मोठी बातमी! …तर आम्ही शिवसेना शिंदे गटाशी संबंध तोडू, नारायण राणेंचं मोठं वक्तव्य
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, या पार्श्वभूमीवर बोलताना आता नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राणे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

भाजप नेते नारायण राणे यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी यावेळी शिवसेना शिंदे गटाबाबत देखील मोठं वक्तव्य केलं आहे. कोकणात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर बोलताना नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. असं जर झालं तर आम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत संबंध तोडू असं राणे यांनी म्हटलं आहे. राणे यांच्या या विधानामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया
दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होऊ शकते अशी चर्चा आहे, यावर बोलताना राणे यांनी दोन्ही ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या अनेक बातम्या येत आहेत. उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्यामध्ये सरकारवर आरोप करत आहेत, आता ते बोलत आहेत, पण ते मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं? असा सवाल यावेळी राणे यांनी उपस्थिती केला आहे. आता त्यांचं सगळं अस्तित्व संपत चाललं आहे. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बोलत आहेत, पण सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांकडेही नाही, जेव्हा त्यांची मुंबईमध्ये सत्ता होती तेव्हा त्यांनी काय केलं? आपलं राजकीय अस्तत्व निर्माण करण्याचं काम हे लोक करत आहेत, असा हल्लाबोल यावेळी राणे यांनी केला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काहीही झालं तरी युती करायचं आम्ही ठरवलेलं आहे. मला वाटतं ही युती व्हावी. दोन्ही जिल्ह्यात भाजपा नगराध्यक्ष बसावा, 80 टक्के जागा वर आमचा युतीचा विजय होईल, सर्वांची इच्छा आहे युती व्हावी आम्ही सुद्धा इच्छा आहे, युती व्हावी. आपला अध्यक्ष कसा बसेल याचा विचार भाजपाने करावा. रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक घ्यावी, असंही यावेळी राणे यांनी म्हटलं आहे.
