AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सियाच्या भावाची 10 तास कसून चौकशी, तो प्रश्न विचारताच गप्प, लगेच निघाला, अडचणी वाढणार?

Ketan Agarwal Case : डोंगरावरून पाय घसरून पडल्याने त्याचे निधन झाल्याचा बनाव त्याची होणारी बायको सिया गोयलने केला होता. मात्र चौकशीनंतर सिया आणि चेतन चौधरीने हा कट रचल्याचे समोर आले होते. आता सियाच्या भावाची कसून चौकशी करण्यात आली आहे.

सियाच्या भावाची 10 तास कसून चौकशी, तो प्रश्न विचारताच गप्प, लगेच निघाला, अडचणी वाढणार?
Sahil Goyal QuestiningImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 26, 2026 | 10:05 PM
Share

पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 18 जून रोजी ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा मृत्यू झाल्याही माहिती समोर आली होती. डोंगरावरून पाय घसरून पडल्याने त्याचे निधन झाल्याचा बनाव त्याची होणारी बायको सिया गोयलने केला होता. मात्र संशयानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून केतनचा घात केल्याचे समोर आले आहे. अशातच आज या प्रकरणी सियाचा भाऊ साहील याची 10 तास कसून चौकशी करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आज दुपारी सियाचा भाऊ साहिल गोयलच्या चौकशीला सुरुवात झाली होती, मात्र आता ही चौकशी 10 तासानंतर संपली आहे. या चौकशीत साहिलला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. अशातच चौकशी संपल्यानंतर साहिलला सिया असं करणार होती माहिती होती का असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर साहिल गोयलने उत्तर दिले नाही, तो गप्प बसला आणि आपले वाहन जोरात घेऊन निघून गेला. त्यामुळे आता सियाच्या कृत्याची साहिलला कल्पना तर नव्हती ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सिया सासरच्या लोकांवर खूश होती…

आज सिया गोयलच्या वडिलांनी सियाविषयी बोलताना सांगितले की, ‘ही दुख:द घटना आहे. आमचा विश्वास बसत नाही. आम्ही केतनला आमचा मुलगा मानायचो. त्यांना आम्ही गमावलंय याचं दुख आहे. आम्हाला लग्नाच्या खूप अपेक्षा होत्या. काय काय स्वप्न सजवले होते. सियाचा वाढदिवस होता. आम्हाला महाबळेश्वरला जाऊन सेलिब्रेशन करायचं होतं. उदयपूरला लग्न करायचं होतं. बरीच स्वप्न होते. सियाही लग्नाबाबत भरभरून बोलायची. सासरच्या लोकांवर खूश होती. चांगला नवरा आणि घर मिळाल्याचं सांगत होती.’

आम्हाला अफेअरबद्दल माहिती असती तर…

सियाच्या वडिलांनी असेही म्हटले होते की, ‘सियाचं अफेयर असतं तर तिने सांगितलं असतं. तिने थोडं जरी सांगितलं असतं किंवा केतनच्या कुटुंबीयांनी सांगितलं असतं तर आम्ही तिच्याशी बोललो असतो. काही जरी कळलं असतं तर आम्ही बोललो असतो.सिया सिंपल होती. तिचं काही अफेयर होतं असं काही माहीत नव्हतं. जरा जरी माहीत असतं तर सियाला आम्ही दरडावलं असत. चेतन कुठून आला माहीत नाही. त्याला कधी भेटलो नाही. त्याचा चेहराही कधी पाहिला नाही. तो कधी घरी आला नाही, आम्ही कधी त्याचं नावही ऐकलं नाही.’

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत