नाशिक : नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात (Nashik Zakir Hussain hospital) ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे ऑक्सिजनअभावी तब्बल 22 कोरोनाग्रस्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश आहे. या दुर्दैवी अपघातात प्राण गमवावे लागलेल्या रुग्णांची संपूर्ण यादी समोर आली आहे. 33 वर्षांच्या तरुणापासून 74 वर्षीय वृद्धापर्यंत विविध वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. (List of Patients died in Dr Zakir Hussain Hospital Nashik Oxygen Leak)