AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केतन अग्रवालच्या हत्येला एक महिना पूर्ण, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बहिणीकडून मोठा खुलासा, सियावर कसा आला संशय?

केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नसून, केतन यांच्या कुटुंबियांनी सिया गोयल हिला कठोर शिक्षा सुनावण्याची कोर्टाकडे मागणी केलीये. दरम्यान दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात केतन याच्या बहिणीने मोठा खुलासा केला आहे.

केतन अग्रवालच्या हत्येला एक महिना पूर्ण, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बहिणीकडून मोठा खुलासा, सियावर कसा आला संशय?
केतन अग्रवाल
| Updated on: Jul 18, 2026 | 11:50 AM
Share

पुण्यातील लोहगडावर केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली आहे. केतन याच्यासोबत लग्नासाठी नकार देता येत नव्हता म्हणून सिया गोयल हिने बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्या मदतीने केतन याची हत्या केली. आज म्हणजे 18 जुलै 2026 रोजी केतन याच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. अशात केतन अग्रवाल याच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला म्हणून संपूर्ण कुटुंब दगडूशेठ हलवाई गणपतीला साकड घालण्यासाठी आलेलं. यावेळी केतन याची बहिणी म्हणाली माझ्या भावाच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला आहे, त्याला लवकरत लवकर न्याय मिळाला पहीजे असं म्हणाली. सांगायचं झालं तर, सर्वात आधी केतनच्या बहिणीलाच सिया गोयल हिच्यावर संशय आलेला.

केतन अग्रवाल याची बहीण म्हणाली, ‘आज माझ्या भावाला एक महिना पूर्ण झाला आहे. एक महिना झाला, मी त्याला पाहिलं नाही. त्याचा आवाज ऐकला नाही आणि त्याचं हसू मला ऐकायला आलं नाही.. माझी फक्त गणपती बाप्पाकडे एकच प्रार्थना आहे की, माझ्या भावाला लवकरत लवकर न्याय मिळायला हवा आणि तो आता जिथे कुठे आहे, तिथे शांतीने जगू शकेल. त्याने आनंदी राहवं एवढीच इच्छा आहे.

आज माझ्या आजोबांचा वाढदिवस आहे आणि भावाच्या मृत्यूला देखील एक महिना झाला आहे. हे दुःख आमच्या कुटुंबासाठी फार मोठं आहे. असं केतन याची बहीण म्हणाली. एवढंच नाही तर, सिया हिच्यावर संशय कसा आला? असा प्रश्न देखील माध्यमांकडून विचारण्यात आला. यावर केतन याची बहीण म्हणाली, ‘या सर्व गोष्टींचा खुलासा ट्रायलमध्ये होईल, आता आम्ही गणराया चरणी फक्त एवढीच प्रार्थना करत आहोत की, केतन याला न्याय लवकरात लवकर मिळायला हवा.’ पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

केतन अग्रवाल याच्या वडिलांची प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात कोर्टात चालवलं जात आहे. तर सिया हिच्या पालकांकडून सतत वकील बदलले जात असल्याची माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान केतन याचे वडील विशाल अग्रवाल म्हणाले, ‘जे माझ्या मुलासोबत झालं आहे, असं कोणाच्याच मुलासोबत नाही झालं पाहिजे… न्यायव्यवस्थेकडे माझी एकच मागणी आहे आणि ती म्हणजे, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी. ही शिक्षा लवकरात लवकर मिळावी. मी पंतप्रधानांना पत्र लिहून एवढीच मागणी केली आहे की, लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.’, त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप