Jitendra Awhad: राजकीय व्यासपीठावर नवा ‘जॉनी लिव्हर’ आलाय; आव्हाडांचे राज यांना शालजोडीतून फटकारे

Jitendra Awhad: तुमची काल सभा झाली. तुमचं भाषण झालं. लोकांनी टाळ्याही वाजवल्या. पण तुमच्या भाषणावरच्या कमेंट पाहा. लोक प्रतिक्रिया देत नाहीत. स्माईली देत आहेत. लोक तुम्हाला महाराष्ट्राचा जॉनी लिव्हर म्हणत आहेत. याचं दु:ख होतं. महाराष्ट्राला नवा जॉनी लिव्हर सापडला असं म्हटलं जात आहे.

Jitendra Awhad: राजकीय व्यासपीठावर नवा 'जॉनी लिव्हर' आलाय; आव्हाडांचे राज यांना शालजोडीतून फटकारे
Jitendra AwhadImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 12:37 PM

ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्यावर काल खोचक टीका केली होती. राज यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुमची काल सभा झाली. तुमचं भाषण झालं. लोकांनी टाळ्याही वाजवल्या. पण तुमच्या भाषणावरच्या कमेंट पाहा. लोक प्रतिक्रिया देत नाहीत. स्माईली देत आहेत. लोक तुम्हाला महाराष्ट्राचा जॉनी लिव्हर म्हणत आहेत. राजकीय व्यासपीठावर नवा जॉनी लिव्हर सापडला असं म्हणतात याची मला लाज वाटते. याचं दु:ख होतं, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना शालजोडीतून फटकारे लगावले. राज ठाकरे यांनी काल केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज यांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर दिलं.

राज्यात जातीवाद कोण वाढवत आहे? जिंकले तर पेशवाई आणि हरले तर मराठे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला. त्यावेळी तिथे अडथळा आणणारा कोण होता? त्याचे नाव सांगा. ते सांगता येत नाही. जेम्स लेनने पुस्तकात काय लिहिलं. त्यांना कुणी माहिती पुरवली हे सर्व त्या पुस्तकात आहे. साध्वींवर तुम्ही कधी बोलत नाहीत. दहशतवाद्यांना धर्म नसतो ना, असं सांगतानाच महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि जगातील पहिली शिवजयंती साजरी केली. बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांना दैवत मानायचे. अन् त्यांचे नाव घेतलं तर जातीवाद कसा? त्यामुळे जातीवाद कोण वाढवत आहे? असा सवाल आव्हाड यांनी केला.

तुमचे मनसे सैनिक कोर्टाचे आदेश विसरले का?

भोंग्याबाबत तुम्ही बोलता. पण तुमची सभा ज्या ठिकाणी झाली. तिथे शाळा आणि चर्च आहे. शाळेच्या 100 मीटर परिसरात लाऊडस्पीकर नसावा असे कोर्टाचे आदेश आहेत. हे नियम तुमचे मनसैनिक विसरले का? असा सवाल त्यांनी केला.

त्याची गुळगुळीत दाढी दिसली नाही का?

तुम्ही म्हणता मुस्लिमांकडे वस्तरा कसा सापडणार? ते तर दाढी करत नाहीत. तुम्हाला आठवण म्हणून सांगतो. तुमच्याकडे एक व्यक्ती होता. तुमचा कार्यकर्ता. त्याचं नाव हाजी अराफत. त्यांच्या बाजूला बसून तुम्ही जेवण करत होता. त्याची दाढी गुळगुळीत होती. ती तुम्हाला दिसली नाही का? असा सवालही आव्हाड यांनी केला.

पवारांनी गणपतीचे दर्शन घेतले

शरद पवारांवरील टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील पवारांचा फोटो बाहेर आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरी शरद पवार गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. त्याचेही फोटो आहेत. तेही पाहून घ्या, असं सांगतानाच तुम्ही म्हणजे काही तज्ज्ञ नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray: राज ठाकरेंची छगन भुजबळांवर टीका, पंकज भुजबळ आज थेट शिवतिर्थावर; भेटीचं कारण काय?

Maharashtra News Live Update : जातीयवाद कोण वाढवतंय, जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल

Uniform Civil Code: राज ठाकरेंनी समान नागरी कायद्याची मागणी मोदींकडे केली, तो कायदा नेमका काय?

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.