AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranjitsinh Disale: डिसले गुरुजींचा राजीनामा का दिला? राजिनाम्याचे पत्रच tv9 च्या हाती; पत्रात नमूद आहे राजीनाम्याचे कारण

डिसलेंनी दिलेल्या राजिनाम्याची प्रत tv9 मराठीच्या हाती लागली असुन त्यात गुरुजींनी मी वैयक्तिक कारणामुळे शिक्षक पदाचा राजिनामा देत असल्याचे नमुद केले आहे. माढा पंचायत समिती कार्यालयातील शिक्षण विभागात त्यांनी स्वत:येऊन अर्ज दिला होता. माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणुन कार्यरत आहेत.

Ranjitsinh Disale: डिसले गुरुजींचा राजीनामा का दिला? राजिनाम्याचे पत्रच tv9 च्या हाती; पत्रात नमूद आहे राजीनाम्याचे कारण
ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 4:12 PM
Share

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी (Global Teacher Award winning teacher Ranjit Singh Disley) यांनी जिल्हा परिषद शिक्षक पदाचा राजीनामा दिल्याची माहिती 12 जुलै रोजी सोमर आली.   त्यांच्या राजीनान्याचे वृत्त येताच सर्वत्र खळबळ उडाली होती.  रणजितसिंह डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा प्राथमिक शिक्षण विभागाकडे सोपविला आहे. 7 जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिला असून तो गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडेही आल्येची समजले. मात्र, त्यांच्या राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात होते.  यामुळे त्यांनी राजीनामा का दिला? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. या सर्व प्रश्नांची उत्तर सापडली आहेत. डिसले गुरुजींच्या राजिनाम्याचे पत्रच tv9 च्या हाती लागले आहे. या पत्रात त्यांनी राजीनाम्याचे कारण नमूद केले आहे.

ग्लोबल टीचर अशी जगभरात ओळख निर्माण झालेल्या रणजितसिंह डिसले गुरुजींनी सोलापूर च्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे अर्ज शिक्षक पदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. डिसलेंनी तडकाफडकी राजीनामा नेमका कश्यासाठी दिला याबाबत अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत.

का दिला डिसले गुरुजींनी राजीनामा?

दुसरीकडे मात्र डिसलेंनी दिलेल्या राजिनाम्याची प्रत tv9 मराठीच्या हाती लागली असुन त्यात गुरुजींनी मी वैयक्तिक कारणामुळे शिक्षक पदाचा राजिनामा देत असल्याचे नमुद केले आहे. माढा पंचायत समिती कार्यालयातील शिक्षण विभागात त्यांनी स्वत:येऊन अर्ज दिला होता. माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणुन कार्यरत आहेत.

गटशिक्षण अधिकारी बंडु शिंदे यांनी डिसलेंचा अर्ज व त्याचे सेवा पुस्तक प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना पाठवले आहे. त्यानुसार आता डिसले गुरुजींच्या अर्जावर जि.प.चे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

क्युआर कोड शिक्षण प्रणाली विकसीत केल्यामुळे मिळाला ग्लोबल टिचर पुरस्कार

क्युआर कोड शिक्षण प्रणाली विकसीत करणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना दोन वर्षापुर्वी ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाला होता. त्यातच त्यांनी आता राजिनामा दिल्याने गुरुजीचा राजीनामा नेमका कश्यासाठी ? असा प्रश्न उपस्थित झालाय.याबाबतची रणजितसिंह डिसले गुरुजींनी कसलीही प्रतिक्रिया समोर आलेली नसुन त्याचा संपर्क होत नाही.

पीएचडीसाठी अमेरिकेला  जाण्यावरुन वाद

डिसले गुरुजींच्या अमेरिकेला पीएचडीसाठी (America Ph.D) जाण्यासाठीच्या रजेवरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात खुद्द राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मध्यस्थी करावी लागली होती. त्यानंतर वर्षा गायकवाड यांच्या सूचनेवरून अखेर सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांना रजेची मंजुरीही देण्यात आली होती. त्यामुळे ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांचा अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

चौकशीचा ससेमिरा लागला

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, दोन वर्षांत ते ‘डायट’कडे फिरकलेच नाहीत. त्यांनी ग्लोबल टिचर ॲवार्डची तयारी करण्यातच तो कालावधी घालवला, अशी तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आणि त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला होता.

त्यावेळी मात्र त्यांनी माफीनामा दिला

तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी चौकशी करून अहवाल तसाच ठेवण्यात आला होता. विद्यमान शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी तो अहवाल पुन्हा उघडला आणि त्यांची स्वतंत्र चौकशी करून कारवाईची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली होती. तत्पूर्वी, त्यांनी अमेरिकेत फेलोशिपला जाण्यासाठी रजा मागितली होती. पण, अपूर्ण कागदपत्रांमुळे त्यांचा अर्ज तसाच प्रलंबित ठेवण्यात आला होता. कागदपत्रांची पूर्तता न करताच त्यांनी रजा मागितली होती. पण, त्यावेळी त्यांच्या रजेचा विषय तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहचला आणि त्यांच्या आदेशाने डिसले गुरुजींना रजाही मिळाली होती. त्याचवेळी त्यांनी शिक्षण विभागातील काहींनी माझ्याकडे पैसे मागितले, असा आरोपही केला होता. पण, त्यांना त्याचा पुराव्यानिशी खुलासा करण्याचे पत्र जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आले होते, त्यावेळी मात्र त्यांनी माफीनामा दिला होता.

शिक्षण विभाग आणि डिसले गुरुजींमध्ये कलगीतुरा

क्युआर कोड शिक्षण प्रणाली विकसीत करणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना दोन वर्षांपूर्वी ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाला होता. आता शिक्षण विभाग आणि डिसले गुरुजींमध्ये यांच्यात कलगीतुरा निर्माण झाला आहे. त्यातूनच हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. पण, राजीनामा मागे घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असते. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.