AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुळखुळ्या तुला… मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना लक्ष्मण हाके यांची घसरली जीभ

Laxman Hake Criticized Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासंदर्भातील काही मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील 30 मेपासून आमरण उपोषण करणार आहे. त्यापूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली. आता त्यावरून राजकारण तापले आहे. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर जहरी टीका केली आहे.

खुळखुळ्या तुला... मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना लक्ष्मण हाके यांची घसरली जीभ
लक्ष्मण हाके, मनोज जरांगे पाटील Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 23, 2026 | 1:56 PM
Share

रामू दखने, टीव्ही ९, प्रतिनिधी: मराठा आरक्षणाबाबतच्या काही मागण्या सरकारने अद्यापही पूर्ण न केल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. 30 मे रोजी ते आमरण उपोषण करणार आहे. तर सरकारने त्यांच्याशी चर्चेला सुरूवात केल्याचे दिसले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. जरांगेंच्या मागण्या सरकार दरबारी पोहचवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या घाडमोडीनंतर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी विरोधाचा (Laxman Hake Criticized Manoj Jarange Patil) सूर आळवला आहे. त्यांनी खालच्या भाषेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

खुळखुळ्या तुला…

जरांगे, खुळखुळ्या तुला अक्कल नावाचा प्रकार नाही अशी जहरी टीका प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचा खुळखुळ्या म्हणून उल्लेख केला आहे. जरांगे पाटलाकडे जस्टीज येऊन गेले. सचिव येऊन गेले, मुख्यमंत्री येऊन गेले. तरी त्याला फरक पडला नाही आणि तो हॉटेल चालवणारा, झाडूपोछा करणारा जाऊन तिथे फरक पडत असतो का? अशी टीका त्यांनी लाड आणि जरांगे भेटीनंतर केली आहे.

प्रसाद लाड यांच्यावर घणाघाती टीका

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावरही टीका केली. आमदार प्रसाद लाड यांना एक लाख लोकांना रोजगार दिल्याबद्दल शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला असा चिमटा त्यांनी काढला. हॉटेल चालवणारा, झाडूपोछा करणारा माणूस मनोज जरांगेना भेटू फरक पडत असतो का? अशी टीका लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर केली.

ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आम्ही ग्रामीण भागात सभा घेत आहोत. आपल्याला बजेट भेटत नाही. मात्र जरांगेंनी आंदोलन जाहीर केलं की त्यांना साडेसातशे कोटीची घोषणा होते. ओबीसींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून दुजाभाव होत आहे. जातगणना व्हावी या मागणीसाठी आम्ही शंभर सभा घेत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रसाद लाड-मनोज जरांगे भेटीवर टीका

प्रसाद लाड यांनी हॉटेल चालवावं. राजकारणाचा फायदा घेऊन अजून अंबानीच्या पुढे जावं. आरक्षण, जरांगे पाटील यांची मागणी यातील प्रसाद लाड यांना काडीची अक्कल आहे का? असा सवाल त्यांनी केला. तर ज्या पक्षाच्या जीवावर ते बेडकासारख्या उड्या मारतायेत, त्या पक्षाला विचारा माधव काय आहे, अशी बोचरी टीका हाके यांनी केली. भट बामणाच्या पार्टीला वाडी वस्तीवर कोण घेऊन गेले हे विचारा असे हाके म्हणाले. तर मराठा समाजाच्या मागण्यासाठी राजीनामा देण्याचे वक्तव्य काल प्रसाद लाड यांनी केले होते. त्यावर हाके यांनी पहिल्यांदा त्यांनी राजीनामा द्यावा, नंतर त्यांना काय जातीचं काम करायचे ते करावा. त्यांना ओबीसीच्या अन्नात माती कालवायची आहे. ओबीसींच्या मतावर भाजपा सत्तेवर आली आहे, अशी टीका प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केली.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