AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : गावी आलो थेट, पण गाडी झाली लेट! जादा गाड्यांचा फटका, कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं

कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस, ओखा एक्स्प्रेस, फेस्टिवल स्पेशल, गणपती स्पेशल, जनशताब्दी, संपर्क क्रांती एक्स्प्रेस, मडगाव गणपती स्पेशल या गाड्यांनी असंख्य प्रवासी करत आहेत. मात्र जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक उशिराने सुरु आहे.

Video : गावी आलो थेट, पण गाडी झाली लेट! जादा गाड्यांचा फटका, कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं
कोकण रेल्वेImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 30, 2022 | 8:23 AM
Share

रत्नागिरी : रत्नागिरी-गणेशोत्सवाच्या (Ganpati Festival) जादा फेर्‍यांमुळे कोकण रेल्वेचे (Konkan railway) वेळापत्रक कोलमडलंय. रेल्वे गाडया दीड ते तीन तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमन्यांना गावाकडे पोहोचण्यासाठी तब्बल 10 ते 12 तासांहून अधिकचा वेळ लागतोय. कोकण रेल्वे (Train Running status) मार्गावरील जवळपास सर्वच गाड्या या उशिराने असल्याचं पाहायला मिळतंय. जवळपास साडेतीन लाख लोक कोकण रेल्वेने गावी दाखल झालेत. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमनी कोकणात जात असतात. यंदाही होच उत्साह आणि आनंद चाकरमन्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. कोरोनानंतर पहिल्यांदाच कोणत्याही नियमाशिवाय गणेशोत्सव साजरा केला जातोय. त्यामुळे लोकांमध्येही वेगळीच उर्जा दिसून येतेय. मात्र या आनंदावर कोकण रेल्वेच्या लेटमार्कने प्रवाशांचा हिरमोड केलाय.

लेट आलो, पण थेट आलो! पाहा चाकरमन्यांची पहिली प्रतिक्रिया

कोणत्या गाड्या किती तास उशिरा?

कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस, ओखा एक्स्प्रेस, फेस्टिवल स्पेशल, गणपती स्पेशल, जनशताब्दी, संपर्क क्रांती एक्स्प्रेस, मडगाव गणपती स्पेशल या गाड्यांनी असंख्य प्रवासी करत आहेत. मात्र जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक उशिराने सुरु आहे. कोकण रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी एकच ट्रॅक असल्यामुळे अनेक गाड्यांना साईडिंगला थांबावं लागतंय. त्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय.

  • कोकणकन्या दीड तास उशिरा,
  • तुतारी एक्सप्रेस 1 तास 20 मिनिटे उशिरा
  • ओखा एक्सप्रेस तब्बल 2 तास उशिरा
  • गणपती स्पेशल 1 तास 30 मिनिटं उशिरा
  • जनशताब्दी 1 तास उशिरा
  • संपर्क क्रांती 1 तास 30 मिनिटे उशिरा
  • मडगाव गणपती स्पेशल तब्बल 2 तास उशिरा

एसटीदेखील सज्ज!

एसटीचे कोकणासाठी 2000 जादा चालक नेमण्यात आलेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणाकडे जाणाऱ्या एसटीच्या नियमित बस गाड्यांसोबतच जादा गाड्यांचेही आरक्षण मोठ्या संख्येनं करण्यात आलंय. एसटीच्या जादा गाड्या मराठवाडा, खान्देश, विदर्भ आदी भागातून कोकणाकडे वळवण्यात आल्या आहेत. त्यासोबत जादा चालकांची कुमकही मागवण्यात आलीय. तब्बल 2 हजार चालक कोकणासाठी रवाना होणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहतुकीची धुरा सांभाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच कोकणातील रस्ते, घाट यापासून काही चालक पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. त्यामुळे त्यांना बस सुरक्षितरीत्या चालवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.