AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मळभ दूर… अखेर महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा; शपथविधी उद्याच!

उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी आता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे.

मळभ दूर... अखेर महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा; शपथविधी उद्याच!
| Updated on: Dec 04, 2024 | 3:34 PM
Share

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र नव्या सरकारच्या शपथविधीसाठी वेळ लागत असल्यानं नव्या मंत्रिमंडळाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर उद्या मुंबईतल्या आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यापूर्वी महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. आज भाजपकडून विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. 132  जागा जिंकून भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे मुख्यमंत्री देखील भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नीवड झाल्यानं तेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्याान भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नीवड झाल्यानंतर आता वेगानं घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक वर्षावर पार पडली. या बैठकीनंतर आता राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. संख्याबळासाठी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यापालांना देण्यात आलं आहे. देवेंद्र फडणीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

उद्या शपथविधी  

उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल 22 राज्यातील मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल चाळीस हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान महायुतीच्या नव्या सरकारामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा जुनाच पॅटर्न कायम राहणार आहेत. उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत. मात्र त्यांच्यासोबत आणखी कोण -कोण मंत्रिपदाची शपथ घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?