बारामतीच्या जोडप्यात कारमध्ये असं अचानक काय घडलं? अक्षयने पत्नी शैलाला गाडीतून ढकलून SUV खाली चिरडलं
तिथून जाणारे काही लोक त्यांच्या भांडणात पडले. शैलाला मारहाण करणाऱ्या अक्षयला रोखलं व त्याला गाडीत बसवलं. काही मिनिटांनी अक्षय गाडी एका शेताजवळ घेऊन गेला.

एखाद्या परिस्थितीत माणसाला राग येतो, तो चिडतो. पण त्या रागावर सुद्धा नियंत्रण हवं. नाहीतर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. इतका राग बरा नव्हे असचं तुम्ही म्हणालं. माणुसकी हरवत चालल्याचं हे लक्षण आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हादरवून सोडणारी ही घटना कर्नाटकातील आहे. महाराष्ट्राच्या बारामतीतील एक जोडपं त्यांच्या मारुती सुजुकी अर्टिगा कारने गाणगापूर तीर्थक्षेत्री दर्शनासाठी चाललं होतं. सकाळी 11 च्या सुमारास त्यांची कार बल्लुरगा गावाजवळ पोहोचली. त्यावेळी पती-पत्नीमध्ये कुठल्या तरी कारणावरुन वादवादी झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रागाच्या भरात अक्षयने पत्नी शैलाला गाडीतून धक्का देऊन बाहेर पाडलं.
तिथून जाणाऱ्या एका वाटसरुने या घटनेचा व्हिडिओ बनवला. शैला रस्त्याच्याकडेला जमिनीवर पडली होती. अक्षय तिचे केस पकडून तिला निदर्यतेने मारहाण करत होता. शैला मदतीसाठी आरडाओरडा करत होती. त्यावेळी तिथून जाणारे काही लोक त्यांच्या भांडणात पडले. शैलाला मारहाण करणाऱ्या अक्षयला रोखलं व त्याला गाडीत बसवलं. काही मिनिटांनी अक्षय गाडी एका शेताजवळ घेऊन गेला.
हत्या का केली? काय कारण?
त्याने पुन्हा शैलाला धक्का देऊन गाडी बाहेर पाडलं. त्यानंतर त्याने त्याच्या SUV कारखाली शैलाला चिरडलं. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कलबुर्गीचे पोलिस अधीक्षक अड्डुरु श्रीनिवासुलु यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय आणि शैलाच्या लग्नाला चार वर्ष झाली आहेत. ते मूळचे महाराष्ट्राच्या बारामतीचे राहणारे आहेत. शैलाचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असावेत हा अक्षयच्या मनातील संशय या हत्येमागे असू शकतो. प्राथमिक चौकशीतून हे समोर आलय. आम्ही या प्रकरणाचा अन्य अंगांनी सुद्धा तपास करत आहोत. अक्षयला पोलिसांनी ताब्यात घेतल असून त्याची चौकशी सुरु आहे.
कॉन्स्टेबल मुलीकडून पित्याची हत्या
कॉन्स्टेबल प्रियकराच्या मदतीने कॉन्स्टेबल मुलीनेच केली पित्याची हत्या. तीन वर्षांनंतर उघडकीस आली घटना. विधी संघर्षग्रस्त बालकांसह चौघांना अटक. प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या पित्याची स्वतःच्या कॉन्स्टेबल मुलीनेच कॉन्स्टेबल प्रियकराच्या मदतीने विष देऊन हत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरात तब्बल तीन वर्षांनी उघडकीस आली.
