AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, आदिती तटकरेंची मोठी घोषणा, ‘या’ तारखेपासून खात्यात खटाखट पैसे जमा होणार

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, आदिती तटकरेंची मोठी घोषणा, 'या' तारखेपासून खात्यात खटाखट पैसे जमा होणार
Ladki Bahin Yojana
| Updated on: Nov 03, 2025 | 10:43 PM
Share

राज्य सरकारची सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी योजना म्हणून लाडकी बहीण योजना ओळखली जाते. आता लाडक्या बहि‍णींसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहि‍णींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरूवात होणार आहे. तसेच लाडक्या बहि‍णींच्या केवायसीबद्दलही तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आदिती तटकरेंची घोषणा

लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून वितरित होण्यात सुरुवात होणार आहे. याबाबत माहिती देताना आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.

महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !

कशी कराल e-KYC प्रक्रिया ?

  • लाभार्थी महिलांनी मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट द्यावी.
  • लॉगिन केल्यावर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे.
  • तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) नोंदवा.
  • आता कॅप्चा कोड (Captcha Code) तिथे नोंदवा.
  • आधार प्रमाणिकरणासाठी मंजूरी द्या. Send OTP या पर्यायावर क्लिक करावे.
  • आधारशी लिंक मोबाईल क्रमांकावर OTP नमूद आल्यावर तो Submit करावा.
  • त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील
  • 1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
  • 2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
  • शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.