AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार, शेअर रिक्षाचे भाडे वाढले; नवे दर काय?

कल्याण आरटीओ क्षेत्रात २३ जून २०२५ पासून शेअर रिक्षाचे भाडे ३ ते ५ रुपयांनी वाढले आहे. तीन महिन्यापूर्वी जाहीर झालेली ही वाढ रिक्षांच्या मीटरच्या पुनर्मानांकनामुळे उशीरा लागू झाली. इंधन किमती आणि देखभाली खर्च वाढल्याने ही वाढ आवश्यक असल्याचे रिक्षा संघटना म्हणतात.

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार, शेअर रिक्षाचे भाडे वाढले; नवे दर काय?
rickshaw
| Updated on: Jun 23, 2025 | 4:46 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक चटका बसणार आहे. कारण आता कल्याण आरटीओ क्षेत्रातील प्रवाशांना आता रिक्षा प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ यांसारख्या शहरांमध्ये शेअर रिक्षाची भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. आजपासून (सोमवार, 23 जून 2025) ही नवी भाडेवाढ केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने ही भाडेवाढ तीन महिन्यांपूर्वीच जाहीर केली होती. मात्र, रिक्षांच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन पूर्ण न झाल्यामुळे ती आतापर्यंत लागू झाली नव्हती. आता आरटीओ क्षेत्रातील सुमारे 95% रिक्षांचे मीटर पुनर्मानांकित (recalibrated) झाल्याने, रिक्षा चालकांनी आजपासून नवीन दर आकारण्यास सुरुवात केली आहे.

किती असणार भाडेवाढ?

यानुसार, शेअर रिक्षाच्या भाड्यात अंतरानुसार 3 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे, तर मीटरमध्येही प्रति प्रवासामागे 3 रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. या भाडेवाढीमुळे नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

दरवाढीमागील कारण काय?

आधीच दैनंदिन गरजा आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यात आता रिक्षा प्रवासाच्या वाढीव खर्चामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी ताण पडणार आहे. दुसरीकडे, रिक्षा संघटनांनी वाढत्या इंधनाच्या किमती आणि देखभालीचा खर्च लक्षात घेता, ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रवाशांनी ती स्वीकारावी, असे आवाहन केले आहे.

आर्थिक बोजा वाढला

मात्र, दररोज कामावर जाण्यासाठी किंवा इतर प्रवासासाठी रिक्षावर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांना आता या वाढीव आर्थिक बोज्याला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?