Maharashtra News LIVE Update | नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, बारवर कल्याणमध्ये कारवाई

| Updated on: Jul 11, 2021 | 12:41 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, बारवर कल्याणमध्ये कारवाई
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Jul 2021 11:09 PM (IST)

    नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, बारवर कल्याणमध्ये कारवाई

    कल्याण : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल आणि बार वर महापालिकेची कारवाई

    संध्याकाळी चारनंतर सुरू होते हॉटेल आणि बार

    केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी केली कारवाई

    कल्याणमधील दीपक हॉटेल, दीक्षा बाद डोंबिवलीमधील बंदिश पॅलेस बा, साई पूजा बार आणि काही मोबाईल दुकाने केले सील

    सर्व प्रभागातील रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांवर सुद्धा कारवाई

  • 10 Jul 2021 10:46 PM (IST)

    पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये नाराजी पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती सुनीता दौंड यांनी दिला राजीनामा

    अहमदनगर : माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे समर्थकांचे राजीनामासत्र

    केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारमध्ये खासदार प्रतिम मुंडे यांना डावलल्याने त्याच्या निषेधार्थ आज पाथर्डी भाजपाच्या विद्यमान पंचायत समितीच्या सभापती सुनीता गोकुळ दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

    तर त्यांचे पती गोकुळ विष्णू दौंड यांनी सुद्धा जिल्ह्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा

    जिल्ह्याध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे दिला राजनाम

  • 10 Jul 2021 08:39 PM (IST)

    कला दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरण, दोघांच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ

    पिंपरी चिंचवड -कला दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या दोघांच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ

    -सापते यांचे व्यावसायिक भागीदार चंदन ठाकरे आणि मिस्त्री नरेश विश्वकर्मा हे दोघे अटकेत आहेत

  • 10 Jul 2021 08:10 PM (IST)

    एकीकडे पंजका मुंडे समर्थकांचे राजीनामे तर दुसरीकडे बीडमध्ये नारायण राणे समर्थकांचा जल्लोष

    बीड: बीडमध्ये नारायण राणे समर्थकांचा जल्लोष

    राणेंना मंत्रिपद मिळाल्याने समर्थकांचा जल्लोष

    बँड बाजा वाजवीत, फटाके फोडून जल्लोष

    स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांच्याकडून जल्लोष

    नारायण राणे तुम आगे बढो अशा घोषणांनी परिसर दणाणला

    मुंडे समर्थक राजीनामे देत असताना राणे समर्थकांत जल्लोष

    राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त

  • 10 Jul 2021 08:05 PM (IST)

    कर्जतमधील पाली भुतवली धरणात बुडालेल्या तीनही तरुणांचे म्रुतदेह बाहेर काढले

    रायगड : कर्जतमधील पाली भुतवली धरणात बुडालेल्या तीनही तरुणांचे म्रुतदेह बाहेर काढले.

    पावसाळी पर्यटनासाठी आलले कुर्ला  नोपाड, नानी बाई चाळ येथील तीन तरुण सकाळी धरणामध्ये पोहताना बुडाले.

    नेरळ पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने काही काळ शोध घेतला परंतु खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या रेस्क्यू टीमने दुपारनतंर पोहचून तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.

    धरणामध्ये वाढलेल्या जलपर्णीमध्ये अडकून तीनही पर्यटक बुडाल्याचा प्राथमिक अदांज आहे.

  • 10 Jul 2021 06:33 PM (IST)

    भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच, बीड जिल्ह्यातील 11 तालुकाध्यक्षांचा राजीनामा

    बीड: भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच

    बीड जिल्ह्यातील 11 तालुकाध्यक्षांचा राजीनामा

    परळीसह सर्वच तालुकाध्यक्षांचा भाजपला रामराम

    भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने पदाधिकारी नाराज

    भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपविला राजीनामा

    आतापर्यंत 25 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

  • 10 Jul 2021 06:00 PM (IST)

    दा निर्यातीसाठी नाशिक जिल्ह्यात कंटेनर न येऊ देण्याचे फर्मान, ट्रक चालक-मालक संघटनेमुळे अडचणी

    लासलगाव - नाशिक जिल्ह्यातील ट्रक चालक-मालक संघटनेमुळे कांद्याचे वांदे

    - कांदा निर्यातीसाठी नाशिक जिल्ह्यात कंटेनर न येऊ देण्यासाठी कंटनेर चालक-मालकांना फोन करत फर्मान

    - दमबाजीच्या ऑडिओ क्लिप व्हायरल

    - कांदा निर्यातीवर परिणाम झाल्याने व्यापाऱ्यांच्या गोडाऊनवर मोठ्या प्रमाणात कांदा पडून

    - कांद्याच्या बाजार भावावर परिणाम होत कांद्याचे बाजार भाव दोन हजार रुपयांच्या वर गेलेले बाजार भाव दोन हजाराच्या आत

    - याकडे लक्ष देण्याच्या मागणीचे छगन भुजबळांना निवेदन

  • 10 Jul 2021 04:53 PM (IST)

    पर्यटनासाठी आलेले 3 जण भूतवली धरणात बुडाले, बचाव पथके रवाना

    रायगड - वर्षा पर्यटनासाठी आलेले 3 जण बुडाले

    कर्जतजवळ डिकसळ येथील पाली भूतवली धरणात बुडाले पर्यटक

    शोध व बचाव पथके रवाना

  • 10 Jul 2021 04:43 PM (IST)

    सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने केला ED नोटीशीबाबत खुलासा,  बँक सुस्थितीत असल्याची बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकाळे यांची माहिती

    सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला आलेल्या ED नोटीशीबाबत बँकेचा खुलासा

    जरंडेश्वर शुगर्स कारखान्याला किती कर्ज दिले याविषयी ED कार्यालयाकडून मागवली माहिती

    जरंडेश्वर कारखान्यासाठी 2017 मध्ये 128 कोटी कर्ज वितरीत करण्यात आले असून 97 कोटी 37 लाख कर्ज अजून शिल्लक

    जिल्हा बँक सुस्थितीत असून अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये

    बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकाळे यांची माहिती

  • 10 Jul 2021 04:19 PM (IST)

    आमदार रवी राणा यांची मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका 

    अमरावती : आमदार रवी राणा यांची मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका

    मुख्यमंत्री यांना वारंवार सांगूनही ते बेशरमासारखं वागतायत म्हणून मी आता मातोश्री समोर जाऊन बेशरमांचे झाड लावणार आहे, अशा स्वरुपात आमदार रवी राणा यांनी टीका केली.

    एमपीएससी पास झालेल्या स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केली. त्याच्या आईला एक करोड रुपयाची मदत देण्याची मागणी

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी माझं निवेदन फेकून दिलं

    रवी राणा यांचा आरोप

  • 10 Jul 2021 03:42 PM (IST)

    ओळखपत्र असलेल्या पत्रकारांना रेल्वे प्रवासाची अनुमती द्यावी, मध्य रेल्वेचे विशेष सल्लागार सदस्य अभिजीत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    पनवेल : ओळखपत्र असलेल्या पत्रकारांना रेल्वे प्रवासाची अनुमती द्यावी

    तसेच लसीचे 2 डोस पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही प्रवासाची अनुमती द्या

    पत्रकारांची दररोज वृत्तांकनासाठी होते ससेहोलपट

    मध्य रेल्वेचे विशेष सल्लागार सदस्य अभिजीत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    अभिजीत पाटील प्रादेशिक रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे आहेत विशेष सदस्य

    रेल्वे आणि रेल्वे प्रवासी यांच्या मूलभूत गरजा याकडे ही कमिटी देते लक्ष

  • 10 Jul 2021 02:49 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढच्या आठवड्यात तीन दिवस नाशिक दौऱ्यावर

    - मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढच्या आठवड्यात तीन दिवस नाशिक दौऱ्यावर

    -16 ते 18 या तीन दिवसीय आपल्या दौऱ्यात राज ठाकरे घेणार आढावा

    - येणाऱ्या मनपा निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्व

    - पक्षात आलेली मरगळ राज ठाकरे दूर करण्याचा करणार प्रयत्न

  • 10 Jul 2021 02:48 PM (IST)

