Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एखादा टिनटप्पर मुंबईवरून उडून येतो आणि … नवनीत राणा संजय राऊतांवर कडाडल्या

' एखादा टिन टप्पर मुंबईवरून उडून येतो आणि अमरावतीच्या सुनेवर खालच्या पातळीवर बोलत असेल, तर त्याला अमरावतीची जनता सहन करणार नाही' असे म्हणत नवनीत राणांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. अमरावतीच्या सुनेला हलक्यात घेऊ नका असा इशाराही नवनीत राणांनी दिला.

एखादा टिनटप्पर मुंबईवरून उडून येतो आणि ... नवनीत राणा संजय राऊतांवर कडाडल्या
नवनीत राणा संजय राऊतांवर कडाडल्या
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 8:34 AM

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून प्रचाराला धडाक्यात सुरूवात झाली आहे. अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण तापलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. आता नवनीत राणा यांनीही संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर हल्ला चढवला. ‘ एखादा टिन टप्पर मुंबईवरून उडून येतो आणि अमरावतीच्या सुनेवर खालच्या पातळीवर बोलत असेल, तर त्याला अमरावतीची जनता सहन करणार नाही’ असे म्हणत नवनीत राणांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. अमरावतीच्या सुनेला हलक्यात घेऊ नका असा इशाराही नवनीत राणांनी दिला.

नवनीत राणांचा हल्लाबोल

एखादा टिन टप्पर मुंबईवरून उडून येते आणि अमरावतीच्या सुनेवर खालच्या पातळीवर बोलत असेल, तर त्याला अमरावतीची जनता सहन करणार नाही. तुमची लायकी काय आहे ? पाच टर्म या ठिकाणी शिवसेनेने अमरावती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं, तुमची लायकी तेवढी राहिली नाही की तुम्ही हा मतदारसंघ मागून या मतदारसंघात उमेदवार देऊ शकले नाही, तेवढीच लायकी तुमची आहे अशा शब्दांत नवनीत राणा संजय राऊतांवर कडाडल्या. तुमची बोलायची पातळी एवढी घसरली की तुम्हाला महिलांचा मान आणि सन्मान तुमच्या डोक्यात राहीला नाही. अमरावती एवढी सोपी नाही, अमरावती को इतने हलके मे मत लेना. आणि अमरावतीच्या सुनेलाही जास्त हलक्यात घेऊ नका असा इशारा नवनीत राणा यांनी संजय राऊत यांना दिला.

यापूर्वीही नवनीत राणा यांनी संजय राऊत यांना खडेबोल सुनावले होते. आमचा जिल्हा अंबानगरी म्हणून ओळखला जातो. त्याच अंबानगरीत येऊन एका महिलेची इतक्या खालच्या पातळीवर टीका करणं, मी तर कलाकार होती. पण माझ्या वडिलांनी जे योगदान या देशासाठी दिलं आहे, त्यांनी देशाच्या सीमेवर नागरिकांच्या सेवेसाठी योगदान दिलं आहे. मी माझं काम केलं आणि मी माझ्या लोकांची सेवा करत आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या. संजय राऊत यांना विचारुन घ्या की ते काय शब्द बोलले आहेत. त्यांच्या मुलीचं जेव्हा लग्न झालं, त्यांनी ज्यांना सासरी पाठवलं त्यांना विचारा की ते काय शब्द बोलले. त्यांच्या आईला ज्यांनी त्यांना जन्म दिला आहे त्या आईला विचारा की त्यांनी काय शब्द वापरले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे जे थोडेफार लोकं राहिले आहेत त्यामध्ये सर्वात बोगस व्यक्ती हे संजय राऊत आहेत. संजय राऊत यांना या अंबानगरीची महिला 26 एप्रिलला दाखवणार आहे की, महिलांची काय ताकद आहे, अशा शब्दात नवनीत राणा यांनी संजय राऊत यांना सुनावलं होतं. हा महिलांचा अपमान असून राऊतच सध्या काँग्रेसच्या दरबारात नाचत असल्याचा पलटवार रवी राणांनी केला.

संजय राऊत यांचं वादग्रस्त वक्तव्य काय ?

“विकासाचं पोरगं तुम्हाला झालं नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याचे नवरे करता. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचं नाही. आपला उमेदवार बळवंत वानखेडे आहे. रात्र वैऱ्याची आहे. रात्रीस खेळ चाले”, असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. तसेच नवनीत राणा यांनीही संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....