5

Kolhapur Flood : 2019 मध्ये महापुराच्या पाहणीसाठी फडणवीस 8 दिवसांनी आले होते, हसन मुश्रीफांचा टोला

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापुराच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. 2019 च्या महापुराच्या पाहणीसाठी देवेंद्र फडणवीस 8 दिवसांनी आले होते, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.

Kolhapur Flood : 2019 मध्ये महापुराच्या पाहणीसाठी फडणवीस 8 दिवसांनी आले होते, हसन मुश्रीफांचा टोला
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 11:10 AM

कोल्हापूर : सांगलीनंतर कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. अजित पवार यांनी शाहूपुरी आणि पंचगंगा नदी परिसरात पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापुराच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. 2019 च्या महापुराच्या पाहणीसाठी देवेंद्र फडणवीस 8 दिवसांनी आले होते, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे. (Hasan Mushrif criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis)

राज्यातील पूरग्रस्तांना पंचनामे केल्यावर मदत केली जाईल. येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मदतीची घोषणा केली जाईल. त्यात कुठलिही तांत्रिक अडचण होणार नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी किती मदत द्यायची यावर विचार होईल. केंद्र सरकारचे निकष ठरलेले आहेत. जास्त पाऊस पडल्यामुळे पाणी तुंबलं आहे. पाणी ओसरायला वेळ लागत नाही. पाणी ओसरल्याशिवाय पंचनामे होणार नाहीत. पंचनामे झाल्यावरच मदत दिली जाणार, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली आहे. 2019 च्या महापुराच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर 8 दिवसानंतर पाहणी दौऱ्यावर आले होते, अशी टीकाही मुश्रीफ यांनी केलीय.

अजित पवारांचा कोल्हापूर पाहणी दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ इथल्या जनता हायस्कुल परिसर आणि अर्जुनवाड रोड परिसरातील पूरस्थितीची पाहणी केली. त्याचबरोबर पूरग्रस्त नागरिकांशीही संवाद साझला. त्यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

सांगतील अजित पवारांकडू पूरग्रस्तांची विचारपूस

अजित पवार काल सकाळी 11च्या सुमारास भिलवडी येथे दाखल झाले होते. भिलवडीत प्रचंड पूर होता. त्यामुळे या भागातील नागरिकांना निवारा केंद्रात ठेवण्यात आलं आहे. अजितदादांनी थेट या निवारा केंद्रातच जाऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी निवारा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली. तुम्ही जिथे राहता तिथे महापुराचं पाणी नेहमी येतं का? पहिल्यांदाच पाणी आलं का? पाणी आलं तर किती वर्षानंतर आलं? असे प्रश्न त्यांनी निवारा केंद्रातील लोकांना केले. तसेच तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सर्व मदत देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिली. निवारा केंद्रात तुम्हाला जेवण मिळतं का? केंद्रातील व्यवस्था चांगली आहे का? असे प्रश्नही त्यांनी विचारले. तसेच लहान मुलांना जवळ बोलावून तुम्ही शाळेत जाता का? अशी चौकशीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत; शिवसेनेच्या ‘या’ खासदाराकडून शुभेच्छा

केंद्र सरकार आमचा बाप आहे, केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा: संजय राऊत

Hasan Mushrif criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis

Non Stop LIVE Update
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...