15 ते 18 वयोगटातील मुलेच भरपूर फिरणारी, लसीकरणाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

जालनाः संपूर्ण राज्यात आणि देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. राज्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या हस्ते जालन्यातून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. राजेश टोपे यांनी स्वतः जालन्यातील रुग्णालयात उपस्थित राहून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा नेटाने सामना करायचा असेल तर लसीकरणाशिवाय दुसरे अस्त्र नाही. […]

15 ते 18 वयोगटातील मुलेच भरपूर फिरणारी, लसीकरणाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
आरोग्यमंत्री राजेश टोपे
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 11:24 AM

जालनाः संपूर्ण राज्यात आणि देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. राज्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या हस्ते जालन्यातून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. राजेश टोपे यांनी स्वतः जालन्यातील रुग्णालयात उपस्थित राहून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा नेटाने सामना करायचा असेल तर लसीकरणाशिवाय दुसरे अस्त्र नाही. तसेच 15 ते 18 या वयातील मुलेच जास्त फिरणारी असतात, त्यामुळे त्यांच्या लसीकरणावर सर्वच आरोग्यकर्मचारी आणि पालकांनी भर द्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

काय म्हणाले राजेश टोपे?

जालन्यात किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘ संपूर्ण राज्यात आणि देशात लसीकरण सुरू झालं आहे. माझ्यासमोर आठ दहा जणांचं लसीकरण केलं आहे. ही मुलं खूप उत्साही दिसून येत आहेत. त्यांची नोंदणी आधी केली आहे. केंद्र सरकारने जी गाईडलाईन दिली आहे, त्यानुसार स्वतंत्र नोंदणी आणि व्यवस्था केली आहे. पोस्ट लसीकरण नंतरचे ऑब्झर्व्हेशन याची व्यवस्थाही केली आहे. करोनाला थांबवण्यासाठी त्याचा फायदा होईल. 15 ते 18 वयोगट हा खूप फिरणारा ग्रुप असतो. या ग्रुपमध्ये लसीकरणाची गरज होती. आता या मोहिमेला सुरुवात झाली असून जास्तीत जास्त मुलांनी, पालकांनी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

जालन्यातून मोहिमेला सुरुवात

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जालन्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे जालना येथील महिला व बालरुग्णालयातून किशोरवयीनांच्या लसीकरणाला आज 3 जानेवारीपासून सुरुवात झाली. राजेश टोपे यांनी स्वतः या रुग्णालयात हजेरी लावली. त्यांच्यासमोर 8 ते 10 मुलांचे लसीकरण करण्यात आले. टोपे यांनी या मुलांची विचारपूस केली. तसेच राज्यात सर्वच ठिकाणी मुलांचे लसीकरण आणि त्यानंतर ऑब्झर्वेशनसाठीची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील 7.40 कोटी मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

सोमवारपासून सुरु करण्यात आलेल्या किशोरवयीनांच्या लसीकरणासाठी देशभरात प्रोत्साहन दिले जात आहे. देशातील 15 ते 18 वयोगटातील अशी 7.40 कोटी मुले असून त्यांचे 100 टक्के लसीकरण कऱण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी जास्तीत जास्त मुलांनी लस घ्यावी, विविध शाळांनीही यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विविध शहरांतील आरोग्य केंद्रांसह शाळांमध्येही राज्य शासनातर्फे लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. किशोरवयीन मुलांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला जात आहे. दुसरा डोस 28 दिवसांनंतर घ्यावा लागणार आहे. कोविन पोर्टलवर रविवारपर्यंत 7.21 लाख युवकांनी लसीसाठी नोंदणी केली होती.

इतर बातम्या-

Children Covid Vaccination: जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते किशोरवयीनांच्या लसीकरणाला सुरुवात

VIDEO : मनी माऊची भरली शाळा ! शिक्षिका पाहून थक्क व्हाल, पाहा खास व्हायरल व्हिडीओ!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.