AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Election Results 2026 LIVE: नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक-05 आणि प्रभाग क्रमांक -06 मध्ये कोण विजयी? निकाल एका क्लिकवर!

Nagpur Municipal Corporation NMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : 2017 साली नागपूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती. बसपानेही येथे चांगली कामगिरी केली होती.

NMC Election Results 2026 LIVE: नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक-05 आणि प्रभाग क्रमांक -06 मध्ये कोण विजयी? निकाल एका क्लिकवर!
NAGPUR MUNICIPAL CORPORATION ELECTION RESULTImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 12:55 PM
Share

NMC Election Results 2026 LIVE : सध्या राज्यात महानगरपालिकांची निवडणूक चालू आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार आणि कोणाला दणका बसणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत नागपूर महानगपालिकेत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाने पूर्ण जोर लावलेला आहे. नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक सहामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागपुरात सध्याची स्थिती काय आहे?

नागपूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. यातील 37 प्रभागात प्रत्येकी 4 उमेदवार आहेत. तर एका प्रभागात 3 उमेदवार आहेत. नागपुरात एकूण 151 जागांसाठी निवडणूक होत आहे. 2017 साली येथे भाजपाची सत्ता होती. या निवडणुकीत भाजपाने भाजप 108 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला फक्त 29 जागांवर विजय मिळवता आला होता. नागपुरात बसपाने मोठी कमाल केली होती. येथे बसपाचा एकूण दहा जागांवर विजय झाला होता. शिवसेनेला दोन जागांवर विजय मिळाला होतो. राष्ट्रवादीला एक आणि अपक्ष पक्षाला एक जागा मिळाली होती.

सध्याचे जागावाटप कसे आहे?

नागपूर महानगरपालिकेत भाजपा एकूण 143 जागा लढवत आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाने एकूण 8 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी एकूण 96 जागा लढवत आहे. दुरीकडे काँग्रेस पक्षाने एकूण 151 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. ठाकरे गटानेही 56 जागांसाठी उमेदवार दिले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी 79 जागा लढवत आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षानेही 75 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. यावे मनसेनेही 22 जागा लढवण्याचे ठरवले आहे. एमआयएम पक्षाने 3 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. बसपा हा पक्ष एकूण आठ जागा लढवत आहे.

2017 साली प्रभाग क्रमांक 5 मध्ये कोणाचा विजय?

प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकूण चार जागा आहेत. यातील प्रभाग क्रमांक पाच अ या जागेवर भाजपाच्या दुर्गा चंद्रभूषण हट्टीथेले यांचा विजय झाला होता. प्रभाग क्रमांक पाचमधील ब मध्ये भाजपाचे प्रवीण विलासराव भिसीकर यांचा विजय झाला होता. त्यानंतर पाचव्या वॉर्डमधील क जागेवर भाजपाच्या अभिरूची राजगिरे विजयी झाल्या होत्या. तर ड या जागेवरदेखील भाजपाचे भाजपाचे संजय चावरे विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक 06 मध्ये कोणाचा विजय झाला?

प्रभाग क्रमांक 6 मधील अ जागेवर बहुजन समाज पार्टीचे जितेंद्र घोडेस्वार विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक सहामधील ब या जागेवर बहुजन समाज पार्टीच्या वंदना राजू चांदेकर विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक सहामधील क जागेवर बहुजन समाज पार्टीच्या वैशाली नरनावरे यांचा विजय झाला होता. तर प्रभाग क्रमांक सहामधील ड या जागेवर बहुजन समाज पार्टीचेच इब्राहीम अहमद मो यांनी बाजी मारली होती.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

नागपूर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.