Kolhapur Rain : अलमट्टी धरणावर महाराष्ट्र सरकारचा अधिकारी ठेवलाय, प्रशासन सज्ज : हसन मुश्रीफ

काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची येडियुरप्पा यांच्याशी बोलणं झालं आहे. आलमट्टी धरणातून पाणी सोडलं जातं की नाही हे पाहण्यासाठी आलमट्टी धरणावर महाराष्ट्र सरकारचा अधिकारी ठेवला आहे.

Kolhapur Rain : अलमट्टी धरणावर महाराष्ट्र सरकारचा अधिकारी ठेवलाय, प्रशासन सज्ज : हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ, आलमट्टी धरण


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरुच आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आणि आता नदीची वाटचाल धोका पातळीकडे सुरु आहे. त्यामुळे नदीच्या परिसरात असलेल्या गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे. एनडीआरएफच्या दोन टीम दाखल झाल्या असून त्यांच्याकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम केलं जात आहे. याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज तरी परिस्थिती आटोक्यात असल्याचं म्हटलंय. मात्र दोन दिवस असाच पाऊस राहिला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी भीती मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केलीय. (Maharashtra government official deployed on Alamatti dam)

संभाव्य पूराचा धोका पाहता जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन केलं गेलं आहे. चिपळुणसारखी स्थिती कोल्हापूर जिल्ह्यात सध्यातरी नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मुश्रीफ यांनी केलंय. काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची येडियुरप्पा यांच्याशी बोलणं झालं आहे. आलमट्टी धरणातून पाणी सोडलं जातं की नाही हे पाहण्यासाठी आलमट्टी धरणावर महाराष्ट्र सरकारचा अधिकारी ठेवला आहे. परिस्थिती बिघडली तर एनडीआरएफच्या अजून टीम बोलावल्या जातील. नागरिकांना स्थलांतरित करायची वेळ आली तर होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांची वेगळी व्यवस्था केली जाईल, असंही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं.

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, नागरिकांनी यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावं

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केलंय.

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, सांगली-कोल्हापूरला थोडासा दिलासा

कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीजवळ पोहोचलेली आहे, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. तिकडे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने सांगली-कोल्हापूरला थोडा दिलासा मिळालेला आहे.

चिपळूण शहराला महापुराचा वेढा

चिपळूण शहरामध्ये सध्या पुन्हा पावसाला सुरुवात झालीय. चिपळूण शहरातील पाणी अद्यापही ओसरलेलं नाही. चिपळूण शहरातील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणमध्ये अनेक लोक पुरात अडकेलेले आहेत. चिपळूण शहरात 202 मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी भरतीची स्थिती त्यामुळे चिपळूणमध्ये 2005 पेभा भयानक स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुराच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. तर, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दोन हेलिकॉप्टर चिपळूणकडे रवाना झाली असून मदतकार्य करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण शहरामध्ये पूर परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली आहे. राज्य सरकारने तातडीने जातीनिशी लक्ष घालून लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे, असं मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलंय.

संबंधित बातम्या :

चांदोली धरण 86 टक्के भरलं,चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग, 6 हजार क्यूसेक पाणी नदीपात्रात, तर, कोयनेच्या विसर्गामुळे कृष्णा नदी पात्राबाहेर

Koyna Dam : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार, पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

Maharashtra government official deployed on Alamatti dam