वारंवार आवाहन करुनही लोक विनाकारण घराबाहेर पडतायत, याची किंमत मोजावी लागेल: जयंत पाटील

दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना व्हेंटिलेटवर लावण्याची वेळ आली, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. | Jayant Patil Coronavirus

वारंवार आवाहन करुनही लोक विनाकारण घराबाहेर पडतायत, याची किंमत मोजावी लागेल: जयंत पाटील
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
Rohit Dhamnaskar

|

May 01, 2021 | 11:18 AM

सांगली: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विनाकारण बाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार लोकांना करत आहेत. मात्र, तरीही अनेक लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. (NCP leader Jayant Patil warns people about Coronavirus situation)

ते शनिवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अजूनही खबरदारी घेण्याची गरज असल्याचे म्हटले. कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. कोरोनापासून बचावासाठी व्यवस्था अधिक उत्तम करण्यात येईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेलाही आपल्याला तोंड देता आले पाहिजे. दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना व्हेंटिलेटवर लावण्याची वेळ आली, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. त्यामुळे कोरोनाची लाट परतवून लावण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

Corona Cases India | देशात चार लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण, एका दिवसात 3 हजार 523 कोरोनाबळी

जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देणे, हेच राज्य सरकारचे धोरण

राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त लसी उपलब्ध करुन देणे, हेच सरकारचे धोरण असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. अनेक केंद्रांवर लसी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. यामधून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार होत आहे. मात्र, एका डॉक्टरांमुळे सर्वच डॉक्टर दोषी आहेत, असे मानण्यात अर्थ नाही. दोषी डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

जुलै-ऑगस्टदरम्यान कोरोनाची नवी लाट येणार?

देशात जुलै आणि ऑगस्टदरम्यान करोनाचा संसर्ग टिपेला जाईल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अंदाजांबाबत आम्ही गंभीर नाही. कारण तोपर्यंत देशातील संसर्गाची लाट ओसरलेली असेल. पण पूर्वीसारखे करोनाचे कमी रुग्ण आढळून येत राहतील आणि स्थिती नियंत्रणात असेल, असे विद्यासागर म्हणाले. यादरम्यान करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात येतील. पण आपण काळजी घेतल्यास ही संख्या दिवसेंदिवस कमी होईल.

संबंधित बातम्या:

देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समिती स्थापन करावी: संजय राऊत

Coronavirus India : येत्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचणार; शास्त्रज्ञांचा अंदाज

लसींचा ‘तो’ साठा भारतासाठीच वापरला असता तर आज ही वेळ ओढावली नसती; अजितदादांचा केंद्राला टोला

(NCP leader Jayant Patil warns people about Coronavirus situation)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें