Maharashtra News LIVE Update | या सरकारची लेव्हल नाही कोणतंही काम करण्याची, मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका

| Updated on: Jun 25, 2021 | 11:00 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | या सरकारची लेव्हल नाही कोणतंही काम करण्याची, मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी | Maharashtra Breaking News Live Updates In Marathi June 25 2021 Lockdown Today Latest Updates Corona Cases Monsoon Updates Maharashtra Political Happening

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Jun 2021 10:57 PM (IST)

    या सरकारची लेव्हल नाही कोणतंही काम करण्याची, मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका

    संदीप देशपांडे यांची राज्य सरकारवर टीका : सरकार सारख अनलॉकच्या लेव्हल बदल आहे आता 3 लेव्हलचे संपूर्ण राज्यभर नियम लागू करण्यात आलेत या सरकारची लेव्हल नाही कोणतं काम करण्याची अधिवेशन जवळ आल्याने लोकांना भीती सरकार दाखवत आहे
  • 25 Jun 2021 08:27 PM (IST)

    राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी करण्यास शाहू जनक घराण्याला पाटबंधारे विभागाने परवानगी नाकारली

    कोल्हापूर :

    राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी करण्यास शाहू जनक घराण्याला पाटबंधारे विभागाने परवानगी नाकारली

    समरजितसिंह घाटगे राधानगरी धरणावर करणार होते राजर्षी शाहू महाराजांची जयंती

    राधानगरी धरणावर जयंती साजरी करण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून केली तयारी

    परवानगी मागून पाच दिवस झाल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून ऐन वेळी परवानगी नाकारली- घाटगे

    मी सपत्नीक राधानगरी धरणावर जाऊन जयंती साजरी करणार, काहीही कारवाई करा- समरजित घाटगे

  • 25 Jun 2021 08:23 PM (IST)

    परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले : अनिल देशमुख

    "परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यांना पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी आरोप केले. त्यांच्या संशयास्पद भूमिकेवरुन आयुक्तपदावरुन हटवल्यानंतर आरोप केले. ते आयुक्त असताना त्यांनी माझ्यावर आरोप करायला हवे होते. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडले, तसेच मनसूख हिरेन प्रकरण यामध्ये सापडलेले पोलीस अधिकारी हे मुबंई पोलीस आयुक्तालयात कामाला होते. ते सर्व परमबीर सिंगाना रिपोर्ट करायचे. या प्रकरणातील पाचही अधिकारी परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. त्यामुळे परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद होती. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली. पण त्यांना पदावरुन हटवल्यानंतर माझ्यावर खोटे आरोप केले. माझ्याकडून ईडी आणि सीबीआयच्या तपासाला सहकार्य करेन", असं अनिल देशमुख म्हणाले.

  • 25 Jun 2021 06:41 PM (IST)

    पोलिसांच्या हप्ते मागणीच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या

    पंढरपूर : पोलिसांच्या हप्ते मागणीच्या त्रासाला कंटाळून सरकोली येथे एकाची आत्महत्या, सोमनाथ भालके असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव, अवैध वाळू उपसा केल्याने हप्ते घेवून पोलिसांनी कारवाई केल्याने केली आत्महत्या, हप्तेखोर पोलिसांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सदर व्यक्तीचे प्रेत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये आणले. कारवाई होत नाही तोपर्यंत प्रेत पोलीस स्टेशनमधून हलवण्यास नातेवाईकांचा विरोध, संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाइकांची मागणी

  • 25 Jun 2021 06:05 PM (IST)

    अनिल देशमुख यांच्याविरोधातील ईडी कारवाई सूडबुद्धी आणि राजकीय हेतूने : नवाब मलिक

    "अनिल देशमुखांवर जी कारवाई ईडीने केली ती सूडबुद्धी आणि राजकीय हेतूने प्रेरीत असल्याच आरोप मंत्री नवाब मलिक यांनी गोंदियात केला. अनिल देशमुखांवर ज्याप्रमाणे परमवीरसिंग यांनी आरोप लावले ते कुठेतरी राजकीय हेतूने लावण्यात आले असून ते शेवटी न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशाने सीबीआय चौकशी सुरू झाली. ते सीबीआय चौकशीला सामोरे गेले. त्यानंतर त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला. देशमुख यांनी ईडीच्या चौकशीलाही मदत केली. मात्र ज्यादिवशी तारखा असतात त्याचदिवशी कारवाया होतात. म्हणजे न्यायालयावर दबाव निर्माण करण्यासाठी या कारवाया होतात काय, आता पंतप्रधान मोदींना जनतेचा आधार राहीला नसून ते ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करीत आहेत. मात्र आम्ही घाबरणार नाहीत", असं नवाब मलिक म्हणाले.

  • 25 Jun 2021 04:51 PM (IST)

    अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला : शरद पवार

    "हे काही नवीन नाही. अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही. तसंच त्याला महत्व देण्याचीही गरज नाही. यापूर्वीही देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला. पण त्यात काही हाती लागलं नाही. आताही काही लागणार नाही. त्यामुळे त्याबाबत आम्हाला कसलीच चिंता वाटत नाही", अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

  • 25 Jun 2021 04:32 PM (IST)

    माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश

    पुणे -

    - शरद पवारांच्या उपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश,

    - सुबोध मोहिते यांचा शिवसेना, भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना असा राजकीय प्रवास. त्यानंतर आता त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    - मोहिते वाजपेयींच्या काळात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते.

    - नारायण राणेंसोबत शिवसेनेतून बाहेर पडले होते

  • 25 Jun 2021 04:29 PM (IST)

    वसईत एका व्यापाऱ्यावर भर दिवसा चाकूचा हल्ला

    वसई : वसईत एका व्यापाऱ्यावर भर दिवसा चाकूचा हल्ला करण्यात आलेला आहे. वसई पश्चिमेकडील माणिकपूर रोडवर किलर NX हे दुकान आहे. या दुकानात कांतिलाल हे गुरुवारी दुपारी दोन वाजता दुकानात बसले असताना, दोन जण ग्राहक बनून आले आणि त्याने कपडे दाखवण्याच्या बहाण्याने कांतिलाल यांना बोलण्यात गुंतवलं. कपडे दाखवत असताना अचानक दोघांनी कांतिलाल यांच्यावर चाकुचा हल्ला केला. आणि फरार झाले. यात कांतिलाल हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आता पुढचा तपास करत आहे.

  • 25 Jun 2021 04:28 PM (IST)

    ओबीसी नेत्यांचा राज्य सरकारला इशारा

    सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली आहे. स्थगिती देण्यापूर्वी ओबीसींच्या आकडेवारीची माहिती केंद्र सरकारकडे मागितली आहे. मात्र, ही माहिती न दिल्यानेच ओबीसींचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करुन पाच जिल्हा परिषदांमधील निर्वाचित सदस्यांची पदे कायम ठेवण्याची विनंती केली आहे. मात्र, त्याकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केल्यास राज्यभरातील ओबीसी समुदाय रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून  ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आक्रोश आंदोलन तथा ठिय्या आंदोलन करण्यात आले. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे  केंद्र सरकारचा निषेध करत अशा घोषणा देण्यात आल्या. विशेष म्हणजे, या आंदोलनात मोठ्या संख्येने वारकरीदेखील सहभागी झाले होते.

  • 25 Jun 2021 04:24 PM (IST)

    केडीएमसीची कचऱ्याची गाडी आणि दुचाकीचा अपघात, महिलेचा मृत्यू

    डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरातील घटना

    केडीएमसीच्या कचऱ्याच्या गाडी आणि दुचाकीचा अपघात

    घटना सीसीटीव्हीत कैद

    या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर पुरुष जखमी

    मयत महिलेचे नाव नीलिमा खरोटे

    जखमी सुभाष खरोटेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

    मानपाडा पोलिसांकडून तपास सुरु

  • 25 Jun 2021 03:19 PM (IST)

    अनिल देशमुख यांच्या सुखदा इमारतीमध्येही ईडीची कारवाई

    सुखदा इमारतीमध्ये ईडीची कारवाई माजी गृहमंत्री अनिल देशमुख या इमारतीत राहायचे ईडीच्या फॉरेन्सिक टीममधील अधिकारी सुखदा इमारतीतून बाहेर पडले ईडीने देशमुख कुटुंबाचा सर्व डिजीटल डेटा घेतली अनिल देशमुखही सध्या सुखदा इमारतीत

  • 25 Jun 2021 03:16 PM (IST)

    अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई राजकीय हेतून नाही : देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    अनिल देशमुख यांची ईडी चौकशी न्यायालयाच्या निर्देशानुसार, त्यामध्ये राजकारण नाही संजय राऊत यांना राष्ट्रवादीने सुपारी दिली आहे केवळ तोंडाची वाफ तुडवायची देशमुख यांच्यावरील कारवाई राजकीय हेतून नाही

  • 25 Jun 2021 01:45 PM (IST)

    वसई, विरार, नालसोपाऱ्यात रिमझिम पावसाला सुरुवात, सखल भागात पाणी साचले

    वसई विरार नालासोपारात दुपारनंतर रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. सकाळपासून वसई विरार नालासोपारात क्षेत्रात ढगाळ वातावरण होतं. पावसाचा जोक जर वाढला तर मग सखल भागात पाणी साचायला सुरुवात होईल. दुपारी 12.30 मिनीटांचे नालसोपारा संयुक्त नगर, आणि विरार पूर्व विवा जहांगीड येथील दृश्य आहे.

  • 25 Jun 2021 01:44 PM (IST)

    नाशिकमध्ये बिबट्यांचा वावर वाढला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    नाशिक - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढला

    वाडीवारे, भगूर,इगतपुरी नंतर अत्ता गोंदे midc मध्ये काल रात्री बिट्याचा दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    दोनच दिवसांपूर्वी बिबट्याचा हल्ल्यात इगतपुरी परिसरात एका 3 वर्षीय मुलीचा झाला होता मृत्यू

  • 25 Jun 2021 01:43 PM (IST)

    इकबाल कासकर याला एक दिवसाची NCB कोठडी

    भिवंडी

    इकबाल कासकर यास एक दिवसाची एनसीबी कोठडी भिवंडी न्यायालयात ज्युडीशीयल मॅजिस्ट्रेट एम एम माळी यांनी ठोठावली . पडघा पोलीस ठाणे हद्दीत 12 किलो चरस सह दोन आरोपींना एनसीबी ने केली होती 17 जून रोजी अटक . त्यामध्ये इकबाल कासकर यांचे नाव आले आहे

  • 25 Jun 2021 01:42 PM (IST)

    सिडको घेराव आंदोलनातील लोकप्रतिनिधींसह 18 ते 20 हजार जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

    आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत 'सिडको घेराव' आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा मोठ्या वादाचा विषय ठरला असून दि. ब. पाटील यांचेच नाव विमानतळाला द्यावे या समर्थनार्थ काल पालघर ते रायगड परिसरातील भूमिपुत्रांनी आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात आंदोलक नवी मुंबई शहरात दाखल झाले होते.

    त्यामुळे या ठिकाणी विविध कायद्याचे उल्लंघन झाल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली आहे. नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर आंदोलकांना मार्गदर्शनासाठी उभारण्यात आलेल्या स्टेज वरील सर्व लोकप्रतिनिधी आणि १८ ते २० हजार समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

  • 25 Jun 2021 10:47 AM (IST)

    अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवास्थानी ईडीचे छापे, अडीच तासांपासून छापेमारी

    - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरातील निवास्थानी ईडी चे छापे

    - अडीच तासांपासून सुरु आहे छापेमारी

    - अनिल देशमुख यांच्या घराच्या तिनंही बाजूने CRPF ची सुरक्षा तैनात

    - २० पेक्षा जास्त बंदूकधारी CRPF चे जवान तैनात

    - अनिल देशमुख सध्या नागपूरातील घरी नाही

    - देशमुख यांची पत्नी आणि इतर सदस्य आहेत घरी

  • 25 Jun 2021 09:49 AM (IST)

    खेडमध्ये नर जातीचा बिबट जेरबंद

    खेड,पुणे

    -खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथे आज पहाटे एक नर जातीचा बिबट जेरबंद

    -ह्या बिबट्याला वनविभागाने प्राथमिक उपचारासाठी माणिकडोह बिबटनिवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे

    -या बिबट्याने वडगाव पाटोळे परिसरात पाळीव प्राण्यांसह मनुष्यावर प्राणघात हल्ले केले होते

    -आज अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे..

  • 25 Jun 2021 09:41 AM (IST)

    महसुलात तूट झाल्यानं खर्चात कपात, प्रत्येक विभागाला फक्त 60 टक्के निधीच खर्च करता येणार

    महसुलात तूट झाल्यानं खर्चात कपात करण्याचा सरकारचा निर्णय

    प्रत्येक विभागाला आता फक्त ६० टक्के निधीच खर्च करता येणार

    ४० टक्के खर्चात कपात करण्याचा निर्णय

    नवीन प्रकल्प, योजना यांना निधी न देण्याचा निर्णय

    खर्च कपातीचा फटका नोकरभरतीलाही बसणार, अर्थ‌खात्याच्या सल्ल्यानंच नोकरभरती होणार

    बजेटमधल्या १ लाख ३० हजार कोटींपैकी ५२ हजार कोटी कोरोनाला वापरता यासाठी खर्चात कपात

  • 25 Jun 2021 09:40 AM (IST)

    माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, नागपुरातील निवासस्थानी ED चा छापा

    नागपूर

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी ED चा छापा,

    सकाळीच पोहचले ED चे अधिकारी,

    चौकशी सुरू, cbi नंतर आता देशमुख यांच्यावर ed ची कारवाई,

    अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ

  • 25 Jun 2021 09:39 AM (IST)

    कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला ट्रकची जोरदार धडक, 100 कोंबड्या दगावल्या

    मावळ,पुणे

    -कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला ट्रकची जोरदार धडक,

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 100 कोंबड्या दगावल्या

    -खंडाळा परिसरात पहाटे च्या सुमारास ही घटना घडली

    -पुण्याहून मुंबईला कोंबड्यांची ही वाहतूक सुरू होती

    मुंबई लेनवर पहाटे 5 वाजता कोंबड्यानी भरलेल्या टेम्पोने अचानक ब्रेक दाबल्याने मागील टेम्पोची जोरदार धडक बसली

    यामध्ये अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असून या अपघातात ट्रक चालक ही जखमी झाला.

  • 25 Jun 2021 08:17 AM (IST)

    सोलापुरात ऊस बिले न देणाऱ्या अकरा कारखान्यावर जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर कारखान्यांनी भरले शेतकऱ्यांच्या खात्यावर 260 कोटी रुपये

    सोलापूर - ऊस बिले न देणाऱ्या अकरा कारखान्यावर जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर कारखान्यांनी भरले शेतकऱ्यांच्या खात्यावर 260 कोटी रुपये

    जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्याच साखर कारखान्याकडे  अद्यापही मागील गाळप हंगामातील 479 कोटी 39 लाख रुपयांची बिले थकीत

    साखर आयुक्तांनी 11 साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची थकीत बिले देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते आदेश

    त्यानंतर साखर कारखाने 260 रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर केली जमा

    मात्र अद्याप 219 कोटी 34 लाख रुपयांची ऊसबिले थकीत

  • 25 Jun 2021 07:44 AM (IST)

    कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाला वेग, विद्यमान अध्यक्ष बजरंग पाटील यांचा राजीनामा

    कोल्हापूर

    कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाला वेग

    विद्यमान अध्यक्ष बजरंग पाटील यांचा राजीनामा

    पाटील यांच्यासह अन्य तीन पदाधिकार्‍यांचे राजीनामे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंजूर

    नव्या अध्यक्ष निवडीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता, इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात

    काँग्रेस मधून आमदार पी.एन.पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांच्या नावाची चर्चा

    कोल्हापूर जिल्हा परिषदेत आहे महा विकास आघाडीची सत्ता

    सत्ता वाटपाच्या फॉर्मुला नुसार होतोय नियोजित पदाधिकारी बदल

  • 25 Jun 2021 07:37 AM (IST)

    अहमदनगरात येत्या 30 तारखेला महापौर पदासाठी निवडणूक

    अहमदनगर

    येत्या 30 तारखेला महापौर पदासाठी निवडणूक

    तर शिवसेनेचा उमेदवार ठरला, रोहिणी शेंडगे महापौर पदाच्या उमेदवार

    सेनेकडे महापौर पद तर राष्ट्रवादी कडे उपमहापौर पद

    काँग्रेसची भूमिका मात्र गुलदस्त्यात तर भाजपच्या भूमिकेकडे ही लक्ष

  • 25 Jun 2021 07:28 AM (IST)

    उघड्या विद्युत डिपीचा शॅाक लागून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

    नागपूर -

    - विद्युत कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा बळी

    - उघड्या विद्युत डिपीचा शॅाक लागून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

    - नागपूर जिल्हयातील उमरेड येथील सिर्सी बाजार चौकातील घटना

    - नैतीक बावने असं शॅाक लागून मृत्यू झालेल्या मुलाचं नाव

  • 25 Jun 2021 07:27 AM (IST)

    वॉटरग्रीड योजना मंजूर झाल्यानंतर पैठण तालुक्यात जल्लोष

    औरंगाबाद -

    वॉटरग्रीड योजना मंजूर झाल्यानंतर पैठण तालुक्यात जल्लोष

    गावागावात गुलाल उधळून फटके फोडत जल्लोष साजरा

    रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांचं जल्लोषात स्वागत

    वाटरग्रीड योजनेतून पैठण तालुक्यातील 200 गावांना होणार थेट पाणीपुरवठा

    285 कोटी रुपये खर्चून 700 किलोमीटरवर पाईप लाईन टाकत होणार आहे वाटरग्रीड योजना

    पैठण तालुक्यासाठी योजना मंजूर झाल्यानंतर तालुक्यात सर्वत्र जल्लोष

  • 25 Jun 2021 06:47 AM (IST)

    उदयनराजेंबाबत अपशब्द वापरल्यानं समर्थकांनी व्यक्तीच्या तोंडाला फासलं काळ

    इंदापूर - एका व्यक्तीच्या तोंडाला फासलं काळ

    उदयनराजेंबाबत अपशब्द वापरल्यानं फासलं काळ

    उदयनराजेंच्या समर्थकांकडून घडला प्रकार

  • 25 Jun 2021 06:45 AM (IST)

     पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधूना मुंबईच्या विलेपार्ले पोलिसांनी फसवणूकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले

    पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधूना मुंबईच्या विलेपार्ले पोलिसांनी फसवणूकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहेत.

    श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक परांजपे अशा दोघांच नाव आहे. दोघांना मुंबई पोलिसांनी पुण्यातील त्यांचे राहत्या घरातून ताब्यात घेतल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

    दोघे बिल्डर बंधूंना मध्यरात्री मुंबई पोलिसांनी पुण्यातून मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात आणलं.

    विलेपार्ले पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्या विरोधात वय ७० वर्षीय वसुंधरा डोंगरे नामक महिलेनी तक्रार दिली आहे. जागाचा कौटुंबिक वाद आहे अशा बोलले जात आहे.

    परांजपे बंधू सहित चार जणांवर विलेपार्ले पोलीस ठाण्यात कलम 476,  467, 68, 406, 420, 120 ब कलमानव्ये गुन्हा नोंदविलेला आहे.

    बिल्डर श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक परांजपे या दोघे बंधूंना ताब्यात घेवून विलेपार्ले पोलीस पुढील तपास करत आहे.

Published On - Jun 25,2021 6:28 AM

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.