Maharashtra Board 12th Result 2026: कुठे किती कॉपी केसेस, किती शिक्षकांवर घरी बसण्याची वेळ? आकडेवारी हैराण करणारी
Maharashtra Board 12th Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतंच पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. यावेळी परीक्षा काळात 15 एफआयआर दाखल झाले आहेत.

Maharashtra Board 12th Result 2026: यंदाच्या वर्षी देखील 12 वीच्या परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. यंदा बारावीचा निकाल 89.79 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने आपला दबदबा कायम राखत राज्याच्या निकालात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर लातूर विभागाची कामगिरी सर्वात कमी पाहायला मिळत आहे. तर परीक्षा काळात घडलेल्या गैरप्रकारांची यादी देखील समोर आली आहे. तर तब्बल 100 कर्मचाऱ्यांनी निलंबित करण्यात आलं आहे… समोर आलेली आकडेवारी हैराण करणारी आहे.
परीक्षेच्या काळात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्य दक्षता समिती आणि जिल्ह्यात जिल्हा दक्ष समिती स्थापन केली होती. कॉपी होऊ नये म्हणून खबरदारी घेतली होती. यावेळी परीक्षा चांगल्या पद्धतीने झाली. चांगली परीक्षा व्हावी म्हणून अनेकांकडून फिल्डवरून देखील इनपूट आले. सगळ्या गोष्टींचा एकत्रीत विचार करता, यावेळी परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीत घेण्यात आल्या. परीक्षा काळात एकूण 15 एफआयआर दाखल झाले. ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे तीन, नागपूरमध्ये तीन, अमरावतीमध्ये आठ आणि लातूरमध्ये एक… अशा एकून 15 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.
परीक्षा काळात घडलेल्या गैरप्रकरणांवर गंभीर कारवाई देखील करण्यात आली आहे. यावेळी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये नागपूर येथील 4, छत्रपती संभांजीनगर येथील 43, अमरावती 50 आणि लातूर येथील 3 कर्मचारी आहे. अशा 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
येथे पाहू शकता निकाल…
गैरप्रकार आढळून आल्याची अंतिम आकडेवारी…
परीक्षा केंद्रावर तोतयागीरीची प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर, लातूर येथे एक प्रकरण सापडलं आहे. कॉपी प्रकरण 237 सापडली आहेत. सामुदायिक कॉपी प्रकरणं 1 हजार 469 सापडली आहेत. परीक्षकांनी निर्दशनास आणून दिलेली प्रकरपरीक्षक नियमाकांनी निदर्शनास आणून दिलेली प्रकरण 223 आहेत आणि इतर प्रकरणं 53 मिळून अशी 1 हजार 983 इतके गैरप्रकार समोर आले आहेत. यासर्व प्रकरणांची दखल घेत कारवाई करण्यात आली आहे.
कधी मिळणार मार्कशीट
आधी मार्कशीट दहा दिवसात मिळायचं आणि सर्टिफिकेट सहा महिन्याने मिळायचं. पहिल्यांदाच मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकाच दिवशी मिळेल. म्हणजे निकाल लागल्यापासून 15 व्या दिवशी मार्कशीट आणि सर्टिफिकेट मिळेल. मार्कशीटवर विद्यार्थ्यांचा फोटो आणि क्यूआरकोड असणार आहे. या सर्वांसाठी 3 कोटींची बचत केली आहे. शाळेतून विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफिकेट मिळणार आहेत.
