मोठी बातमी! कल्याणमध्ये मारहाण झालेल्या तरुणीचं आयुष्य होवू शकतं बर्बाद, डॅाक्टरांच्या विधानाने खळबळ
कल्याणमध्ये एका मराठी तरुणीला एका रुग्णालयात परप्रांतीयांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमुळे सर्वांना धक्का बसला आहे.

कल्याणमध्ये एका मराठी तरुणीला एका रुग्णालयात परप्रांतीयांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी मराठी तरुणीला जमिनीवर आदळताना, तिला फरफटत ओढताना दिसत आहे. या मारहाणीत तरुणीच्या मानेला गंभीर इजा झाली आहे. त्यानंतर आता तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमुळे सर्वांना धक्का बसला आहे.
पीडित तरुणीवर सध्या उपचार सुरु आहेत. तिच्यावर उपचार करणारे जानकी हॅास्पिटलचे डॉक्टर मोईन शेख यांनी म्हटलं की, तिच्या मानेवर मारहाण करण्यात आली आहे. तिला मान हलवताना खुप वेदना होत आहे. तसेच तिच्या पायावर आणि छातीवर मारल्याचे वळ आहेत. आम्ही तात्काळ उपचार सुरु केले आहेत. मात्र मारहाणीमुळे तिला पॅरेलॅसिस होवू शकतो. तिला सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेऊन बदला घेण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत बोलताना जाधव यांनी म्हटले की. मुलीची परिस्थिती वाईट आहे. त्या मुलीला लाखा बुक्क्याने भरपूर मारले आहे. 24 तास ती त्याच दुःखात घरी बसून होती. हा आक्रोश पूर्ण महाराष्ट्राचा आहे.
पुढे बोलताना जाधव म्हणाले की, ज्या पद्धतीने तिला अमानुष मारहाण केली, त्यात आरोपी तो एक हार्डकोर क्रिमिनल दिसत आहे. युपी बिहारमध्ये जे क्रिमिनल असतात ते तिकडून या ठिकाणी येतात आणि धंदे करतात. त्याने इथे येऊन केलेला आहे ते अतिशय चुकीची पद्धत आहे. पोलिसांना विनंती याला लवकरात लवकर अटक करावी. नाहीतर तो आमच्या हाताला लागला तर आम्ही देखील त्यांने त्या मुलीवर हात उचलला तसा हाताचा वापर करू.
पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, ‘मुलीला आई-वडील नाहीत, त्या तिधी बहिणी आहेत, त्या काम करतात आणि घर चालवतात. सोसायटीच्या महिलांमध्येही प्रचंड राग आहे, मोर्चा काढण्याची देखील त्यांची तयारी आहे. पोलिसांनी आश्वासन दिल्यावर लवकरात लवकर त्याला अटक करू. महाराष्ट्र पोलिसांवर भरोसा आहे असंही जाधव यांनी म्हटलं आहे.
