“मनोज जरांगे हा मराठा आणि भाजपमधला काटा, फडणवीसांना आता सुट्टी नाही”

मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं, मात्र सत्ता गेल्यावर आरक्षण कसं रद्द झालं? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. रास्ता रोको आंदोलन शांततेत केलं तर मराठा समाजातील पोरांवर गुन्हे करण्याचे आदेश फडणवाीसांनी दिल्याचा आरोप जरांगे यांनी केला.

मनोज जरांगे हा मराठा आणि भाजपमधला काटा, फडणवीसांना आता सुट्टी नाही
manoj jarange patil and devendra fadnavis Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 25, 2024 | 7:39 PM

जालना | मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे अंतरवाली येथून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. यादरम्यान जरांगे हे भांबेरी गावात थांबले आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.  फडणवीस यांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचलं असून त्यांच्यासाठी मी काटा ठरत आहे म्हणून त्यांना मला मारायचा असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

देवेंद्र फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते, नारायण राणे आणि छगन भुजबळ यांना पुढे केलं आहे. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात आहे. कायदा सुव्यवस्था बिघाडली नाही पाहिजे याची काळजी न्यायालयाने नाहीतर राज्य सरकारने घेतली पाहिजे. भाजला सत्ता आणण्यासाठी मराठा समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मी काटा ठरत आहे त्यामुळे मला त्यांना मारायचं आहे. मलाही बघायचंय की देवेंद्र फडणवीसांमध्ये किती दम आहे. मराठ्यांना जे ७५ वर्षात मिळालं नाही ते या पोराने मिळवून दिलं, दिलेलं १० टक्के आरक्षण दिलं ते मान्य केलं नाही, सगेसोयऱ्यांचाी अंमलबजावणी मागणी केली. माझ्यावर कोणते गुन्हे आहेत का सर्व पाहिलं पण काहीच मिळालं नाही. त्यामुळे मला संपवणं हाच फडणवीसांचा डाव असल्याचं म्हटलं आहे.

भांबेरापासून मला एकटयाला जाऊ द्या तुम्ही माघारी फिरा. मला दहा टक्के आरक्षण मान्य करायला लावलं पण मी नाही केलं. बरं केलं तर तुम्ही आमचे सगेसोयऱ्यांवर अंमलबजावणी करा मीसुदधा उपोषण करता नाही, असं जरांगे म्हणाले. मनोज जरांगे दुपारी अंतरवाली येथून निघून आले होते. आता ते भांबरा या गावामध्ये थांबले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी चांगले-चांगले नेते गप केले. भाजपच नाहीतर सर्व पक्षातील मराठा नेत्यांनी नीट झक मारावी. कोणता पक्ष म्हणून नाहीतर एक मराठा म्हणून बोला, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.