AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकमेकांची डोकी भडकवू नका, नाहीतर कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतील… अमित ठाकरे, सरवणकरांना कोणाला सल्ला ?

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 तारखेला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. राज्यात अनेक हायव्होल्टेज लढती होणार असून माहीममध्ये तर मनसे वि. शिवसेना शिंदे गट वि. शिवसेना ठाकरे गट असा तिहेरी सामना रंगणार आहे.

एकमेकांची डोकी भडकवू नका, नाहीतर कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतील... अमित ठाकरे, सरवणकरांना कोणाला सल्ला ?
माहीममध्ये तिरंगी लढत
| Updated on: Nov 01, 2024 | 10:45 AM
Share

राज्यातील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदतही उलटून गेली आहे. येत्या 20 तारखेला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी होऊन निकाल लागेल. राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा येते की मविआला सत्तास्थापनेची संधि मिळते ते आता अवघ्या 22 दिवसांत स्पष्ट होईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे सध्या हायटेक प्रचार होत असून अनेक मतदारसंघात हायव्होल्टेज लढतही होणार आहे. त्यातीलच एक म्हणजे माहीम मतदरासंघ. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत वि शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांची लढत आहे.

दरम्यान महायुतीने अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचं ठरवल्यामुळे सरवणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून त्यांची मनधरणी करण्यात येत होती. सरवणकर यांना विधानपरिषदेचीही ऑफर देणयात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र सरवणकर निवडणूक लढवण्यार ठाम आहेत. त्यामुळे माहीममध्ये तिहेरी लढत होणं पक्कं आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. मतदार राजा राजकीय तमाशा पाहत आहे, लोकांना या तमाशाचा वीट आलाय, असं सावंत म्हणाले.

सरवणकर मैदान सोडून पळणार नाहीत…

अमित ठाकरेंविरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि सरवणकर यांच्यात बराच काळ चर्चा झाली. मात्र तरीही सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. याच मुद्यावर महेश सावंतही बोलले. ‘ मी पहिल्या पासून सांगतोय की सदा सरवणकर मैदानी खेळाडू आहेत, ते मैदान सोडून पळणार नाहीत. ऊद्धव ठाकरेंनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला, त्याला सदा सरवणकर अपवाद ठरले पण सरवणकर यांना असं करून काय मिळालं ? आत्ता माघार घेण्यास दबाव टाकला जातोय. राज ठाकरेंचे सुपुत्र ऊभे आहेत म्हणून सदा सरवणकरांवर दबाव टाकला जातोय, पण असा दबाव टाकणे योग्य नाही.. माहीम दादरमध्ये होऊन जाऊ दे लढाई… लढाई होऊन जाऊ द्या…’ असं आव्हान त्यांनी केलं.

नाहीतर कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतील..

या वातावरणाचा फायदा आम्हाला मिळणार आहे. ही लढाई आहे. मतदार राजा राजकीय तमाशा पाहत आहे, पण त्यांना या तमाशाचा वीट आला आहे. बाळासाहेब ठाकरे, ऊद्धव ठाकरे हे दिलेला शब्द पाळतात, ही संस्कृती आहे. पण मुख्यमंत्री (शिंदे) यांनी आमदारांना गुजरात, गुवाहाटीला नेलं, पैसे वाटले, पण पैसा आयुष्याला पुरत नाही. मला सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांना एवढंच सांगायचंय की या निवडणुकीला गालबोट लावायला नको, एकमेकांची डोकी भडकवूया नकोत. नाहीतर कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतील , मैत्री जपून ही निवडणुक लढूयात असं आवाहनही सावंत यांनी केलं. आता माहीमध्ये मतदार कौल कुणाला देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.