लोकसभा निवडणूक 2024: विदर्भातील पाच मतदारसंघात आज मतदान, नागपुरात किती मतदारसंघ संवेदनशील?; मतदार किती?

महिन्याभरापूर्वी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आणि देशभरात निवडणुकीच्या तयारील भलताच वेग आला. पक्षांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या याद्या, निवडणूक अर्ज, प्रचारसभांनाही वेग आला. आज ( १९ एप्रिल) देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरूवात झाली असून महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे.

लोकसभा निवडणूक 2024: विदर्भातील पाच मतदारसंघात आज मतदान, नागपुरात किती मतदारसंघ संवेदनशील?; मतदार किती?
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 11:35 AM

Lok Sabha Election 2024 News in Marathi : महिन्याभरापूर्वी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आणि देशभरात निवडणुकीच्या तयारीला भलताच वेग आला. पक्षांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या याद्या, निवडणूक अर्ज, प्रचारसभांनाही वेग आला. आज( १९ एप्रिल) देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरूवात झाली असून महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. आज सकाळपासूनच देशभरासह महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली असून  राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान सुरू आहे.

नागपुरात किती मतदारसंघ संवेदनशील ?

विदर्भातील पाच मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

– पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठी आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

– नागपुरात लोकसभा मतदारसंघात 61 संवेदनशील मतदान केंद्र आहेत.

– तर रामटेक लोकसभा मतदारसंघात 63 संवेदनशील मतदान केंद्र.

– नागपूर आणि रामटेक मतदारसंघात एकूण 4510 मतदान केंद्र आहेत.

– नागपूर लोकसभा मतदारसंघात 2105 मतदारसंघ, तर रामटेकमध्ये 2405 मतदान केंद्र

– नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघात 42 लाख 72 हजार 366 मतदार

– नागपूर लोकसभा मतदारसंघात 22 लाख 23 हजार 281 मतदारांची नोंदणी

– तर रामटेक मतदारसंघात 20 लाख 49 हजार 85 मतदारांची नोंदणी

– नागपूर मतदारसंघात 11 लाख 13 हजार 182 पुरुष, आणि 11 लाख 9 हजार 876 महिला, 223 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

– रामटेक मतदारसंघात 10 लाख 44 हजार 891 पुरुष, 10 लाख 4 हजार 142 महिला, 52 तृतीयपंथी मतदारांचा समावेश

– नागपुरात 26 तर रामटेकमध्ये 28 उमेदवार आहेत. दोन्ही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाआघाडी अशी थेट लढत

मुख्य लढती कोणाच्या ?

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीकरून पाठिंबा देण्यात आला आहे .

तर चंद्रपूरची लढत सुद्धा लक्षवेधी होण्याची चिन्हे आहे. 15 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. भाजपकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. गडचिरोलीमध्ये सुद्धा भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत होणार आहे. भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे किरसन नामदेव असा सामना रंगणार आहे.

रामटेकची लढत देखील लक्षवेधी

रामटेकची लढत सुद्धा लक्षवेधी ठरणार आहे. काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत लोकसभेचे उमेदवारी मिळवली आहे. शिंदे गटात सामील झालेल्या विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांची उमेदवारी कट करून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्यासाठी अभिनेता गोविंदा यांनीही प्रचार केला होता. काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे रिंगणात आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने त्या अडचणीत सापडल्या होत्या. अखेर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली.

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीअंतर्गत मतदान केंद्राकडे पोलिंग पार्टी किट घेऊन रवाना

भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी 18 उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महायुतीचे सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे डॉ प्रशांत पडोळे यांच्यामध्ये थेट लढत होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 2,133 मतदान केंद्रावर उद्या होणाऱ्या मतदानासाठी भंडारा येथून पोलिंग पार्टी मतदान केंद्राकडे किट घेऊन रवाना करण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने राज्य राखीव, केंद्रीय राखीव दलाच्या तीन तुकड्या आणि कृती दलाचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यात 5,132 तर गोंदिया जिल्ह्यात 4,134 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे

महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये कुठे, कधी मतदान ?

महाराष्ट्रातही लोकसभेच्या 48 जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार असून शेवटच्या अर्थात पाचव्या टप्प्यातील मतदान हे 20 मे रोजी होणार आहे.

पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा – 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा – 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?.
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका.
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.