AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena | धनुष्यबाण शिंदेंना द्यावं, उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या भांडणात आता रामदास आठवलेंची उडी

मूळ शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेलं धनुष्यबाण हा आपल्याकडेच राहील, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Shivsena | धनुष्यबाण शिंदेंना द्यावं, उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या भांडणात आता रामदास आठवलेंची उडी
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 5:07 PM
Share

लातूर : शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाला मिळणार, एकनाथ शिंदेंकडे (Ekanth Shinde) जाणार की उद्धव ठाकरेंकडेच राहणार. अवघ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नावर अनेक कायदेतज्ज्ञ आपापल्या परीने उत्तरं शोधत आहेत. सुप्रीम कोर्टात (Supreme court) यासंदर्भातल्या याचिकांच्या सुनावणीसाठी आता घटनापीठ नेमण्यात आलंय. मात्र केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी अगदी सहजरित्या या वादाचा निर्वाळा केला. लातूरमध्ये पत्रकारांशी बोलताना रामदास आठवलेंनी या वादावर भाष्य केलं. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह देऊन टाकावं आणि उरलेलं ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं घ्यावं… इतक्या सहजपणे आठवलेंनी उत्तर सांगितलं. यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. शीघ्र कवी आणि आश्चर्यकारक भूमिकांमुळे प्रसिद्ध असलेल्या रामदास आठवलेंनी शिंदे-ठाकरेंच्या वादावर केलेलं हे भाष्यही सध्या चांगलंच चर्चेत आहे.

रामदास आठवले काय म्हणाले?

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज लातूर जिल्हा दौऱ्यावर होते. उदगीर इथं ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वादावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळेल, यावर बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदेंकडे 40 आमदार आहेत. त्यामुळे धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंकडे जाईल आणि उरलेलं शिवसेनेनं घ्यावं, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं.

यापू्र्वीही घेतली होती शिंदेंची बाजू

महाविकास आघाडीतून एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार अल्पमातत आलं होतं. त्यावेळीदेखील रामदास आठवेंनी एकनाथ शिंदे गटाची बाजू घेतली होती. 20 जून रोजी शिंदेंसह अनेक आमदार आधी सूरत आणि नंतर गुवाहटीत गेले होते. त्यावेळी 25 जून रोजी केंद्री मंत्री रामदास आठवले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली. एकनाथ शिंदेंना अडचण आली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांना पाठिंबा देण्यासाठी तयार आहे. तसेच सरकार अल्पमतात आले तर एकनाथ शिंदेंचा गट मोठा आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा दिली पाहिजे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.

‘धनुष्यबाण शिवसेनेचाच’

मूळ शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेलं धनुष्यबाण हा आपल्याकडेच राहील, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदारांचं संख्याबळ असल्याने ते धनुष्यबाण चिन्हावर दावा ठोकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच शिवसैनिकांना आता धनुष्यबाणाव्यतिरिक्त दुसरं चिन्ह मिळालं तरीही ते नवं चिन्ह घरा-घरात पोहोचवण्याची तयारी ठेवा, असं आवाहन केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र उघडपणे दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही धनुष्यबाण शिवसेनेचंच राहिल, असे सांगत आहेत. तसेच शिंदेगटाकडे आमदारांचं संख्याबळ असलं तरीही विधीमंडळ पक्ष वेगळा आणि मूळ पक्ष वेगळा असतो, असं स्पष्टीकरण देण्यात येत आहे. आता शिवसेना-शिंदेगटाच्या याचिकांवरील घटनापीठासमोरील सुनावणीनंतरच यातील पेच सुटण्याची शक्यता आहे.

बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं....
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.