शरद बनसोडेंचा पत्ता कट, सोलापूरसाठी भाजपचा उमेदवार ठरला : सूत्र

शरद बनसोडेंचा पत्ता कट, सोलापूरसाठी भाजपचा उमेदवार ठरला : सूत्र

सोलापूर : भाजपने सोलापूरचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोलापूर लोकसभेसाठी अक्कलकोट येथील वीरशैव मठाचे मठाधीश म्हणून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित करण्यात आली आहे. भाजपकडून अजून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. पण जयसिद्धेश्वर महाराजांच्या नावावर निर्णय झाल्याची माहिती आहे. जयसिद्धेश्वर महास्वामींना उमेदवारी जाहीर झाल्यास […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:14 PM

सोलापूर : भाजपने सोलापूरचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोलापूर लोकसभेसाठी अक्कलकोट येथील वीरशैव मठाचे मठाधीश म्हणून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित करण्यात आली आहे. भाजपकडून अजून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. पण जयसिद्धेश्वर महाराजांच्या नावावर निर्णय झाल्याची माहिती आहे.

जयसिद्धेश्वर महास्वामींना उमेदवारी जाहीर झाल्यास त्यांची लढत काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्याशी होईल. अक्कलकोटमध्ये जयसिद्धेश्वर महाराज आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची बैठक होणार आहे. आगामी रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते. पण सुमार कामगिरी असलेल्या शरद बनसोडेंचा पत्ता भाजपने कट केला आहे.

कोण आहेत जयसिद्धेश्वर महास्वामी?

अक्कलकोट येथील वीरशैव मठाचे मठाधीश म्हणून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी सर्वदूर परिचित आहेत. शिवाय त्यांना मानणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. तर स्वतः महास्वामींनीसुद्धा यासाठी कंबर कसली आहे. उमेदवारी मिळाली तर आपण निवडणूक लढवू असं सांगत मुख्यमंत्र्यापासून ते भाजपच्या वरिष्ठापर्यंत गाठीभेटी सुरु केल्या आहेत. महाराजांचे शैक्षणिक काम, मतदारसंघातील जातीय समीकरणे आणि भक्तांची संख्या पाहता महास्वामीजींचे पारडे जड मानलं जातं आहे. त्यातच धर्मगुरूंनी  राजकारणात येऊ नये, असा सूरुही उमटू लागलाय. तसा ठरावही अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने केलाय.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें