मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया काय?

Maratha Reservation | "सगळा मराठा कुणबीच आहे. मुंबईला गेल्यामुळे फसवणूक झालेली नाही. अंमलबजावणीत फसवणूक झालीय असं तुम्ही म्हणू शकता. सगळ्या मुलींना मोफत शिक्षण एक रुपयाही द्यावा लागणार नाही. कुणीही गोड बोलून मराठ्यांना माघारी पाठवलेलं नाही"

मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया काय?
Manoj jarange Patil
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 1:23 PM

Maratha Reservation (संजय सरोदे) | “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे काही गोष्टी स्पष्ट झाल्या. जे मराठे लढले, त्यांच्यासाठी हा मागासवर्गीय अहवाल आला. जो अध्यादेश काढला आहे, त्यासाठी सगे-सोयरे कायदा अंमलबजावणी करावीच लागेल. ज्यांना कुणबीमध्ये आरक्षण नकोय, त्यांनी ते आरक्षण घ्यावे. जे नाही म्हणतात त्यांनी पुरावे दाबून ठेवले आहेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “सग्या-सोयऱ्याची अंमलबजावणी करावी लागेल. नाही, तर आम्ही कोणालाच सोडणार नाही. 20 तारखेपर्यंत काही करून अध्यादेशाची अंमलबजावणी करा. हैदराबाद गॅझेट घ्या. सग्या सोयऱ्यासाठी समितीला एक वर्ष वाढवून द्यावे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “20 तारखेपर्यंतच्या उपोषणानंतर सरकारने सरकारचे बघावे, मराठा मराठ्यांचे बघेल” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

‘छगन भुजबळांना कामच काय? त्यांना नाव ठेवण्याच काम’ अशी टीका जरांगे पाटील यांनी केली. आरक्षण, सग्या-सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांना करावीच लागेल. मराठ्यांना वेगळ आरक्षण म्हणजे 50 टक्क्याची मर्यादा ओलांडावीच लागेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

कशात फसवणूक झालीय, असं जरांगे पाटील म्हणाले?

“सगळा मराठा कुणबीच आहे. मुंबईला गेल्यामुळे फसवणूक झालेली नाही. अंमलबजावणीत फसवणूक झालीय असं तुम्ही म्हणू शकता. सगळ्या मुलींना मोफत शिक्षण एक रुपयाही द्यावा लागणार नाही. कुणीही गोड बोलून मराठ्यांना माघारी पाठवलेलं नाही. समाजाच आणि माझ अतूट नात झालय. समाजामुळे मी वैद्यकीय उपचार घेतले” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांना फसवलं, तर नव्याने लढाई उभारेन, असं त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.