Maharashtra News LIVE Update | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये उद्या बैठक

| Updated on: Oct 19, 2021 | 5:34 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये उद्या बैठक
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Oct 2021 09:01 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये उद्या बैठक

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये उद्या बैठक होणार

    सह्याद्री अतिथीगृहावर उद्या दुपारी साडेबारा वाजता बैठक होणार

    बैठकीत ईडी, सीबीआयच्या कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती

    तसेच केंद्राकडून थकीत जीएसटीचे पैसे मिळवण्याबाबतही चर्चा होणार

  • 17 Oct 2021 08:50 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

    पिंपरी चिंचवड :

    -पिंपरी चिंचवडमध्ये जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पुण्याहुन मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर आकुर्डीमध्ये भरधाव आलेली दुचाकी डीवाईडरला धडकल्याने भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झालाय

    -हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर दुचाकीने ही पेट घेतला

    -या अपघातात आर्यन परमार आणि श्वेता गजबे या दोघांचा मृत्यू झालाय

    -ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय,

    -या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणीही जखमी झालेल्या आहेत

  • 17 Oct 2021 07:27 PM (IST)

    गोंदियात परतीच्या पावसाची हजेरी

    गोंदियात आज सायंकाळच्या सुमारास परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी धान कापले आहेत त्यांचे या परतीच्या पावसामुळे नुकसान होणार असल्याने पुन्हा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचले होते.

  • 17 Oct 2021 07:26 PM (IST)

    कोका अभयारण्यात आढळलं मृत अस्थेत बिबट

    भंडारा

    - कोका अभयारण्यात आढळलं मृत अस्थेत बिबट,

    - भंडारा वनपरिक्षेत्रातील मौजा कोका येथील खाजगी गट क्रमांक 499 भुताई बोडी याठिकाणी बिबट्या वन्यप्राणी मृतावस्थेत आढळून आला आहे.

    - याची माहिती वनविभागाला देण्यात आली असून माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचले

  • 17 Oct 2021 06:53 PM (IST)

    जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथ खडसे विरूद्ध रक्षा खडसे लढतीची शक्यता

    जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणुकीत भाजपच्या खासदार रक्षा मैदानात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप सोबत जाण्यास आता नकार दिल्याने आता भाजप स्वतंत्र लढणार आहे.त्या मुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे विरूद्ध भाजप खासदार रक्षा खडसे सासरा विरूद्ध सून अशी लढत होण्याची शक्यता आहे.जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते मात्र काँग्रेस पक्षाने भाजप सोबत जाण्यास नकार दिला होता. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप सोबत पॅनल करण्यास नकार दिला आहे

  • 17 Oct 2021 06:15 PM (IST)

    देशात महागाईचा भडका उडालाय, शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

    पिंपरी चिंचवड :

    शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे :

    -महाराष्ट्रातील लोकांची सुख-दुःख समजावे, हे केंद्र सरकार सांगण्यासाठी मी जिल्ह्या जिल्ह्यात जातो आहे

    -राज्यात जिथं जाणं शक्य आहे तिथं जाण्याचा प्रयत्न करणार

    -एक बातमी पक्की असती पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती किती वाढल्या, आपल्या भगिनींच्या संसाराचं बजेट कसं कोलमडून पडले ही असतेच

    -मनमोहन सिंग यांचे सरकार होते तेव्हा आजच्या सत्तेतील लोक आंदोलन करत लोकसभा सभागृह बंद पाडलं होतं

    -बऱ्याच दिवसांनी मी पिंपरी चिंचवड शहर वासीयांशी बोलतोय. कोरोनामुळं मृत्यू झालेले नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करायला आलो होतो

    -पी चिदंबरम यांच्या आजच्या लेखात त्यांनी सांगितलंय की 25 टक्के कर जरी केंद्र कमी केला तर किंमत कमी होईल पण केंद्र सरकार तसे करताना दिसत नाही

    -पिंपरी चिंचवडमध्ये हिंदुस्थान अँटिबायोटिक्स औषध निर्मिती करण्याला खूप मोठा इतिहास आहे

    -महात्मा गांधी हे नगर मध्ये होते, तेंव्हा कस्तुरबा गांधी आजारी पडल्या, पण त्याचे औषध भारतात नव्हते, त्यात कस्तुरबा मरण पावल्या..त्यानंतर महात्मा गांधी नी सर्वसामान्य जनतेसाठी हे औषध उपलब्ध झाले पाहिजे असे म्हंटले, त्या नंतर पिंपरी मध्ये पेनिसिलिन चा हा कारखाना सुरू झाला..

    -जे कामगार विरोधी निर्णय घेतात त्यांना सत्तेवर बसायचा अधिकारी नाही

    -दिल्लीचे सरकार नवीन कारखाने सुरू व्हावीत यासाठी अनुकूल नाही, ते कामगार विरोधी आहेत

    -पिंपरी चिंचवड मधील टाटा कंपनी जेंव्हा राज्य सोडून निघाले होते. तेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे टाटा यांना भेटले, त्यांनी त्यांना सर्व सोयी देण्याचं आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं. पण तुम्ही पिंपरीत या आणि टाटा इथं आले.

    - दहा वर्षे माझ्याकडे शेती खाते होते, ज्या वेळी मी हे खाते सोडले त्यावेळी आपण अनेक शेती उत्पन्न निर्यात करणारा देश भारत झाला होता. मी खाते हातात घेतले तेंव्हा भारतात 4 आठवडे पुरेल तेवढाच धान्य साठा उपलब्ध होत

  • 17 Oct 2021 05:49 PM (IST)

    पुण्यात दिसभरात 106 नवे कोरोनाबाधित, 126 जणांना डिस्चार्ज

    पुणे : 

    दिवसभरात १०६ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात १२६ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ०३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१. -१६६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०३१७५. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १०५६. - एकूण मृत्यू -९०६४. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९३०५५. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५४८८.

  • 17 Oct 2021 04:50 PM (IST)

    आम्ही ठाकरे सरकारचं विसर्जन करणार : किरीट सोमय्या

    किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे : 

    महाराष्ट्रामध्ये एक वेगळेच चित्र आहे. गणेश विसर्जन, मुंबईत विसर्जनाच्या दिवशी सगळी रस्त्यावर अस्ताना माझ्या घरी पोलीस आले

    घोटाळे त्यांनी करायचे आणि जेलमध्ये अम्हाला पाठवता

    इतिहासात हा पहिला दिवस असेल ठाकरे सरकारचा विसर्जनचा ड्रामा गणेश विसर्जन तर व्यवस्थित झाले पण ठाकरे सरकारचे विसर्जन आम्ही करणार आता क्रांतीची सुरुवत झाली जितेंद्र आवाड गेले आता अनिल देशमुखांनी कपडे भरायचे आहे अनिल परब, किशोरी पेडणेकर, अजित पवार लाईनच लागली आहे आले बाबा उद्धव ठाकरे आणि आले बाबा चाळीस चोर जरंडेश्वर कारखाना अजित पवारांनी गिळला सबभूमी पवार की, सगळ्या पवारांचे लुटलेले साखर कारखाने इनकम टॅक्स कारवाई अजून संपलेली नाही, दहावा दिवस आहे या घोटाळ्याचा आम्ही दहावं आणि बारावंपण घालणार पवारांची 1 लाख कोटीची बेईमानी संपत्ती आहे अजित पवार यांचे पन्नास कोटीचे कागद शरद पवारांना पाठवले भाऊ बहिणीच्या नावाने बेईमानी प्रापर्टी गोळा केली

  • 17 Oct 2021 04:38 PM (IST)

    दोनवेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षांची अखेर तारीख ठरली, 24 ऑक्टोबरला परीक्षा

    - दोनवेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षांची अखेर तारीख ठरली - 24 ऑक्टोबर रोजी होणार परीक्षा - राज्य स्तरावरील 24 आणि मंडळ स्तरावरील 28 आशा एकूण 52 संवर्गासाठी होणार भरती परीक्षा - 2 हजार 739 रिक्त पद या भरती परीक्षेनंतर भरली जाणार - एकूण 4 लाख 5 हजार 156 अर्ज झाले होते प्राप्त - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य विभागात 100 टक्के रिक्त पदे भरण्याची दिली आहे परवानगी - न्यास एजन्सी मार्फत घेण्यात येणार आहे परीक्षा - अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे विद्यार्थ्यांनकडून झाल्या होत्या तक्रारी प्राप्त

  • 17 Oct 2021 04:28 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार कार्यकर्ता मेळावा घेणार

    पिंपरी चिंचवड :

    -पिंपरी चिंचवडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कार्यकर्ता मेळावा घेणार आहे

    -आगामी महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार शहरात कार्यकर्त्यांना करणारा मार्गदर्शन

    -काही वेळात शरद पवार सभास्थळी येतील

  • 17 Oct 2021 03:28 PM (IST)

    भाजपने आधी बेईमानी केली नसती तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती : मंत्री गुलाबराव पाटील

    जळगाव :

    पहिले भाजपने बेईमानी केली नसती तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती

    भाजपने लोकसभेत शिवसेना विरोधात 4 उमेदवार उभे केले होते.

    भाजपने बेईमानी केली नसती तर उद्धव साहेब बेईमान झाले नसते

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे भाजपला सडकून उत्तर

  • 17 Oct 2021 03:27 PM (IST)

    नाशिकमध्ये क्षुल्लक कारणावरून नातूकडून आजीची हत्या

    - क्षुल्लक कारणावरून नातूच उठला आज्जीच्या मुळावर - त्रंबकेश्वर तालुक्यातील हरसूल मधील वायघोळपाडा येथे नातवाने केली आज्जीची निर्घृण हत्या - आज्जी पारिबाई शेवरे यांच्या तोंडावर, गळ्यावर नातू कृष्णा शेवरेने कुऱ्हाडीने केले सपासप वार - तू काम करत नाहीस वेडा आहे.हे आज्जीचे शब्द न रुचल्याने नातवाने केली हत्या - हल्ल्यात आज्जीचा जागीच मृत्यू - वडील लक्ष्मण शेवरे यांच्या तक्रारी वरून मुलगा कृष्णा शेवरेवर हरसूल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

  • 17 Oct 2021 02:33 PM (IST)

    शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, ठाण्यात रामदास कदम यांच्या समर्थकांची तिखट शब्दांत बॅनरबाजी

    शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

    ठाण्यात माजी मंत्री रामदास कदम यांचे नितीन कंपनी चौकात कोकणचा ढाण्या वाघ म्हणून लागले बॅनर

    कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक आज आमचीच सुपारी द्यायला निघालेत त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो बाप बाप असतो, अशाप्रकारे तिखट भाषेत मजकूर रामदास कदम यांच्या समर्थकांनी बॅनरवर लिहिला आहे.

    नक्की शिवसेनेत हे बोट कोणावर दाखवले आहे? कोणी कोणाला सुपारी दिली? असा देखील प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

  • 17 Oct 2021 02:21 PM (IST)

    माजी मंत्री भास्करराव पाटील भाजप सोडून पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

    नांदेड: माजी मंत्री भास्करराव पाटील यांनी भाजप सोडली, पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये करणार प्रवेश, पाटील हे मंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे, त्यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्ना देखील भाजप सोडणार, देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आता येणार रंगत

  • 17 Oct 2021 01:59 PM (IST)

    भाजपा कार्यशाळेचा आज संध्याकाळी होणार समारोप

    भाजपा कार्यशाळेचा आज संध्याकाळी होणार समारोप

    केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार समारोप सत्राला लावणार हजेरी

    चंद्रकात पाटील कालपासून घेतायेत भाजपा नगरसेवकांची कार्यशाळा

  • 17 Oct 2021 12:37 PM (IST)

    हिंदू राष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी गुरू मां कांचन गिरी आणि जगतगुरू सुर्याचार्य मुंबई एयरपोर्टवर दाखल

    हिंदू राष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी गुरू मां कांचन गिरी आणि जगतगुरू सुर्याचार्य मुंबई एयरपोर्टवर दाखल…

    - राज ठाकरे यांची ऊद्या कृष्णकुंज इथे घेणार भेट…

    - राज ठाकरे यांना आयोध्या इथे सभा घेण्यासाठी देणार निमंत्रण..

    - राज ठाकरे यांच्यात बाळासाहेबांची छवी दिसत असल्याने त्यांनी हिंदूराष्ट्र बळकटीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करणार असल्याची माहीती…

  • 17 Oct 2021 11:56 AM (IST)

    केरळमधील पूर परिस्थितीवर आमचे लक्ष - अमित शहा

    अमित शहा -

    केरळमधील पूर परिस्थितीवर आमचे लक्ष

    एनडीआरएफच्या तुकड्या केरळमध्ये पाठवण्यात आल्या आहेत

    केरळ मध्ये सध्या मुसळधार पावसामुळे पुराचं थैमान

    केंद्र सरकार केरळमधील नागरिकांसाठी लागेल ती मदत करण्यास तयार

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ट्विट

    सर्व सुरक्षित असतील अशी प्रार्थना

  • 17 Oct 2021 11:46 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवारांचा सरकारला घरचा आहेर

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवारांचा सरकारला घरचा आहेर

    परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करतायेत

    एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यानं एका परीक्षेला मुकावं लागणार आहे,

    शासनाने संबंधित कंपनीला आदेश देऊन परीक्षा केंद्र रिअलोकेट करण्याची मागणी

    सगळ्या परीक्षा MPSC मार्फतचं घ्या रोहीत पवारांची मागणी

    सगळ्या परीक्षार्थींना एसटीचा प्रवास मोफत करण्याचीही केली मागणी

    आरोग्य विभागाच्या भरतीतील गोंधळावरून रोहीत पवारांची सरकारकडे मागणी

  • 17 Oct 2021 11:45 AM (IST)

    केरळ राज्याला मुसळधार पावसाचा फटका

    केरळ

    केरळ राज्याला मुसळधार पावसाचा फटका

    कोटायम आणि इडूकी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    अनेक ठिकाणी दरड कोसळली

    केरळ राज्यात आतापर्यंत मुसळधार पावसामुळे आठ जणांचा मृत्यू

    40 हून अधिक नागरिक बेपत्ता

    केरळ राज्यातल्या सहा जिल्ह्यांना आज दिवसभर रेड अलर्ट

    कोटायम जिल्ह्यात भारतीय सैन्य दलाकडून मदतकार्य

    भारतीय हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टर द्वारे नागरिकांची सुटका

    केरळ सरकारने तातडीने बैठक घेऊन प्रशासनाला दिले आदेश

  • 17 Oct 2021 11:45 AM (IST)

    शामलाल गुप्ता यांनी तिरंगा गीत लिहिलं त्यांचं मोठं योगदान आहे - नितीन गडकरी

    नितीन गडकरी -

    शामलाल गुप्ता यांनी तिरंगा गीत लिहिलं त्यांचं मोठं योगदान आहे

    त्यांचा अमृत महोत्सव आहे तो आपण साजरा करत आहे

    महापालिका च्या गायकांनी चांगलं गीत गायलं ,मात्र काही कमी आहे त्यात आणखी चांगलं करा

    आपल्या महापालिकेत चांगले कलावंत आहे सगळ्या झोन मध्ये स्पर्धा घ्या मी त्यासाठी माझ्या निधीतून बक्षीस देईल

    प्रत्येक वस्तीत आझादी च्या 75 वर्षाचा कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे

    मी विध्यर्थी होतो तेव्हा स्वातंत्र्य या विषयाचा अभ्यास केला आणि त्यावेळी मला पुरस्कार मिळाला

    लोकांच्या मनात देशप्रेम जागविणे आपलं काम आहे

  • 17 Oct 2021 11:44 AM (IST)

    पुण्यात दूसऱ्या दिवशीही भाजपची नगरसेवकांची कार्यशाळा

    पुण्यात दूसऱ्या दिवशीही भाजपची नगरसेवकांची कार्यशाळा

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कालपासून घेतायेत कार्यशाळा

    चंद्रकांत पाटील दोन दिवसात घेणार नगरसेवकांचा आढावा

    मिशन 2022 साठी जोरदार मोर्चेबांधणी

  • 17 Oct 2021 09:51 AM (IST)

    मकाऊ पोपटाच्या मृत्यूप्रकरणी प्राणी संग्रहालयातील दोघांवर गुन्हा दाखल

    सोलापूर - मकाऊ पोपटाच्या मृत्यूप्रकरणी प्राणी संग्रहालयातील दोघांवर गुन्हा दाखल

    महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयाचे कीपर भारत शिंदे व प्राणिसंग्रहालयाच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल

    प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंधक अधिनियमानुसार  विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

    एक तास योग्य खाद्य न दिल्याने, तसेच शेवाळ युक्त पाणी दिल्याने पोपटाचा मृत्यू झाल्याचा पशुवैद्यकीय चिकित्सकाचा अहवाल

    महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील मकाऊ पोपटाच्या जोडीला काही दिवसांपूर्वी वनविभागाच्या परवानगीने सिद्धेश्वर वन विहारात होते ठेवले

    गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सेव आयुक्त पाणी व पोपटाचे पंख केले जप्त

    साडेतीन लाख रुपयांचे होते मकाऊ पोपटांची जोडी

  • 17 Oct 2021 09:50 AM (IST)

    सात दिवसात 1 लाख 90 हजार सोलापूरकरांनी घेतले डोस

    सोलापूर -

    सात दिवसात 1 लाख 90 हजार सोलापूरकरांनी घेतले डोस

    मिशन कवच-कुंडल मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात राबविलेल्या लसीकरण मोहिमेत 1 लाख 90 हजार लोकांनी घेतला डोस

    नवरात्राला सुरुवात झाल्यावर लसीकरणाचा प्रतिसाद होता मंदावला

    उपवास व पावसाळी वातावरणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वाढल्याने अनेकानेक फिरवली होती लसीकरण याकडे पाठ

    त्यामुळे प्रशासनाने राबवली विशेष मोहीम

  • 17 Oct 2021 09:50 AM (IST)

    नागपूरसह विदर्भात आज वादळी पावसाचा इशारा

    नागपूरसह विदर्भात आज वादळी पावसाचा इशारा

    नागपुर हवामान विभागाने दिला इशारा

    विदर्भ तुन मानसून परतला असला तरी दक्षिण भारतात परतीचा प्रवास सुरु

    पक्षिम बंगाल च्या उप सागरात झालेल्या बदला मुळे पावसाची शक्यता

  • 17 Oct 2021 09:49 AM (IST)

    अवकाळीने झालेल्या नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार

    सोलापूर -

    अवकाळीने झालेल्या नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार

    एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी मिळणार मदत

    राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यातील 327.60 एक ट्रॉली पिकांसाठी 57 लाख दहा हजार रुपयांची केली आहे मदत

    संबंधित तहसीलदारांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा

    दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार

  • 17 Oct 2021 09:49 AM (IST)

    नागपूरच्या जरीपटका पोलिसांची मोठी करवाई, रेशनच्या गव्हाची तस्करी उधळली

    नागपूर -

    नागपूरच्या जरीपटका पोलिसांची मोठी करवाई

    रेशनच्या गव्हाची तस्करी उधळली

    465 पोटी गहू घेऊन ट्रक काळ्या बाजारात विकण्याची तयारी होती

    पोलिसांनी वेळीच कारवाई करत केली ट्रक सह 465 पोती गहू जप्त

    3 आरोपीना केली अटक तर एक पसार झाला

    पोती उतरविण्याचे काम सुरू असताना पोलिसांनी गुप्त माहिती च्या आधारे केली कारवाई

    गरिबांच्या हक्काच्या धान्याची होत होती तस्करी

  • 17 Oct 2021 09:44 AM (IST)

    पुण्यात पेट्रोलच्या दरात आणखी एक रुपयांची वाढ

    पुणे

    पुण्यात पेट्रोलच्या दरात आणखी एक रुपयांची वाढ,

    पुण्यात पेट्रोलचा दर 111 रु.25 पैशांवर

    दिवसेंदिवस पेट्रोलच्या किंमतीत वाढच,

    तर पॉवर पेट्रोल 114 रु.95 पैशांवर,

    डीझेलनंही गाठली शंभरी,

    डीझेलचा दर 100 रु.45 पैशांवर

  • 17 Oct 2021 09:20 AM (IST)

    पिंपरी चिंचवडच्या चिखली पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवलंय

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवडच्या चिखली पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवलंय

    -त्यांच्याकडून तब्बल19 लाख रुपयांच्या मुद्देमालासह 61 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत

    -गोविंद सोलंकी, संदेश जाधव, सद्दाम शेख, आदिनाथ राजभोज अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत

  • 17 Oct 2021 09:18 AM (IST)

    एरंडोलच्या कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण

    जळगाव -

    एरंडोलच्या कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण

    एकाच कुटुंबातील आई व दोन मुले कोरोना बाधित

    कुटुंब प्रामुख्याने लसीचे दोन डोस घेतल्याने अहवाल निगेटिव्ह

  • 17 Oct 2021 09:18 AM (IST)

    वाघूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ

    जळगाव - वाघूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ

    वाघूर धरणाचे 4 दरवाजे अर्धा मीटरने उघडले

    वाघूर धरण क्षेत्रात 1011 मिमी पाऊस झाल्याची नोंद

  • 17 Oct 2021 09:17 AM (IST)

    दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळणार महाविद्यालयत मिळणार बेंचवर जागा

    जळगाव -

    दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळणार महाविद्यालयत मिळणार बेंच वर जागा

    225 वरीष्ठ महाविद्यालये उघडणार

    लसीकरण पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयात होणार लसीकरण शिबीर

  • 17 Oct 2021 09:17 AM (IST)

    वाशिम जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस, पैन गंगा नदीला मोठा पूर

    वाशिम :

    वाशिम जिल्ह्यात रात्रभर पडलेल्या मसळधार पावसाने आणि बुलढाणा जिल्ह्यातील पेन टाकळी प्रकल्पातील पाण्याच्या विसर्गामुळं पैन गंगा नदीला आला मोठा पूर

    या पुरामुळं जिल्ह्यातील सरपखेड - धोडप आणि करडा - गोभणी हे दोन जिल्हा मार्ग झाले बंद

    पैन गंगा नदीकाठच्या रिसोड आणि वाशिम तालुक्यातील 40 गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा...

  • 17 Oct 2021 09:16 AM (IST)

    वाकड मध्ये 45 वर्षीय नराधम बापाकडून 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

    पिंपरी चिंचवड

    -वाकड मध्ये 45 वर्षीय नराधम बापाकडून 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

    -गेले काही महिने सुरू होता अत्याचार नराधम बापाला वाकड पोलिसांकडून अटक

    -तू जर कुणाला सांगितले तर तुला जीवे मारेल अशी धमकी देत केला जात होता अत्याचार

  • 17 Oct 2021 07:33 AM (IST)

    औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी, साडेसहा फुटाने भूजल पातळी वाढली

    औरंगाबाद

    औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी

    औरंगाबाद जिल्ह्याची साडेसहा फुटाने भूजल पातळी वाढली

    यंदा पाणी टंचाई निर्माण होणार नाही

    पैठण तालुक्यात सर्वाधिक 14 फुटाने भूजल पातळी

  • 17 Oct 2021 07:25 AM (IST)

    सोलापूर-उस्मानाबाद, सोलापूर-लातूर, सोलापूर-औरंगाबाद मार्गावर वाहनास बंदी

    सोलापूर -

    उद्या रात्री बारापासून ते 20 तारखेच्या रात्री 12 पर्यंत सोलापूर ते तुळजापूर सह अन्य तीन मार्गावर वाहनाना बंदी

    सोलापूर उस्मानाबाद, सोलापूर लातूर, सोलापूर औरंगाबाद, मार्गावर वाहनास बंदी

    कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भाविक पायी जाण्याची शक्यता असल्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहनांना बंदी

    पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी काढले आदेश

    पर्यायी मार्ग वापरण्याचे वाहन चालकांना आवाहन

  • 17 Oct 2021 07:09 AM (IST)

    प्राथमिक शिक्षणाचे वर्ग दिवाळीनंतर सुरू करण्यासाठी शिक्षण विभागा सकारात्मक

    प्राथमिक शिक्षणाचे वर्ग दिवाळीनंतर सुरू करण्यासाठी शिक्षण विभागा सकारात्मक,

    पहिली ली ते चौथीचे वर्ग दिवाळीनंतर सुरू करण्यासाठी हालचाल,

    येत्या 15 दिवसात सणासुदीतील गर्दीचा आढावा घेऊन रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता निर्णय. घेणार,

    जर रुग्णसंख्या नियंत्रणात राहिली तर मग मात्र प्राथमिक शिक्षणाचा श्नीगणेशा दिवाळीनंतर,

    शासन वर्ग सुरू करण्यासाठी सकारात्मक शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची माहिती

  • 17 Oct 2021 07:08 AM (IST)

    नवरात्र उत्सवात नाशकात चोरट्यांचं फावल, घरफोडी, जबरी लूटीचे 23 गुन्हे दाखल

    - नवरात्र उत्सवात नाशकात चोरट्यांच फावल

    - घरफोडी,जबरी लूटीचे 23 गुन्हे दाखल

    - 15 घरफोडी तर 8 भर रस्त्यात चोरी

    - अनेक भागात पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी केला पोबारा

    - नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीने नाशिककर हैराण

    - गुन्हेगारांना,चोरट्यांना तात्काळ गजाआड करणं पोलिसांसमोर आव्हान

  • 17 Oct 2021 07:07 AM (IST)

    नाशिकमध्ये महिलेकडे फ्रेंडशीपची मागणी करणं एका तरुणाला पडलं महागात

    - नाशिकमध्ये महिलेकडे फ्रेंडशीपची मागणी करणं एका तरुणाला पडलं महागात

    - तरुणाविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    - संशयित तरुणाने दोन तीन वेळा महिलेकडे केली होती फ्रेंडशीपची मागणी

    - मुंबईनाका पोलिसांचा अधिक तपास सुरू

  • 17 Oct 2021 07:04 AM (IST)

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भेट

    नागपूर -

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भेट

    गडकरी -फडणवीस आणि प्रमुख पदाधिकारी यांच्यात भाजप च्या कोअर समितीची बैठक

    रात्री उशिरा पर्यंत चालली बैठक

    विधान परिषद , आणि महानगर पालिका निवडणूका बघता महत्वाची बैठक।

    या बैठकीत शहर आणि ग्रामीण चे प्रमुख पदाधिकारी होते सहभागी

    बैठकीत नेमकं काय ठरलं याकडे कार्यकर्त्यांच लागलं लक्ष

  • 17 Oct 2021 07:04 AM (IST)

    दादर मार्केटमध्ये लोकांची गर्दी

    दादर मार्केटमध्ये लोकांची गर्दी पहायला मिळत आहे

    आज संडेचा दिवस आहे लोकांनी भाजी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडलेले आहेत

    दादर मार्केटमध्ये अनेक जण फिरत आहे सध्याच्या बघितला तर कुठल्याही प्रकारच्या सोशल डिस्टंसिंग नाही

    भाजी मार्केटमध्ये लोकांची गर्दी आहे

  • 17 Oct 2021 06:41 AM (IST)

    नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था बघून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

    - नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था बघून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

    - रस्त्यावरील खड्डे तात्काळ न बुजवल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा

    - स्मार्ट सिटीच्या नावाखाली ही शहरातील अनेक रस्ते ठेवलेत फोडून,त्याचीही डागडुजी करा

    - अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन करू असा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी इशारा दिला आहे

  • 17 Oct 2021 06:30 AM (IST)

    अंबरनाथच्या वसत आणि जांभूळ परिसरात आढळला बिबट्याचा वावर

    अंबरनाथ :

    अंबरनाथच्या वसत आणि जांभूळ परिसरात आढळला बिबट्याचा वावर

    एका स्थानिकाने बिबट्या पाहिल्यानंतर वननिभागाने केली तपासणी

    तपासणीत बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले

    बदलापूरनंतर अंबरनाथमध्ये आढळला बिबट्याचा वावर

Published On - Oct 17,2021 6:28 AM

Follow us
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.