AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साहेबांनी किती वेळा पक्ष बदलला… अजित पवार यांनी तारखांसह उघड केले शरद पवारांचे पक्षांतर

Ajit pawar on Sharad pawar: 2014 साली भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. विचारले तर म्हणाले की, ही स्ट्रेटजी आहे. त्यांनी केले की स्ट्रेटजी आणि आम्ही केले ते गद्दारी. हे अवघड आहे. त्यावेळी आम्हाला सांगितले की, आपल्याला मंत्रिमंडळामध्ये जायचे आहे, पण तसे झाले नाही.

साहेबांनी किती वेळा पक्ष बदलला... अजित पवार यांनी तारखांसह उघड केले शरद पवारांचे पक्षांतर
ajit pawar
| Updated on: May 02, 2024 | 2:37 PM
Share

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. त्याचवेळी राज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. सर्वच बडे नेते रोज चार, पाच सभा घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही सभांचा धडका लावला आहे. या सभांमध्ये अजित पवार गॉगल वापरताना दिसत आहेत. इंदापूर तालुक्यातील सभेत अजित पवार यांनी राजकीय भाष्य करत शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ले केले आहेत. शरद पवार यांनी कितीवेळा पक्ष बदलला ते तारखांसह सांगितले आहे. तसेच ज्या नेत्यांनी त्यांना मोठे केले, त्यांनाच कसा धोका दिला आहे, हे सांगितले. यावेळी अजित पवार यांनी गॉगल वापरण्याचे कारण सभेत सांगितले. ”माझ्या डोळ्याच्या रेटिनाचे ऑपरेशन झाले आहे. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला गॉगल वापरावा लागत आहे. नाहीतर म्हणाल, हा शायनिंग मारायला लागला आहे,” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

अजित पवार म्हणाले, आजच्या सभेच्या निमित्ताने येत असताना मला मागील आठवणी ताज्या झाल्या. मला पाहिली सभा आठवली. अनेक लोक त्यावेळी माझ्यासोबत होती. परंतु ती माणसे आता सोबत नाहीत, हा नियतीचा खेळ आहे. ही निवडणूक गावकी भावकीची नाही तर देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. यामुळे तुम्हाला मोदी पंतप्रधान पाहिजेत की राहुल गांधी पंतप्रधान पाहिजेत हे ठरवा.

शरद पवार यांची साथ का सोडली…

अजित पवार म्हणाले की, अनेकांना हा प्रश्न आहे की मी हा निर्णय का घेतला? आपण सगळ्यांनी माझे काम बघितलं आहे. तुम्ही सगळ्यांनी मला कारखान्याचे संचालक केले. माझा स्वभाव पाहिल्यावर मला कधी वाटले नव्हते की मी राजकारणात येईल. कारण मी एक घाव दोन तुकडे करत असतो. आता काहीजण म्हणतात की, या वयात दादांनी साहेबांना सोडायला नको होते. परंतु मी साहेबांना कधी सोडले नाही.

मी 1987 पासून 2023 पर्यंत साहेब म्हणतील ती पूर्व दिशा म्हणत होतो. आधी आमचे कुटुंब शेकापच होते. त्याही वेळी सर्व कुटूंब एकीकडे आणि पवार साहेब एकीकडे होते. 1967 ला साहेबांना चव्हाण साहेबांनी संधी दिली. 1978 ला वसंतदादांचे सरकार पाडले. त्यावेळी त्यांनी चव्हाण साहेबांचे ऐकलं नाही. ज्यांनी संधी दिली त्यांना पाडले. अनेक वेळा साहेबांनी पक्ष बदलला, असा हल्ला शरद पवार यांच्यावर अजित पवार यांनी केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांनी पक्ष बदललेल्या सगळ्या तारखा वाचून दाखवल्या.

…पण साहेबांनी ऐकले नाही

साहेब दिल्लीत गेले आणि राज्याचे सगळे मी बघण्यास सुरुवात केली. परंतु सगळ्या संस्था साहेबांकडे होत्या. त्यांनी 1999 ला नवीन मुद्दा काढला आणि म्हणाले की, सोनिया गांधी परदेशी आहेत. त्यामुळे ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि नवीन पक्ष त्यांनी काढला. त्यानंतर पुन्हा काँग्रेस सोबत गेले. परंतु आम्ही काही बोलू शकत नव्हतो. कारण ते वडील होते. 2004 ला आमचे जास्त आमदार निवडून आले होते. विलासराव मला बोलले की मुख्यमंत्री तुमचा करा. पण साहेबांनी ऐकलं नाही.

2014 साली भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. विचारले तर म्हणाले की, ही स्ट्रेटजी आहे. त्यांनी केले की स्ट्रेटजी आणि आम्ही केले ते गद्दारी. हे अवघड आहे. त्यावेळी आम्हाला सांगितले की, आपल्याला मंत्रिमंडळामध्ये जायचे आहे, पण तसे झाले नाही. 2017 ला देखील आम्हाला चर्चा करायला लावली. भाजपसोबत त्यावेळी सगळे ठरले होते. त्यानंतर 2019 ला बैठक झाली. त्यावेळीही सगळे ठरले होते. अमित शहा यांनी मला सांगितले की, अजित आधीच अनुभव चांगला नाही. ठरले तसे वागावे लागेल. पण पुढे असे झाले नंतर मुंबईत आलो. त्यांनी सांगितलं की, शिवसेना आणि काँग्रेससोबत जायचं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.