नाईट लॅंडिंगला परवानगी मिळाली आम्हांला आनंदच; पण गेल्या दोन वर्षाची मेहनतही विसरता येणार नाही; सतेज पाटलांनी सगळ्याच गोष्टी उलघडून सांगितल्या…

विमानतळाच्या विकासाबाबत बोलताना ते म्हणाले की, येथील विमानतळासाठी मी काय केले आहे ते यापूर्वीही सांगितले आहे, आणि कोल्हापूरकरांना मी काय केले आहे तेही माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले. विमानतळ विकासासाठी मी काय केले हे सांगण्याची गरज नाही मात्र त्या कामाबाबत तारखेसहीत माझ्याकडे सर्व आहे असंही त्यांनी सांगितले.

नाईट लॅंडिंगला परवानगी मिळाली आम्हांला आनंदच; पण गेल्या दोन वर्षाची मेहनतही विसरता येणार नाही; सतेज पाटलांनी सगळ्याच गोष्टी उलघडून सांगितल्या...
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 4:55 PM

कोल्हापूरः कोल्हापूर विमानतळावर (Kolhapur Airport)  आता नाईट लँडिंगला परवानगी (Night Landing Permission)  मिळाली आहे त्यानंतर कोल्हापुरातील राजकारण आता तापले आहे. नाईट लँडिंगवरुन आता श्रेयवादाचे राजकारण चिघळले असल्याची चिन्हं आता दिसू लागली आहेत. नाईट लँडिंगला परवानगी मिळाली नंतर कोल्हापुरकरांनी आनंद साजरा केला असून त्या गोष्टीचा आनंद माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Congress MLA Satej Patil) यांनी सांगितले की, परवा परवानगी मिळाली असून त्या गोष्टीचा आम्हांला आनंदच आहे. यामुळे आता कोल्हापूरच्या विकासाला गती मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुरु झाल्याने औद्यागिक विकासाबरोबरच येथील नागरिकांची योग्य सोय झाली आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर विमानतळावर आता मोठी विमान उतरणार असू या कामाच्या कार्यवाहीसाठी अजून 50 दिवस लागतील असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

मी काय केले आहे ते यापूर्वीही सांगितले

विमानतळाच्या विकासाबाबत बोलताना ते म्हणाले की, येथील विमानतळासाठी मी काय केले आहे ते यापूर्वीही सांगितले आहे, आणि कोल्हापूरकरांना मी काय केले आहे तेही माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले. विमानतळ विकासासाठी मी काय केले हे सांगण्याची गरज नाही मात्र त्या कामाबाबत तारखेसहीत माझ्याकडे सर्व आहे असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शेवटच पत्र आता मिळाले असेल पण गेली दोन वर्षे केलेली मेहनत विसरता येणार नाही असंही मतही त्यांनी यावेळी मांडले. आमदार सतेज पाटील यांनी सांगितले की, मुंबई-कोल्हापूरदेखील सेवा सुरु होईल, आणि त्यासाठी आपण अदानी ग्रुपलासुद्धा मी भेटुन आलो आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आता राज्यभर मोर्चे काढावे लागतील

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन काही दिवस गेले तरीही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने त्यासाठी आता राज्यभर मोर्चे काढावे लागतील. यासाठी आता नागरिकांमधून सजगता दाखवणे गरजेचे आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी नागरिकांनी पत्र लिहिली पाहिजेत अशी भावनाही त्यांनी मंत्रिमंडळाविषयी व्यक्त केली.

हजारो कोटींच्या कामांना स्थगिती

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारना सत्तेत आल्या आल्या आधी हजारो कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली. महाविकास आघाडीने मंजूरी केलेली कामं ही काही कामं एकट्याची नव्हती. ती सार्वजनिक काम होती. मात्र शिंदे फडणवीस यांनी ही कामं थांबवल्याने भविष्याच्या दृष्टीने हे दुर्देवी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेतून बंडखोरी करुन भाजपबरोबर सत्तार स्थापन करण्यात आली मात्र भापच्या काही लोकांवर अन्याय झाला याहे. बंडखोर आमदारांमधील 50 लोकांना मंत्री करायचे होते, पण तसे काही दिसत नाही.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार तात्काळ करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. पहिल्या टप्प्यात चार-पाच खात्यांची कामं सुरु झाली होणे गरजेचे आहे. सध्या शाळा-महाविद्यालय सुरु होणार आहेत. त्यामुळे शिक्षण विभागावरचा ताण वाढणार आहे. राज्यातील प्रशासकीय बदल्यांबाबत अजूनही कोणताही निर्णय झाला नाही. मंत्रि मंडळाचा विस्तार झाला नसल्यामुळे राज्यातील प्रशासकीय एकही बदली झाली नाही. अगदी तहसिलदारपासून ते ग्रामसेवकांपर्यंतची बदली थांबली आहे. त्यामुळे लवकरात लवकर मंत्रीमंडळ विस्तार झाला तर राज्याची सुरळीत घडी सुरु होईल असं मतही त्यांनी व्यक्त केले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.