AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला डॉक्टराला मारहाण, शिंदे गटाच्या नगरसेवकाचा CCTV व्हायरल; रुग्णालयात नेमकं काय घडलं?

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि धमकावल्याचा आरोप करण्यात आला असून घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे. नगरसेवकांसह त्यांच्या सहकाऱ्यांचाही मारहाणीत सहभाग असल्याचे CCTV फुटेजमधून समोर येत असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

महिला डॉक्टराला मारहाण, शिंदे गटाच्या नगरसेवकाचा CCTV व्हायरल; रुग्णालयात नेमकं काय घडलं?
kalyan marhan cctvImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 07, 2026 | 3:59 PM
Share

Kalyan Dombivli Doctor Assault : डॉक्टरांची सुरक्षितता हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरलेला आहे. अनेक ठिकाणी हलगर्जीपणाचा आरोप करून डॉक्टरांना मारहाण केली जाते. काहीजण तर डॉक्टरांना थेट शिवीगाळही करतात. डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे कायदेदेखील करण्यात आले आहेत. परंतु या कायद्यांचा अनेकांना धाक नाही. डॉक्टरांना मारहाण झाली तर कायद्यात कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. परंतु तरीदेखील अशा प्रकारचे गुन्हे होतच राहतात. सध्या याचीच प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका महिला डॉक्टरला, नर्सला तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही सध्या समोर आला असून एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण व धक्काबुक्की झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही मारहाण शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनी केली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वाद घालत मारहाण करत असल्याचे त्यांचे CCTV फुटेज समोर आले आहे. फुटेजमध्ये महिला डॉक्टर फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा मोबाईल हिसकावून खाली पाडल्याचेही दिसून येत आहे.

डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि धमकावल्याचा आरोप करण्यात आला असून घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे. नगरसेवकांसह त्यांच्या सहकाऱ्यांचाही मारहाणीत सहभाग असल्याचे CCTV फुटेजमधून समोर येत असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या घटनेनंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, आता नगरसेवकाने डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना नेमकी का मारहाण केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु आता या प्रकरणी काय कारवाई केली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण
अख्खाच्या अख्खा रस्ताच वाहिला, मोठं भगदड अन्... त्र्यंबकेश्वर परिसरात
अख्खाच्या अख्खा रस्ताच वाहिला, मोठं भगदड अन्... त्र्यंबकेश्वर परिसरातील धक्कादायक Video
सरकारी चौकीदार चोर है... राम मंदिर दान चोरीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
Congress Andolan | सरकारी चौकीदार चोर है... राम मंदिर दान चोरीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
ज्यांना शेंबूड काढायची अक्कल नाही, ते फडणवीसांवर बोलतात!
ज्यांना शेंबूड काढायची अक्कल नाही, ते फडणवीसांवर बोलतात!; पडळकरांचा विरोधकांवर घणाघात
शरद पवार खरंच महाविकास आघाडीची साथ सोडणार? तावडे आणि पाटलांची भेट
शरद पवार खरंच महाविकास आघाडीची साथ सोडणार? तावडे आणि पाटलांच्या भेटीबाबत दत्तात्रय भरणे स्पष्टच म्हणाले...
कोणचा विश्वासच बसे ना! 4 महिन्यांपूर्वीच सियाने... अखेर मोबाईल डाटा
Siya-ketan Case Update | कोणचा विश्वासच बसे ना! 4 महिन्यांपूर्वीच सियाने... अखेर मोबाईल डाटा रिकव्हर झालाच
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच भरलेलं जहाज...
अटल सेतूपासून Missing Link पर्यंत...पावसाने सरकारचे वाभाडे काढले
Ambadas Danve | अटल सेतूपासून Missing Link पर्यंत...पावसाने सरकारचे वाभाडे काढले; सरकारच्या प्रकल्पांवर दानवेंचा सणसणीत वार