AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीती आणि धाकधूक… मतदानाला जाण्यापूर्वी 95 टक्के उमेदवारांनी केली ही गोष्ट, त्यानंतरच…

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होत आहे. आज महाराष्ट्रात मतदान पार पडत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे.

भीती आणि धाकधूक… मतदानाला जाण्यापूर्वी 95 टक्के उमेदवारांनी केली ही गोष्ट, त्यानंतरच…
| Updated on: Nov 20, 2024 | 9:18 AM
Share

Maharashtra Assembly Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. या 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होत आहे. आज महाराष्ट्रात मतदान पार पडत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. मतदानाला सुरुवात होताच महाराष्ट्रातील बहुतांश उमेदवारांनी देवदर्शन करत मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी त्यांचे कुटुंबाकडून औक्षणही करण्यात आले.

शायना एनसींकडून मुंबादेवी चरणी प्रार्थना

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांनी मतदानापूर्वी मुंबादेवीचे दर्शन घेतलं आहे. शायना एनसी या शिवसेना शिंदे गटाकडून मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार आहेत. मतदानापूर्वी शायना एनसींकडून मुंबादेवी चरणी प्रार्थना करण्यात आली. तर दुसरीकडे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला जाण्यापूर्वी अजय चौधरी यांचे कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. त्यासोबतच मुंबईतील माहीम विधानसभेचे उमेदवार महेश सावंत यांचं पत्नीकडून औक्षण करण्यात आले. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी महेश सावंत यांचे औक्षण करण्यात आले. त्यासोबत महेश सावंत यांनी श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांनीही सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

वरूण सरदेसाईंनी घेतले पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शन

लातूरचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांनी मतदानापूर्वी वडील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या समाधी स्थळावर जाऊन वंदन केले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी आईचा आशीर्वाद घेतला. त्यासोबतच वांद्रे पूर्व मतदारसंघाचे उमेदवार वरूण सरदेसाई यांनी विलेपार्ल्यातील पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शन घेतले. तसेच चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुलगा मानससह वरोरा येथील टिळक विद्यालयात मतदान केले. मानस धानोरकर याचं पहिल्यांदाच मतदान करत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदार होण्यासाठी मानसचा एक दिवस कमी पडला होता. वडील गेल्यानंतर ज्या मामाने आमची काळजी घेतली त्याच्यासाठी मतदान करत असल्याचा आनंद मानसने व्यक्त केला. तर प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेप्रमाणेच काँग्रेसची लाट कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.

कुटुंबाकडून औक्षण

विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचे दर्शन घेतले. सपत्निक अभिषेक करत विखे पाटील म्हसोबा महाराजांच्या‌ चरणी लीन झाले. शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांच्यात लढत होत आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपतीची आरती करुन मतदानाचा हक्क बजावला. अहिल्यानगरमधील पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राणी लंके यांच्या कुटुंबाकडून औक्षण करण्यात आली. तर मला प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माझ्यावर आलेली जबाबदारी नक्कीच पार पडणार आहे. मला निवडून येण्याचा पूर्ण विश्वास आहे. यावेळी नक्की परिवर्तन होणार, असा विश्वास राणी लंकेंनी व्यक्त केला.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.