    कोपरखैरणे पोलिसांची धडक कारवाई 3 चोरांच्या आवळल्या मुसक्या

    नवी मुंबई -

    कोपरखैरणे पोलिसांची धडक कारवाई 3 चोरांच्या आवळल्या मुसक्या

    आरोपींकडून 9 मोटरसायकल एकूण ती लाट वीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत

    कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश यांना मिळाली होती गुप्त माहिती

    पोलिसांनी जेरबंद केलेले तीनही आरोपी तरुण वयातले; तिघांचे वय 25 वर्षा आतील

  • 10 Jul 2021 02:48 PM (IST)

    मुंबई अँटी नारकोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटने गोवंडी आणि जुईनगर स्थानकांजवळून दोन ड्रग विक्रेत्यांना अटक केली

    मुंबई अँटी नारकोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटने गोवंडी आणि जुईनगर स्थानकांजवळून दोन ड्रग विक्रेत्यांना अटक केली.

    अटक केलेल्या पेडलर्सकडून 250 ग्रॅम एमडी औषधे जप्त करण्यात आली, जप्त केलेल्या औषधांची किंमत 37 लाख, 50 हजार रुपये आहे.

    एनडीपीएस कायद्यांतर्गत या दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा पुढील तपास सुरू केला.

  • 10 Jul 2021 12:59 PM (IST)

    आठ दिवसांपूर्वी निर्णय झाला असता तर माझा मुलगा वाचला असता, स्वप्निलच्या आईचं सुप्रिया सुळेंपुढे वक्तव्य

    स्वप्नील लोणकर घरी स्वप्निलच्या आई वडिलांच्या भेटीसाठी खासदार सुप्रिया सुळे पोहचल्या

    आठ दिवसांपूर्वी निर्णय झाला असता तर माझा मुलगा वाचला असता, स्वप्निलच्या आई

    माझ्या मुलाने अनेकांना प्लाझमा दिला अनेकांचे जीव वाचविले मात्र तो वाचू शकला नाही

  • 10 Jul 2021 12:56 PM (IST)

    नाशिकच्या आडगाव परिसरात इनोवा कार मध्ये आढळला 60 किलो गांजा

    - नाशिकच्या आडगाव परिसरात इनोवा कार मध्ये आढळला 60 किलो गांजा

    - इनोवा कार,गांजासह 13 लाख रुपयांचा मुद्देमाल आडगाव पोलिसांनी केला हस्तगत

    - चालक फरार,आडगाव पोलिसांचा अधिक तपास सुरू

  • 10 Jul 2021 12:55 PM (IST)

    नालासोपाऱ्यात डॉक्टरकडून हॉस्पिटलमध्येच 21 वर्षीय नर्सचा विनयभंग

    नालासोपारा -

    - नालासोपाऱ्यात डॉक्टरकडून हॉस्पिटलमध्येच 21 वर्षीय नर्सचा विनयभंग

    - नालासोपारा पूर्व संतोषभूवन यु पी नाका येथील आरती हॉस्पिटल मध्ये घडली घटना

    - डॉ सुशील मिश्रा असे वासनांध आरोपी डॉक्टर चे नाव असून, आरती हॉस्पिटलमध्ये तो पार्टनर शिप मध्ये मॅनेजमेंट चे काम पाहतो

    - पीडित नर्स च्या तक्रारीवरून डॉक्टर विरोधात तुलिंज पोलीस ठाण्यात जबरदस्तीने विनयभंग, धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

    - आरोपी डॉक्टर फरार

  • 10 Jul 2021 12:52 PM (IST)

    यमतमाळात मोदी सरकारविरोधात सायकल रॅली

    यवतमाळ -

    वाढत्या महागाईच्या निषेधार्थ मोदी सरकार विरोधात काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली काढून आंदोलन आंदोलनात काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, प्रदेश महिला अध्यक्ष संध्या सवालाखे , वसंत पुरके, वाजाहत मिर्झा सहभागी

  • 10 Jul 2021 12:49 PM (IST)

    आमदार गोपीचंद पडळकर स्वप्निल लोणकर यांच्या घरी पोहोचले

    आमदार गोपीचंद पडळकर स्वप्निल लोणकर यांच्या घरी पोहोचले

    सोबत दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल

  • 10 Jul 2021 09:08 AM (IST)

    यवतमाळात वाघाचा तरुणावर हल्ला

    यवतमाळ:

    जिल्ह्याच्या पांढरकवडा तालुक्यातील पिवरडोल येथील अविनाश पवन लेनगुरे 18 हा युवक काल रात्री गाव जवळच शौचास गेला असता वाघाने हल्ला करून त्याला गावा शेजारीच असलेल्या एका शेतात फरफटत ओढत घेऊन जाऊन ठार मारल्याचा अंदाज आहे. आज पहाटे ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली वनविभागाची टीम घटनास्थळावर दाखल झाली आहे वाघाला झुडपातून हुसकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावकऱ्यांना वाघ दिसला असला तरी अविनाश चा मृतदेह झुडपात असावा असा अंदाज आहे. वाघ त्या ठिकाणी असलेल्या झुडपाची जागा सोडण्यास तयार नाही.

  • 10 Jul 2021 09:07 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर

    बारामती :

    - उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर..

    - अजित पवार यांच्या भेटीसाठी नागरीकांची गर्दी..

    - विद्या प्रतिष्ठानबाहेर केली नागरीकांनी गर्दी..

    - भेटण्यासाठी येणाऱ्यांची केली जातेय ॲंटीजेन टेस्ट..

    - अजित पवार यांचं थोड्याच वेळात होणार विद्या प्रतिष्ठानमध्ये आगमन..

  • 10 Jul 2021 09:07 AM (IST)

    पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील तांदळाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरण, घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता

    - पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील तांदळाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरण

    - तांदूळ घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता

    - भाजपने केला एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

    - ‘रेशनवरील तांदूळ घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा’

    - भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

    - गुणवत्ता तपासणारे अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी अडकण्याची शक्यता

    - रेशनवरील तांदळात ५० टक्क्यांपेक्षा जास्त कणी, आणि पांढरे खडे

    - अधिकारी, राईस मिलर आणि संबंधीत मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

  • 10 Jul 2021 09:06 AM (IST)

    सोलापुरात ऑपरेशन मुस्कान अंतर्गत एकाच महिन्यात शहर पोलिसांनी 19 मुले शोधून काढली

    सोलापूर -

    ऑपरेशन मुस्कान अंतर्गत एकाच महिन्यात शहर पोलिसांनी 19 मुले शोधून काढली

    19 मुलांना बालकल्याण विभागावाकडे केले सुपूर्द

    ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अनाथ मुले, बेवारस मुले, रेल्वे स्टेशन, बस स्टँड परिसरात फिरणाऱ्या मुलांची केली चौकशी

    चौकशी करून 19 अनाथ मुलांना घेतले ताब्यात

  • 10 Jul 2021 09:06 AM (IST)

    वाहतूक शाखेच्या टोइंग कारवाईला नाशिककरांचा विरोध

    - वाहतूक शाखेच्या टोइंग कारवाईला नाशिककरांचा विरोध

    - आधी पार्किंगची व्यवस्था करा आणि नंतर कारवाई करा

    - आधीच स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील रस्ते खोदून ठेवले असता,पुन्हा वाहनांवर कारवाई,वाहन चालवायची की नाही ?

    - नाशिककरांचा पोलीस प्रशासनासह मनपा प्रशासनाला सवाल

  • 10 Jul 2021 08:20 AM (IST)

    कोरोनात चांगलं काम करणाऱ्या नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली

    - कोरोनात चांगलं काम करणाऱ्या नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली

    - कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले IAS रविंद्र ठाकरे यांची बदली

    - आर विमला नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी

    - आर विमला आज सकाळी रविंद्र ठाकरे यांच्याकडून पदभार स्वीकारणार

    - IAS रविंद्र ठाकरे यांना अद्याप पोस्टिंग नाही

  • 10 Jul 2021 08:20 AM (IST)

    रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा पीएमपीएलएमचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

    पुणे

    रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा पीएमपीएलएमचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

    14 वर्षात पीएमपीएलएमला मिळाले 16 अधिकारी

  • 10 Jul 2021 08:19 AM (IST)

    नाशिक पोलीस आयुक्तांनी गुन्हेगार सुधार योजना मेळाव्यातून दिली 250 गुन्हेगारांना सुधारण्यासाची संधी

