AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder : सियाला सर्वात मोठा धक्का, 100 टक्के अडकणार? सर्वात जवळची व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात; मोठा खुलासा होणार?

केतन अग्रवाल याच्या हत्येप्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघे अटकेत असून 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्या दोघांनी एकमेकांवर आरोप करत हत्येचा दोष नाकारण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आता सिया गोयलची सर्वात जवळची व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात असून, अखेर केतन हत्याकांडाचे गूढ उकलू शकते. मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

Ketan Agarwal Murder :  सियाला सर्वात मोठा धक्का, 100 टक्के अडकणार? सर्वात जवळची व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात; मोठा खुलासा होणार?
सिया गोयल हिला 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
| Updated on: Jun 26, 2026 | 3:09 PM
Share
पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालचा (Ketan Agarwal Murder )  18 जून रोजी लोहगडावरून पडून मृत्यू झाला. त्याच्या हत्याकांडप्रकरणात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत.  केतनच्या हत्येप्रकरणी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली. ते 29 जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. मात्र आता या प्रकरणात सिया गोयल हिला मोठा धक्का बसला आहे, कारण या हाय-प्रोफाईल केसमध्ये पोलिसांची नजर सिया हिचा भाऊ साहिल गोयलवर पडली आहे. पोलिसांनी साहिलला चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याची बहीण सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यातील प्रेमसंबंधांची त्याला आधीच कल्पना होती. त्याने ही माहिती आपल्या कुटुंबाला किंवा इतर कोणालाही का दिली नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस आता करत आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, साहिलच्या जबाबामुळे या हत्याकांडाच्या संपूर्ण घटनाक्रमातील अनेक महत्त्वाचे दुवे जोडले जाऊ शकतात. सध्या त्याची सविस्तर चौकशी सुरू असून, त्याचा जबाब केस डायरीमध्ये नोंदवला जात आहे. तसेच, सियाची मानसिक स्थिती, तिचे नातेसंबंध आणि तिचे लग्न यांबाबत कुटुंबात झालेली चर्चा, त्याचे चर्चेचे स्वरूप जाणून घेण्याचाही तपास पथकाकडून प्रयत्न केला जात आहे.
भावाच्या जबाबातून उकलू शकतं मोठं गूढ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांच्यातील मैत्री किंवा नातं, त्यांचा संपर्क याबद्दल साहिलला कल्पना होती, असे संकेत पोलिसांना मिळाले आहेत. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तपास पूर्ण होण्यापूर्वीच कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्या दोघांमधील संपर्काबद्दल कुटुंबातील इतर कोणालाही माहिती होती का, याचाही तपास सुरू आहे.  आणि जर कोणाला याबद्दल आधीपासून माहीत होतं, तर कोणीच ही गोष्ट गांभीर्याने का घेतली नाही, हाही तपासाचा एक पैलू आहे.
चौकशीत उघड झाला हत्येचा पूर्ण प्लान
दरम्यान, पोलिसांच्या तपासातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी चौकशीदरम्यान हत्येच्या संपूर्ण कटाचा सविस्तर तपशील सांगितला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वीच सिया आणि चेतन यांनी कट निश्चित केला होता; त्यानुसार, सियाने एका विशिष्ट ठिकाणी बसून ठरल्याप्रमाणे चेतनला सिग्नल द्यायचं असं ठरलं होतं.  तो संकेत मिळताच चेतन हा केतन अग्रवालच्या मागे जाईल आणि त्याला खोल दरीत धक्का देईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना अगदी योजनेप्रमाणेच घडली. शेवटच्या क्षणापर्यंत केतनला कोणतीही शंका आली नाही आणि काय घडत आहे हे समजण्याआधीच त्याला दरीत ढकलण्यात आलं.
आधी दोघांनी केला बचावाचा प्रयत्न 
अटक झाल्यानंतर सिया आणि चेतन हे दोन्ही आरोपी एकमेकांवर दोषारोप करत होते. चेतन चौधरीने सुरुवातीला असा दावा केला की, तो किल्ल्यावर उपस्थित असला तरीही ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे तो गेला नव्हता. एवढंच नव्हे तर तिथे नेमकं काय घडलं याचीही आपल्याला काहीच कल्पना नव्हती, असंही चेतनने सांगितलं. मात्र पोलिसांच्या त्याच्यावर विश्वास बसला नाही.  तांत्रिक पुरावे आणि घटनास्थळावरून गोळा केलेली माहिती यांचे विश्लेषण तसेच सखोल चौकशीनंतर, या दोघांनीही आपल्या जबाबात बदल केला. त्यानंतर, सिया आणि चेतन यांनी कथितरीत्या गुन्ह्याची कबुली दिली आणि संपूर्ण कट पोलिसांसमोर उघड केला.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!