AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खवड्या डोंगरावर आई वडिलांना भीती घालण्यासाठी कुणाल गेलेला, हादरवून टाकणारी माहिती, नातेवाईकांनी..

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर मोठी दुर्देवी घटना घडली. मुलगा, आई आणि वडील यांचे निधन झाले. मुलाचा एक हट्ट आणि पूर्ण कुटुंब संपले. कुणालला वाचवण्यासाठी आई वडिलांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. तिघांनीही एकाचवेळी जगाचा निरोप घेतला.

खवड्या डोंगरावर आई वडिलांना भीती घालण्यासाठी कुणाल गेलेला, हादरवून टाकणारी माहिती, नातेवाईकांनी..
Kunal Chandgude
| Updated on: Aug 23, 2026 | 7:36 AM
Share

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर कुणाल चांदगुडे कड्याच्या अगदी जवळ उभा राहिला. यादरम्यान त्याची आई हात जोडून विनवण्या करत होती. लेकाला वाचवण्यासाठी तिने प्रत्येक प्रयत्न केला. हेच नाही तर मी वडिलांना सोडते म्हणत तिने गळ्यातील मंगळसूत्रही काढून फेकले. पण तीन तासाच्या प्रयत्नांना अपयश आले. कुणालचे वडील त्याला पकडण्यासाठी पुढे गेले आणि कुणाल आणि ते दोघेही पाय घसरून खाली कोसळले. नवऱ्याला आणि मुलाला कोसळताना पाहून आईने त्यांच्या पाठोपाठ उडी घेतली. या घटनेने देश सुन्न झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, कुणालला आयफोन 15 हवा होता. त्यावरूनच वडिलांसोबत त्याचा वाद झाला. मात्र, त्यानंतर खुलासा झाला की, कुणाल याच्याकडे दोन आयफोन होते. त्यामुळे वडिलांसोबत आयफोनवरून कोणताही वाद झाला नव्हता.

कुणाल आणि त्याच्या कुटुंबियात नक्की काय झाले, हे सांगायला तिघेही जिवंत नाहीत. मात्र, नातेवाईकांनी मोठा खुलासा केला. कुणालच्या काकांनी यादरम्यान बोलताना सांगितले की, त्याच्या आई वडिलांमध्ये छोटे वाद होते. पण कुणालला ते अजिबात हवे नव्हते. त्याला घरात शांती हवी होती. त्याचे वडील जास्त करून बाहेर राहायचे. तो आणि त्याची आई जास्त राहत.

तो त्याच्या आईवर खूप जास्त प्रेम करत होता. त्याचा जीव आईवर होता. तो खवड्या डोंगरावर आई वडिलांनी वाद करून नये, याकरिता त्यांना भीती घालण्यासाठी गेला होता. पण ज्यावेळी त्याचे वडील त्याला पकडण्यासाठी गेले, त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि दोघेही खाली पडले. काकांनी स्पष्ट केले की, कुणालच्या आई वडिलांमध्ये काही वाद होते. पण ते काही मोठे नव्हते, छोटेच होते.

हेच नाही तर ज्यावेळी कुणाल उडी मारण्यासाठी उभा होता, त्यावेळी त्याची आईही खाली उतरली होती. आईला खाली उतरल्याचे पाहून तिला वर जाण्यास तो सांगत होता. हेच नाही तर उपस्थित लोकांना तिला वर येण्यासाठी हात द्या, अशीही विनंती करताना कुणाल दिसला. तू वर जा… तू वर जा… असे तो आपल्या आईला वारंवार सांगत होता. आई वडिलांना भीती घालण्यासाठी कुणाल गेला आणि पूर्ण कुटुंब संपले.

Follow Us
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?