मोठी बातमी! कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर भक्तांसाठी खुलं, पण...

26 नोव्हेंबरच्या कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर भक्तांसाठी खुलं असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर भक्तांसाठी खुलं, पण...

आळंदी : कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाची कार्तिकी एकादशीची (Karthiki Ekadashi ) यात्रा प्रतिकात्मक आणि मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय राज्य सरकार (State Government) आणि सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. यामुळे 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेचं सध्या सुरू करण्यात आलेलं मुखदर्शनही बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीच्या वतीनं घेण्यात आला आहे. पण 26 नोव्हेंबरच्या कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर भक्तांसाठी खुलं असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Karthiki Ekadashi temple in Alandi will be open for devotees)

पंढरपूर आणि देहूतील मंदिरं यादिवशी बंद असणार आहे. यामुळे भाविकांनी आळंदीत गर्दी केल्यास त्यावेळची परिस्थिती पाहून मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असंही बैठकीत ठरवण्यात आलं आहे. दरम्यान, 13 डिसेंबरचा संजीवन समाधी सोहळा कसा पार पडेल याचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या विश्वस्तांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शासकीय महापूजा

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा 26 नोव्हेंबरला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे. तर मानाचा वारकरी म्हणून मंदिरातील 6 विणेकऱ्यांपैकी एकाची चिठ्ठी काढून तो मान दिला जाणार आहे. 23 आणि 24 नोव्हेंबरला विठ्ठल-रुक्मिणीचं मुखदर्शन सुरू असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्थाही सुरु आहे. तर 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान बंद असलेलं मुखदर्शन पुन्हा 28 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही मंदिर समितीनं दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीपाठोपाठ कार्तिकी वारीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन घेता येत नसेल तर मग उपमुख्यमंत्र्यांचा हस्ते होणारी पूजाही रद्द करावी, असा सूर उमटू लागला आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरला जाणार असल्याचं आज स्पष्ट केलं. (Karthiki Ekadashi temple in Alandi will be open for devotees)

दिंड्यांना पंढरपुरात परवानगी नाही

यंदाच्या कार्तिकी यात्रेनिमित्त निघणाऱ्या दिड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. नुकतंच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. कार्तिक शुद्ध एकादशीच्या निमित्त महाराष्ट्रातील जिल्ह्यातून यंदाही पंढरपूर येथे दिंड्या दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र यंदा देवस्थानात करायचे नित्योपचार मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन होणार आहे. त्यामुळ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातून दिंड्या पंढरपुरात दाखल होणार नाही.

इतर बातम्या –

कार्तिकी एकादशीनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांना पंढरपुरात परवानगी नाही, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश

(Karthiki Ekadashi temple in Alandi will be open for devotees)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *