AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोणावळा आणि सासवड या शहरांना सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पुरस्कार जाहीर

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-2021 मध्ये लोणावळा आणि सासवड या शहरांना सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येत्या 20 नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

लोणावळा आणि सासवड या शहरांना सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पुरस्कार जाहीर
lonavala-nagar-parishad
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 6:55 PM
Share

पुणे- केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-2021 मध्ये लोणावळा आणि सासवड या शहरांना सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येत्या 20 नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

जुन्नर, शिरूर, लोणावळा, सासवड, जेजुरी, इंदापूर या शहरांनादेखील कचरा मुक्त शहरे म्हणून केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे पुरस्कृत करण्यात येणार आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नगर परिषदांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

लोणावळा नगरपरिषदेने राबवल्या या उपाय योजना

  • स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेने पर्यटकांमुळे होणाऱ्या कचऱ्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती आकारणी करत दंड आकारला.
  • व्यापारी, पर्यटन व सार्वजनिक ठिकाणी लीडचे झाकण असलेले जोड डब्बे बसवले.
  • लोणावळा शहरात घरगुती कचरा हा वेगळा केला जातो.
  • ओला, सुका, घातक आणि प्लास्टिक तसेच घातक व सॅनिटरी कचरा विलगीकृत घेतला जातो.
  • कचरा विलागिकरणाचे प्रमाण हे 100 टक्के आहे.
  • शहरातील नागरिक हे स्वत:ही घरचे घरी किचन वेस्ट पासून खत तयार करतात.

शहरातील सांडपाणी प्रक्रियेसाठी नगरपरिषदेमार्फत एसटीपी प्रकल्प आणि एफएसटीपी प्रकल्प डोंगरगाव येथे बांधण्यात आला आहे. एकूण 40 शौचालयांपैकी 10 शौचालये ताराकिंत शौचालये म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्या तारांकित शौचालयामध्ये नेहमी मिळणाऱ्या सुविधांपेक्षा जास्त सुविधा जसे हँड वॉश, हॅड ड्रायर, सॅनिटरी नॅपकिन, इनसायनरेटर मशीन अशा अनेक सुविधा देण्यात येतात.

सासवड नगरपरिषदे केली अशी स्वच्छता

  • सासवड नगरपरिषदे घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा 100 टक्के संकलित केला जातो.
  •  प्लॅस्टीक बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी.
  • नागरिकांना अल्पदरात पुर्नवापरयोग्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या.
  • शहरातील जुन्या कचऱ्यावर 100 टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते.
  • नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध मोहिमा राबविल्या.

कचरा डेपोमध्ये येणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे पुनर्वापर करण्यात येते. नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. तसेच शासनाच्या ‘हरित ब्रॅण्ड’ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

हागणदारी मुक्त गाव योजनेअंतर्गत 600 लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आली आहेत. शहराला ओडीएफ डबल प्लस दर्जा प्राप्त झाला. सासवड नगरपरिषदेने शहरामध्ये 6 हजारहून अधिक वृक्षांची लागवड व जोपासना केलेली आहे. प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने सणांच्या दिवसांमध्ये पर्यावरणपूरक मुर्ती निर्माल्य संकलन कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या:

शूटरला 1 लाख दिले, हात निकामी झाल्यामुळे पत्नीला थेट गोळ्या घातल्या, थरकाप उडवणारा हत्येचा कट

Pimpri ChinchwadCrime |सरकारी नोकरी पडली ८.५ लाखाला; फसवणूक प्रकरणी टीसीला अटक

भाबड्या शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा, 30-30 योजनेचा सूत्रधार संतोषची ऐशोरामात राहणी, औरंगाबादेत दोघांवर गुन्हे दाखल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.