    - नाशिक पोलीस आयुक्तांनी गुन्हेगार सुधार योजना मेळाव्यातून दिली 250 गुन्हेगारांना सुधारण्यासाची संधी

    - तर शहर वासीयांना घातक ठरणाऱ्या 108 सराईत गुन्हेगारांवर मोक्कानतर्गत केली कारवाई

    - पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा काहींना मोक्का तर काहींना मौका

  • 10 Jul 2021 08:19 AM (IST)

    नाशिकच्या पेठरोडवर आरटीओ परिसरात भीषण अपघात

    - नाशिकच्या पेठरोडवर आरटीओ परिसरात भीषण अपघात

    - मध्यरात्रीच्या सुमारास दोन मालवाहतुक ट्रकची समोरासमोर जोरदार धडक

    - चालक गंभीर जखमी,जखमींना जिल्हा रुग्णलयात उपचारासाठी केलंय दाखल

    - अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोन्ही वाहन झाली पलटी, वाहनांच मोठं नुकसान

  • 10 Jul 2021 08:18 AM (IST)

    पुण्यात रॉ ची भीती दाखवून तरुणीकडून उकळले 10 लाख रुपये

    पुणे

    रॉ ची भीती दाखवून तरुणीकडून उकळले 10 लाख रुपये

    अमेरीकन तपास संस्थेचा अधिकारी असल्याची तरुणीला बतावणी करून रॉ या तपास संस्थेची नजर असल्याची दाखविली भीती

    चतुःशृंगी पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या

    अमित अप्पासाहेब चव्हाण ( वय 30, रा.एमआयडीसी, बारामती) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव

    याप्रकरणी धनश्री हासे (वय 28) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दिली फिर्याद दिली

    एप्रिल ते 7 जुलै दरम्यान घडला हा प्रकार

    एका सोशल साईडवर झाली होती दोघांची ओळख

    चतुःशृंगी पोलीस करतायेत पुढील तपास

  • 10 Jul 2021 08:17 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरभोळे झाले?, भाजप आमदार समीर कुणावार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरभोळे झाले?

    तीन स्मरणपत्र देऊननंही शेतकऱ्यांना मदत नाही

    भाजप आमदार समीर कुणावार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

    गेल्या हंगामातील नुकसानीची अद्याप मदत नाही

    वर्धा जिल्ह्यातील हजारो शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत

    मदत न मिळाल्यास दिला आंदोलनाचा इशारा

  • 10 Jul 2021 06:52 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये एका भरधाव येणाऱ्या डंपर ट्रकने दुचाकी वरुन जाणाऱ्या एका महिलेला चिरडले

    पिंपरी चिंचवड -

    - पिंपरी-चिंचवडमध्ये एका भरधाव येणाऱ्या डंपर ट्रकने दुचाकी वरुन जाणाऱ्या एका महिलेला चिरडल्याने तिचा मृत्यू झालाय

    - या अपघातात त्या महिलेचा पुतण्या ही घटनेत गंभीर जखमी झालाय

    - ही घटना वाकड परिसरात विनोदेनगर भाघात घडलीय

    - लक्ष्मी विठ्ठल शिंदे असं मृत महिलेचे नाव आहे तर आकाश शहाजी शिंदे असं जखमी तरुणाचे नाव आहे

  • 10 Jul 2021 06:51 AM (IST)

    सोलापुरात साडे 7 लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक

    सोलापूर -

    7 लाख 50 हजाराची घेताना पोलीस निरीक्षक संपत पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

    पोलीस निरीक्षक संपत पवार सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक  तर रोहन खंडागळे सहाय्यक पोलीस निरीक्षक

    मुरूम उपसा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी मागितली होती दहा लाखांची  लाच

    तडजोडीअंती साडेसात लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

    लाचलुचपत विभागाकडून सविस्तर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

  • 10 Jul 2021 06:48 AM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रभर संततधार पावसाने ओढे नाले तुडुंब

    उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रभर संततधार पावसाने ओढे नाले तुडुंब

    पावसाने मिळाला शेतकऱ्यांना दिलासा , सोयाबीनसह इतर पिकांना मिळाली नवसंजीवनी

    उस्मानाबाद तुळजापूर कळंब तालुक्यात पाऊस

Published On - Jul 10,2021 6:38 AM

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.