AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! वकील असीम सरोदे यांच्या जीवाला भाजपा आमदाराकडून मोठा धोका, थेट म्हणाले राम खाडे यांच्यानंतर…

Lawyer Asim Sarode on BJP MLA Suresh Dhas : वकील असीम सरोदे यांनी नुकताच अत्यंत हैराण करणारा आणि खळबळ उडवणारा खुलासा केला. भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले.

मोठी बातमी! वकील असीम सरोदे यांच्या जीवाला भाजपा आमदाराकडून मोठा धोका, थेट म्हणाले राम खाडे यांच्यानंतर...
awyer Asim Sarode and MLA Suresh Dhas
| Updated on: Nov 29, 2025 | 1:09 PM
Share

बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. त्यामध्येच राम खाडे यांनी सुरेश धस यांचे 1000 कोटींची जमीन हडपल्याचे प्रकरण काढले. हे प्रकरण माझ्याकडे होतं मी काही दिवसांपूर्वीच राम खाडे याला काळजी घ्या सांगितलं होते. त्यानंतर राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवाला देखील धोका असल्याचा खळबळजनक खुलासा वकील असीम सरोदे यांनी केला आहे. राम खाडे यांच्यावर हल्ल्या झाल्यानंतर राम खाडे यांच्या जवळच्या लोकांकडून भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला. 1000 कोटींची जमीन हडपल्याचे सुरेश धसांचे प्रकरण राम खाडे यांनी काढले होते. त्यामुळे सुरेश धस यांच्या लोकांकडून राम खाडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. राम खाडे यांच्यावर सध्या पुण्यात उपचार सुरू असून त्यांची तब्येत नाजूक आहे. या प्रकरणात असीम सरोदे यांनी केलेल्या खुलाशानंतर खळबळ माजली आहे.

असीम सरोदे tv9 सोबत बोलताना म्हणाले की, काही हजारो एक्कर जमीन सुरेश धस यांच्या पुढाकारातून जी देवस्थानची जमीन असते. सुरेश धस यांनी पुढाकार घेऊन आणि स्वत:च्या पदाचा वापर करून देवस्थानांच्या अनेक जमीनी खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे वळून घेतल्या. त्याच्यावर प्लॉट पाडले आणि ते प्लॉट विकले सुद्धा. असा एक खूप मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे, असं एक राम खाडे यांचे म्हणणे होते.

राम खाडे यांनी माहितीच्या अधिकारात याबद्दलची बरीच मोठी माहिती काढली होती. बीडमधील हे सर्व प्रकरण आहे. मुख्यत: देवस्थानाच्या जमीन हडप करणे ते देखील भाजपाच्या एका आमदाराने हे फार गंभीर प्रकरण म्हणून पुढे आलेले होते. त्यावेळी पोलिसांकडे तक्रारी करूनही ते दखल घेत नसल्याने राम खाडे यांच्या मार्फत आम्ही मुंबईच्या ईडी ऑफिसमध्ये तक्रार केली होती. त्याच्यासोबत माझ्या माहितीप्रमाणे एक दोनसे ते तीनसे कागदपत्रे लावली होती.

पुढे बोलताना असीम सरोदे यांनी म्हटले की, धडधडीत पुरावा दिसत होता की, 1000 कोटींच्या वर जमीनींच घोटाळा सुरेश धस यांनी केला आहे. आता सुरेश धस यांच्याकडून माझ्याही जीवाला धोका असल्याचे असीम सरोदे यांनी म्हटले आहे. आता देवस्थानांची जमीन हडप करण्याच्या प्रकरणामध्ये भाजपा आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत अत्यंत मोठी वाढ झाल्याचे दिसतंय. भाजपाकडून या प्रकरणात काय भूमिका घेतली जाते हे देखील पाहण्यासारखे ठरेल.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.