोठी गर्दी झाली आहे. वाढदिवसानिमित्त येणाऱ्या नागरिकांकडून जरांगे पाटील शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत. खोबऱ्याच्या हाराद्वारे शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. यावेळी जरांगेंनी मोठी घोषणा केली आहे. वाढदिवस हा आनंदाचा दिवस आहे. पण आज मी सांगतो की, मृत्यनंतर मी माझं देहदान करणार आहे, असं जरांगे म्हणाले. त्यांचं हे विधान चर्चेत आहे. आज जरांगेंना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून मराठा बांधव अंतरवली सराटीत येत आहेत.

मनोज जरांगेंचं विधान नेमकं काय?

आज वाढदिवसानिमित्त उपस्थितांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मृत्यूनंतरच्या देहदानावर मनोज जरांगे बोलले आहेत. मृत्यनंतर मी माझं देहदान करणार आहे. माझ्या मृत्यूनंतर शरिरातील अवयव कुणाच्या तरी कामी आले पाहिजेत. आपले शरीर कुणाच्या तरी कामी आले पाहिजे. माझं शरीर हे मी आजच समाजला दान करत आहे. माझं आयुष्य समाजाला दिलंच आहे. आता शरीर पण दान करत आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

जरांगेंना शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांची गर्दी

मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. आज एक ऑगस्टला त्यांचा वाढदिवस असतो. त्यानिमित्त आज रात्री बारा वाजल्यापासून जरांगे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. यावेळी आतिषबाजी ‘डोल ताशे वाजवत जरांगे पाटील यांना शुभेच्छा देत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचा आज वाढदिवस असल्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज येत आहे आणि जरांगे पाटील यांना शुभेच्छा देत आहे. जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. मराठा समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आणि उत्स्फुर्तपणे या ठिकाणी रक्तदान केलं जात आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.