AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : दादांचे मुक्के घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, लय चांगले काम केलंय त्यांनी; चंद्रकांत पाटील यांना मनोज जरांगेंचा भीमटोला

Manoj Jarange attack on Chandrakant Patil : मनोज जरांगे पाटील यांनी भाजपविरोधात मोर्चा उघ़डला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात त्यांनी पुन्हा एकदा रोष व्यक्त केला आहे. तर चंद्रकांत दादा पाटील यांच्या त्या वक्तव्याचा पण समाचार घेतला आहे, ज्यात त्यांनी आमचं काय चुकलं? असा सवाल केला होता.

Manoj Jarange : दादांचे मुक्के घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, लय चांगले काम केलंय त्यांनी; चंद्रकांत पाटील यांना मनोज जरांगेंचा भीमटोला
मनोज जरांगे पाटील चंद्रकांतदादा पाटील
| Updated on: Oct 27, 2024 | 2:32 PM
Share

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मराठा फॅक्टर किती प्रभावी ठरतो हे समोर येईलच. पण सध्या मनोज जरांगे पाटील यांनी भाजपविरोधात, विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर आता अनेक मुद्यांवर एकमेकांवर थेट हल्ले होते आहे. आमचं काय चुकलं ते मनोजदादांनी एकदा सांगावं, असं वक्तव्य चंद्रकांत दादांनी केलं होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर पण हल्लाबोल केला.

दादांचे मुक्के घ्यायला पाहिजे सगळ्यांनी…

चंद्रकांत दादा पाटलांचे काही चुकलं नाही. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. शेतकर्‍यांच्या मालाला भाव दिला. शेतकर्‍याला आत्महत्या करायला लावल्या, मराठ्यांना आत्महत्या कराराला लावल्या, दहा वर्षांपूर्वीच त्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले. म्हाडाचे घरकुल गरीबांना द्यायचे ते त्यांनीच घेतले. खूप चांगले काम केले आहेत त्यांनी. मराठ्यांना आरक्षण न देता ओबीसींना दिलं हे चांगलं काम केलं. परत मराठ्यांना SCBC आरक्षण देऊन EWS मध्ये घातलं छान काम आहे. दादांचे मुक्के घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, लय चांगले काम केले आहे त्यांनी. मराठ्याच्या पोरावर केसेस केल्यात, महिलांना बंदुकीने ठोकलं, गोळ्या घातल्या काय चांगलं काम केलं. देव माणूस आहे दादा, शेंदूर लावायला पाहिजे कोणी फक्त दादाला शेंडी ठेवली पाहिजे उघडी, अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

कसला हरियाणा पॅटर्न?

करणार आहेत ते पॅटर्न, छान काम करणार आहेत, सगळे पाडून घेणार आहेत, पुरे. देवेंद्र फडणीस यांचे रक्त कळत नाही कुणाचं आहे.सकाळी सकाळी म्हणतात मी हिंदू आहे. दुपारी म्हणतात मी OBC चा DNA, तिसर्‍या प्रहरी म्हणतात पुरोगामी रक्त आहे. भाजपानं, आरएसएसनं संपवलं सगळं, असे ते म्हणाले.

सगळेच मराठ्यांना विचारायला लागले

मराठा समाज एकत्र झाल्याने सगळ्याच पक्ष्यातील येत आहेत. रात्री दोन वाजले की, भाजपाचे सुद्धा असतात दिवसा सुद्धा येतात भाजप मधले तिकीट हुकलेले ते तर जाहीर आहेत आता .देवेंद्र फडणवीस यांनी फसवल्यामुळे सगळा मराठा समाज चिडलेला आहे. आम्ही ताकदीने बलाढ्य होतो. मात्र आम्हाला गिणतीत घेतले नव्हते. आता गोरगरीब मराठ्यांच्या चपलांसकट पाया पडत आहेत. आज सगळे नेते मराठ्यांना विचारायला लागले ही चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

फडणवीस भाजप संपवणार

देवेंद्र फडणवीस घरात बसून गणित मांडतात. म्हणून वाटतं हा माणूस खूप छान आहे असं थोडी ढेरी मोठी आहे. नंतर भाजपच्या लोकांना वाटतं हे काय लफडं झालं म्हणून सांगतो हे आरएसएस संपवायला लागला हे भाजप संपवायला लागला. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे या राज्यातील भाजप संपेल दुसरे कोणामुळे नाही, असे जरांगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर बसून जमत नसतं. आम्ही आरक्षण मागीतलं. आम्हाला दिलं नाही, आमच्या डोळ्यात देखत ओबीसींना दिलं. फडणवीस हे मस्तीत जगणारा माणूस आहे, त्यांनी मराठ्याला खुन्नस दिली आता मराठा तुम्हाला जुमानत, मानत नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.