
साधारण महिन्याभरापूर्वी निवडणूक आयोगाने महत्वाची पत्रकार परिषद घेत राज्यातील महानरपालिका निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर एकच रणधुमाळी सुरू झाली. काल (15 जानेवारी 2026) रोजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान झालं. तर आज मतमोजणी होत असून थोड्याच वेळात निकाल जाहीर होतील. 29 महापालिकांच्या निवडणुकांचा रिझल्ट आज येणार असून कोण विजयाचा गुलाल उधळणार, आण कोण निराश होणार ते थोड्याच वेळात समजेल. गेली अनेक वर्षं महापालिकांत प्रशासन राज होतं पण आता महापालिका निवडणुका झाल्याने लवकरच पूर्ववत कारभार सुरू होईल असं दिसतंय. कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना दि. 12 ऑक्टोबर 1854 साली झाली. मार्च 1941 मध्ये स्थानिक स्वराज्य संघ ही संस्था स्थापन करण्यात आली. डिसेंबर 1972 मध्ये नगरपरिषदेचे रुपांतर महानगरपालिकेत झाले. तर ऑगस्ट 1978 मध्ये खऱ्या अर्थाने पहिली लोकनियुक्त महानगरपालिका अस्तित्वात आली. सध्या कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकूण 81 वॉर्ड असून सभागृहात 81 नगरसेवक निवडून येत असतात. तसेच 4 स्वीकृत नगरसेवक सभागृहात असतात.
वॉर्ड नंबर 1
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एक अर्थात शुगर मिल. हा तसा मुख्य शहरात मोडणाऱ्या प्रभागांपैकी एक असून मतदारांचा कौल नेमका कुणाला मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. थोड्याच वेळात सर्व चित्र स्पष्ट होईल. आंबेडकर नगर, संकपाळ नगर, शुगरमील, उलपे मळा, बडबडे मळा, पिंजार गल्ली, कसबा बावडा मुख्य रस्ता, कसबा बावडा फायर स्टेशन, मांत बसाहत, ठोंबरे गल्ली, बिंरजे पाणंद, कसबा बावडा पॅव्हेलियन, शाहू सेना चौक, कदमवाडी रस्ता, झूप प्रकल्प पाणंद रास्ता अशी एकंदर प्रभाग क्रमांक 1 ची व्याप्ती आहे.
वॉर्ड नंबर 2
तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये राजाराम बंधारा, नदी घाट, हनुमान तलाव, माळ गल्ली, लक्ष्मी विलास पॅलेस, डी.वा.पी. इंजि. कॉलेज, श्री कॉलनी, लाईन बाजार हॉकी ग्राऊंड, राजगड पार्क, छावा चौक, लाईन बाजार मश्जिद, त्र्यंबोली मंदिर, सेवा रुग्णालय, पोलीस लाईन, एस पी ऑफिस, अष्टेकर नगर हे भाग येतात.
वॉर्ड नंबर 3
हॉली क्रॉस, दत्ताबाळ मिशन, पोलीस लाईन, झूम प्रकल्प, भोसलेवाडी, कारंडे मळा, शासकीय विश्रामगृह, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज या प्रमुख भागांचा प्रभाग क्रमांक 3 मध्ये समावेश होतो. प्रभाग क्रमांक तीनची एकूण लोकसंख्या ही 18905 एवढी आहे. यंदा इथे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वॉर्ड नंबर 4
कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चार अर्थात कसबा बावडा पॅव्हेलियन. यामध्ये लाल बहादूर शास्त्री उद्यान, कोरगावकर हायस्कूल, सदरबाजार, बाबर हॉस्पीटल, विचारेमाळ, पाटोळेवाडी मेनन बंगला, लिशा हॉटेल या प्रमुख भागांचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक चारची एकूण लोकसंख्या ही 17956 एवढी असून, त्यापैकी 7 हजार 97 एवढी अनुसूचित जाती तर 98 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
वॉर्ड नंबर 5
कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पाच म्हणजेच लक्ष्मी विलास पॅलेस. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये कसबा बावडा परिसरातील गोळीबार मैदान, महालक्ष्मी नगर, पेट्रोल पंप, आशिर्वाद कॉलनी आणि काही प्रमाणात कृष्णानंद कॉलनी यांसारख्या जागांचा समावेश होतो.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE