Maharashtra News LIVE Update | रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 20 Oct 2021 20:09 PM (IST)

  रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  मुंबई : मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. केंद्र शासनाच्या जमिनीवरील मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

 • 20 Oct 2021 19:18 PM (IST)

  संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना पत्र, पिंपरीत 500 ते 700 कोटींच्या घोटाळ्याच्या ईडी, सीबीआय चौकशीसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन

  शिवसेना नेते संजय राऊत यांचं भाजप नेते किरीट सोमय्या यांना पत्र, पिंपरीत 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाला, त्याचाही तपास करा, स्मार्ट सिटीअंतर्गत हा घोटाळा झाला, ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा, संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना पत्राद्वारे आव्हान

 • 20 Oct 2021 18:50 PM (IST)

  विद्यापीठात पुन्हा वाजणार नाटकाची तिसरी घंटा

  पुणे : जवळपास गेली दीड वर्षे बंद असणारी नाटकाची घंटा आता वाजणार आहे. यानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या वतीने ‘वाघाची गोष्ट’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे.

  मार्च २०२० पासून टाळेबंदी आणि इतर अनेक निर्बंधामुळे महाराष्ट्रभर सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांचे प्रयोग जवळजवळ ठप्प झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही एकत्र येत आपली कला सादर करता येत नव्हती. मात्र आता हे निर्बंध शिथिल केल्याने २२ आक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सावित्रीबाई फुले पुण विद्यापीठ मधील नामदेव सभागृह येथे ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रमांतर्गत ‘वाघाची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आलेला आहे.

 • 20 Oct 2021 18:30 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात एकही कोरोनाबाधित मृ्त्यूची नोंद नाही, 112 नवे रुग्ण

  पुणे :
  दिवसभरात ११२ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
  – दिवसभरात ११८ रुग्णांना डिस्चार्ज.
  – पुण्यात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००.
  -१५१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०३४६९.
  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ९८८.
  – एकूण मृत्यू -९०६७.
  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९३४१४.
  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५९८६.

 • 20 Oct 2021 18:28 PM (IST)

  कथित दोनशे कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी जॅकलीन फर्नांडीसला समन्स, तीन तासांपासून चौकशी सुरु

  नवी दिल्ली :

  गेल्या 3 तासांपासून जॅकलीनची चौकशी

  अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस ईडी कार्यालयात दाखल

  दुपारी साडेतीन वाजल्यापासून जॅकलीनकडे चौकशी

  जकलीनचा दुसऱ्यांदा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता

  कथित दोनशे कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी जॅकलीनला समन्स

  तीन वेळा समन्स दिल्यानंतर अखेर आज जॅकलीन ईडी कार्यालयात दाखल

  अजूनही जॅकलीन फर्नांडिसची कसून चौकशी सुरू

 • 20 Oct 2021 18:26 PM (IST)

  रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड

  – रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड,

  – निवडीचे पत्र रुपाली चाकणकर यांना आज मिळाले,

  – अध्यक्षपदाची जबाबदारी उद्या स्वीकारणार,

  – रुपाली चाकणकर यांची टीव्ही 9 ला माहिती

 • 20 Oct 2021 18:25 PM (IST)

  राज्य सहकारी बँक आणि जिल्हा बँक बंद करा, तिथे लुटारुंच्या टोळ्या : सदाभाऊ खोत

  सदाभाऊ खोत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  – राज्यातील राज्य सहकारी बँक आणि जिल्हा बँक बंद कराव्यात

  – या बँकांमध्ये लुटारूंच्या टोळ्या आहेत. त्यामुळे नाबार्डच्या मार्फत थेट विकास सोसायटींना पत पुरवठा करावा.

  – आर्यन खानच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका शेतकऱ्यांनी अंमली पदार्थांची शेती करावी अशी आहे

  – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळाला पाहिजे, राजू शेट्टी सरकारमध्ये सहभागी असल्याने सरकारची एसआरपी संदर्भातली भूमिका आणि त्यांची भूमिका एकच आहे का? त्यांनी स्पष्ट करावे

 • 20 Oct 2021 16:59 PM (IST)

  आर्यन खानच्या जामीन अर्जासाठी वकिलांची हाय कोर्टात धाव

  मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी हाय कोर्टात धाव घेतली आहे. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. मात्र, अर्ज दाखल केल्यानंतर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी कोर्टाचं कामकाज बरखास्तक केलंय. त्यामुळे आर्यनच्या अर्जावर उद्या सकाळी साडेनऊ वाजेनंतर युक्तीवाद होण्याची शक्यता आहे.

 • 20 Oct 2021 16:39 PM (IST)

  औरंगाबादेत दोन शेतमजूर महिलांवर दरोडेखोरांचा सामूहिक पाशवी बलात्कार

  औरंगाबाद जिल्ह्यातील तोंडोळी गावात दोन शेतमजूर महिलांवर दरोडेखोरांनी सामूहिक पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहार राज्यातून मोलमजुरी करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात आलेले हे दोन दाम्पत्य तोंडळी गावातील शेतवस्तीवर राहत होते, मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास 7 दरोडेखोरांनी हा वस्तीवर दरोडा घालत दोन महिलांवर पाशवी बलात्कार केलाय, विशेष म्हणजे यातील एक महिला ही पंधरा दिवसांनी बाळंतीण आहे तर दुसरी महिला ही 8 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन महिलांवर तब्बल सात जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर औरंगाबादसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. घटना घडून गेल्यानंतर घटनास्थळाला वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. मात्र अजूनही पोलिसांना आरोपींचा मागमूस लागलेला नाही.

 • 20 Oct 2021 16:32 PM (IST)

  जर तिसरी लाट आली तर भोगावे लागले, अजित पवारांचा इशारा

  लोणावळा (पुणे) :

  अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे :

  -विधानसभा निवडणूक झाली, अनेक दिवसांपासून मला खंत होती, काही वर्षात मावळ विधानसभा मतदारसंघात यश मिळालं नव्हतं मात्र सुनील शेळके यांना मोठं मताधिक्या देत निवडून दिलं

  -कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून महाविकास आघाडीने तोंड दिलं

  -या कार्यक्रमात पाहिलं, अनेकजण मास्क घालत नाही, खासकरून महिला वर्ग, जर तिसरी लाट आली तर भोगावे लागले

  -7500 हजार कोटी रुपयांचा आरोग्य विभागासाठी सुविधा देण्यासाठी निधी दिलाय

  -मावळमधील कार्ला येथील 25 कोटी 51 लाख रुपये खर्च करणार आहे

  -वडगांव मावळमध्ये 70 खाटाच काम सुरू करणार आहे

  -मावळमध्ये आमच्या विचाराचा आमदार द्या, तो तुम्ही दिला त्यामुळे विकासकामे सुरू झालीत

  -चित्रपट, शाळा,कॉलेज सुरू करणार आहे, मात्र काळजी घ्या, इथे तर विठ्ठलरावासह अनेकांच्या तोंडाला मास्क नाही

  -2017 मध्ये हे रुग्णालय मंजूर झालं होतं, मात्र ते रखडलं होतं, ते सुरू झालंय

  -उपजिल्हा रुग्णालयामुळे आजूबाजूच्या नागरिकांना फायदा होईल

  -लोणावळ्यात पसारी शेठच्या घरी येत होतो, ते पवार साहेबांचे मित्र होते, त्यामुळे लोणावळ्यात मी येत होतो, लोणावळ्यातील वातावरण खूप चांगलं आहे, अनेक आठवणी माझ्या लोणावळ्यात आहेत

  -1992 ते 2017 पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका माझ्या ताब्यात होती, त्यावेळी अनेक कटूता घ्यावी लागली, खासकरून जुना पुणे-मुंबई महामार्गावेळी उद्भवली

  -महाबळेश्वरमध्ये 250 कोटी काम सुरू आहेत

  -महाबळेश्वरप्रमाणे काम सुरू करू, तुमची सर्वांची साथ असेल तर लोणावळ्यात देखील सुरू करू

  -कार्ला येथील रस्ता भूमिपूजन होणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार होते, मात्र अनेक विकासकामाचे भूमिपूजन आहे म्हणून ते आले नाही, रोप वे वेळी मात्र ते येतील

 • 20 Oct 2021 15:22 PM (IST)

  एनसीबीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रयत्न, मंत्री नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

  नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  एनसीबीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रयत्न
  वानखेडेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न
  नवाब मलिक यांचा गंभीर
  काहींना जामीन मिळवून देण्याचा एनसीबी मदत करतेय, मलिकांचा दावा

  भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार महाराष्ट्रात दहशत वाजवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचे रितसर पुरावे पुढच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन देऊ

 • 20 Oct 2021 14:49 PM (IST)

  आर्यन खानचा जामीन फेटाळला

  कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आर्यनसह अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

 • 20 Oct 2021 14:48 PM (IST)

  आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला

  आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला

 • 20 Oct 2021 14:45 PM (IST)

  जरंडेश्वर कारखान्यावर अजित पवारांचा कब्जा : किरीट सोमय्या

  किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  ईडीकडे जरंडेश्वर कारखान्याबाबत तक्रार केली
  जरंडेश्वर कारखान्यावर अजित पवारांचा कब्जा
  ईडीकडे कागदपत्रे सादर केली

 • 20 Oct 2021 14:36 PM (IST)

  घरगुती गॅस सिलेंडरची काळा बाजारी उघड

  नागपूर –

  घरगुती गॅस सिलेंडरची काळा बाजारी उघड

  घरगुती सिलेंडर मधील गॅस ऑटो रिक्षा आणि कार मध्ये भरून विकल्या जायचा

  कपिल नगर पोलिसांनी धाड कारवाई करत एका घरातून 13 सिलेंडर केले जप्त

  गॅस ट्रान्स्फर करण्याचं साहित्य सुद्धा जप्त

  जास्तीचे पैसे कमविण्यासाठी केला जायचा घरात धोकादायक प्रकार

 • 20 Oct 2021 14:33 PM (IST)

  परमबीर सिंग यांच्या अटकेवरुन शाश्वती देण्यास राज्य सरकारचा नकार

  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अटकेच्या शक्यतेवरुन अस्पष्टता, अटकेवरुन शाश्वती देण्यास राज्य सरकारचा नकार, परमबीर कुठे आहेत ते माहिती नाही, ते समन्सलाही उत्तर देत नाहीत, असं राज्य सरकारने कोर्टात सांगितलं

 • 20 Oct 2021 13:22 PM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील तोंडाळी गावात दरोडेखोरांचा धुमाकूळ

  औरंगाबाद –

  औरंगाबाद जिल्ह्यातील तोंडाळी गावात दरोडेखोरांचा धुमाकूळ

  शेतवस्तीवत दरोडा टाकून दोन महिलांवर बलात्कार

  औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील तोंडळी गावातील धक्कादायक घटना

  मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकून बलात्कार

  दरोडा आणि बलात्काराच्या घटनेने औरंगाबाद जिल्हा हादरला

 • 20 Oct 2021 12:46 PM (IST)

  चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे इंधन दरवाढ विरोधी ‘लॉलीपॉप’ आंदोलन

  चंद्रपूर –

  चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे इंधन दरवाढ विरोधी ‘लॉलीपॉप’ आंदोलन

  बैलगाडी ओढून केंद्र सरकारचा केला निषेध

  महागाई कमी करण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा केला निषेध

  चंद्रपूरकर नागरिकांना रा. कॉ. कार्यकर्त्यांनी वाटले लॉलीपॉप

  आश्वासन पूर्ण न करणाऱ्या मोदी सरकारला वचनांची करुन दिली आठवण

 • 20 Oct 2021 12:13 PM (IST)

  उस्मानाबाद शहरात दोन गटात तुफान राडा

  उस्मानाबाद –

  उस्मानाबाद शहरात दोन गटात तुफान राडा

  रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोन गटात झाला राडा

  उस्मानाबाद शहरात आता तणावपूर्ण शांतता

  राडा झालेल्या विजय चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

  विजय चौकातील दुकाने आणि व्यवहार पूर्णपणे बंद

  परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची पोलिसांची माहिती

  राडा प्रकरणी 43 मुख्य आरोपींसह दीडशे जणांवर गुन्हे दाखल

 • 20 Oct 2021 11:49 AM (IST)

  चित्रपट आणि मालिकांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत नवोदित अभिनेत्रीवर पुण्यात बलात्कार

  पुणे –

  चित्रपट व मालिकांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत नवोदित अभिनेत्रीवर पुण्यात बलात्कार

  कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

  समीर बाळू निकम असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव

  आरोपी समीर निकम हा युट्युब वर शॉर्ट फिल्म बनवतो

  आरोपीने एका 31 वर्षीय महिलेला चित्रपटात काम मिळवून देतो असे आमिष दाखवत सलग दोन वर्षापासून तिच्यावर करत होता बलात्कार

  आरोपी समीर याने युट्युब वर काही शॉर्ट फिल्म आणि गाणीही बनवली

 • 20 Oct 2021 11:42 AM (IST)

  सारथी संस्थेबाहेर राज्यातील तारादूत करणार आंदोलन

  सारथी संस्थेबाहेर राज्यातील तारादूत करणार आंदोलन,

  19 जूनला पुण्यात अजित पवारांनी छत्रपती संभाजीराजेंच्या बैठकीत तारादूतांच्या नियुक्त्या देण्याचे आदेश दिले होते,

  मात्र अजित पवारांनी आदेश देऊनही सारथीनं नियुक्त्या न दिल्याने आंदोलन

  मात्र आंदोलन करू नका, पुणे पोलीसांकडून तारादूतांना नोटीसा

  सारथी संस्थेबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात,

  तारादूत सारथी संस्थेबाहेर जमायला सुरुवात,

  थोड्या वेळात आंदोलनाला होणार सुरुवात,

  बेमुदत आंदोलनाला तारादूत करणार सुरुवात

 • 20 Oct 2021 10:51 AM (IST)

  नवी दिल्ली मुंडे भगिनी गडकरी यांची भेट घेणार, सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत घेणार भेट

  नवी दिल्ली –

  नवी दिल्ली मुंडे भगिनी गडकरी यांची भेट घेणार

  सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत घेणार भेट

  पंकजा आणि प्रीतम मुंडे घेणार गडकरींची भेट

  बैठकीत पक्षांतर्गत नाराजी वर चर्चा होण्याची शक्यता

 • 20 Oct 2021 10:27 AM (IST)

  पेट्रोल-डिझेलनंतर भाजीपाल्याने गाठली शंभरी, नाशिकच्या बाजारात भाज्यांचे भाव कडाडले

  नाशिक – पेट्रोल डिझेल नंतर भाजीपाल्याने गाठली शंभरी

  नाशिकच्या बाजारात भाज्यांचे भाव कडाडले

  भाजी पाल्यांचे भाव थेट दुप्पट

  बाजारात मागणी जास्त अन आवक कमी

  गारपीट,वादळ आणि अवकाळीचा भाजीपाल्याना फटका

  दिवाळी पूर्वीच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

 • 20 Oct 2021 10:21 AM (IST)

  उस्मानाबाद दगडफेक आणि पोलिसांवर हल्ला प्रकरण, 43 प्रमुख आरोपींसह 150 जणांवर गुन्हा नोंद

  उस्मानाबाद – दगडफेक आणि पोलिसांवर हल्ला प्रकरण

  43 प्रमुख आरोपींसह 150 जणांवर गुन्हा नोंद तर 6 पोलीस जखमी

  कलम 307 सह अन्य 10 वेगवेगळ्या कलमांने गुन्हा नोंद

  उस्मानाबाद शहर पोलिसात गुन्हा नोंद, आरोपींचा शोध सुरू

 • 20 Oct 2021 09:57 AM (IST)

  मुंबईत ‘ सेक्स टुरिझम रॅकेट ‘चा धक्कादायक प्रकार उघडकीस

  मुंबईत ‘ सेक्स टुरिझम रॅकेट ‘चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  मुंबई पोलिसांमुळे देहव्यापार करणे कठीण जात असल्याने तरुणींना गोव्याला नेण्यात येत होते.

  येथून रवाना होण्याआधीच दोन महिला दलालांना गुन्हे शाखेच्या पथकाने विमानतळाजवळ अटक केली आहे.

  या दोघींच्या तावडीतून देहव्यापारासाठी नेण्यात येणाऱ्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली.

  दोन महिला दलालांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे

 • 20 Oct 2021 09:57 AM (IST)

  राज्यातील कोविड स्थिती नियंत्रणात आली असून दैनंदिन रुग्णसंख्या आता दीड हजारापर्यंत खाली घसरली आहे

  राज्यातील कोविड स्थिती नियंत्रणात आली असून दैनंदिन रुग्णसंख्या आता दीड हजारापर्यंत खाली घसरली आहे.

  गेल्या २४ तासांत राज्यात ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर २ हजार ७९१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९७.४२ टक्के एवढे आहे तर मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

 • 20 Oct 2021 09:20 AM (IST)

  दिवाळीत फटाके बंदी झाल्यास होणार कोट्यवधी रुपयांचे नुकसान

  जळगाव – दिवाळीत फटाके बंदी झाल्यास होणार कोट्यवधी रुपयांचे नुकसान

  शेकडो कुटुंबांवर कोसळणार कुऱ्हाड

  दोन तीन दिवसात याबाबत धोरण ठरविण्यात येणार असल्याची जिल्हाधिकारी यांची माहिती

 • 20 Oct 2021 09:20 AM (IST)

  पुढील शिक्षणासाठी पैसे मागितल्याच्या रागातुन पत्नीला ढकले विहिरीत

  पुणे –

  आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील उच्चशिक्षित कुटुंबातील पती पत्नीचा शिक्षणावरुन वाद

  पुढील शिक्षणासाठी पैसे मागितल्याच्या रागातुन पत्नीला ढकले विहिरीत

  स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात यश

  इस्त्रीच्या कारणावरुन वाद झाल्याचे सांगण्यासाठी दिली पत्नीला धमकी

  वनिता राठोड असे २४ वर्षीय पिडित महिलेचे नाव

  अनिल राठोड असे पतीचे नाव

  मंचर पोलिस स्टेशन मध्ये पतीच्या विरोधात गुन्हा दाखल

 • 20 Oct 2021 09:19 AM (IST)

  पुण्यातील महाविद्यालय सुरू करण्याच्या विद्यापीठाच्या सूचना

  पुण्यातील महाविद्यालय सुरू करण्याच्या विद्यापीठाच्या सूचना,

  मात्र सकाळी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नाही,

  कँम्पस परिसरात विद्यार्थ्यांची वर्दळ नाही,

  दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्येही संभ्रम आहे..

  11 नंतर विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं

  मात्र विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नाही, महाविद्यालय सुरू झाली तरी विद्यार्थी मात्र नाहीत…

  एसपी महाविद्यालयाच्या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी

 • 20 Oct 2021 09:18 AM (IST)

  नागपूर उड्डाणपूल कोसळल्याच्या घटनेची चौकशी होण्याची शक्यता

  – नागपूर उड्डाणपूल कोसळल्याच्या घटनेची चौकशी होण्याची शक्यता

  – उडानपुल बांधकामाच्या दर्जाचीही चौकशी होणार असल्याची माहिती

  – नागपूरच्या कळमना परिसरात काल रात्री कोसळला बांधकाम सुरु असलेला उडानपुल

  – उडानपुल कोसळताना आलेल्या आवाजाने परिसरात खळबळ

  – सुदैवाने जीवित हानी टळली

  – पुलाच्या पिलरपासून गर्डर वेगळे झाले आणि खाली कोसळले

 • 20 Oct 2021 08:22 AM (IST)

  पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन कडून गौरव

  पुणे

  पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन कडून गौरव,

  कोरोना काळात गणपती ट्रस्टने केलेल्या कामाचं कौतुक करत प्रशस्तीपत्र देण्यात आलंय,

  कोरोना काळात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने 14 लाख भोजन थाळ्या मोफत वाटल्या,

  10 रुग्णवाहिकांची सोय केली आरोग्य शिबीरं राबवत प्रशासनाला सहकार्य केलं,

  या कार्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आलाय….

 • 20 Oct 2021 08:19 AM (IST)

  पुणे जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढला

  पुणे

  पुणे जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढला,

  मिशन कवच कुंडल लसीकरण अभियानाची मुदत वाढवली,

  जिल्ह्यात मिशन कवच कुंडल मोहीम 31 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती

  खेड , आंबेगाव, मुळशी तालूक्यात पहिल्या डोसचं 100 टक्के लसीकरण पुर्ण,

  तर दौड, बारामती,हवेली, भोर तालुक्यात 70 टक्के लसीकरण झाल़य,

  या मिशन अंतर्गत रात्री 12 पर्यंत लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत,

  शनिवारी आणि रविवारी ही लसीकरण करून तालक्यात पहिला डोस 100 टक्के पुर्ण करण्याचं उद्दिष्ट

 • 20 Oct 2021 08:19 AM (IST)

  सोलापुरात आरोग्य विभागागाकडे  दीड लाख डोस शिल्लक

  सोलापूर –

  आरोग्य विभागागाकडे  दीड लाख डोस शिल्लक

  आज आणखीन  70 हजार  डोस आरोग्य उपसंचालका मार्फत मिळणार

  ग्रामीण भागात दहा लाख तर सोलापूर शहरातील अडीच लाख लोकांना लस देने क्रमप्राप्त

  शहरातील लसीकरणाला प्रतिसाद झाला कमी तर ग्रामीण भागात दिली जात आहे घरपोच सेवा

 • 20 Oct 2021 08:18 AM (IST)

  पुण्यात एप्रिल 2020 नंतर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1 हजाराच्या आत

  पुणे

  पुण्यात एप्रिल 2020 नंतर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1 हजाराच्या आत,

  ऍक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाल्यानं आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा,

  मार्च 2021 मध्ये पुण्यात ऍक्टीव्ह रुग्णसंख्या ही 25 हजाराच्या घरात होती…

  सध्या शहरात 996 एवढेच ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे

  आरोग्य प्रशासनावरचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी झालाय…

 • 20 Oct 2021 08:18 AM (IST)

  तब्बल 18 दिवसांनी नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा दुहेरी आकडा

  – तब्बल 18 दिवसांनी नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा दुहेरी आकडा

  – जिल्हयात गेल्या २४ तासांत १० नव्या कोरोना रुग्णांची भर

  – जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली २८ वर

  – ३९११ जणांच्या चाचण्यांमधून १० जण पॅाझीटीव्ह

  – २४ तासांत शुण्य मृत्यूची नोंद

 • 20 Oct 2021 06:53 AM (IST)

  आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील उच्चशिक्षित कुटुंबातील पती पत्नीचा शिक्षणावरुन वाद

  आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील उच्चशिक्षित कुटुंबातील पती पत्नीचा शिक्षणावरुन वाद…!

  पुढील शिक्षणासाठी पैसे मागितल्याच्या रागातुन पत्नीला ढकले विहिरीत…

  स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात यश…!

  इस्त्रीच्या कारणावरुन वाद झाल्याचे सांगण्यासाठी दिली पत्नीला धमकी…!

  वनिता राठोड असे २४ वर्षीय पिडित महिलेचे नाव

  अनिल राठोड असे पतीचे नाव

  मंचर पोलिस स्टेशन मध्ये पतीच्या विरोधात गुन्हा दाखल

 • 20 Oct 2021 06:52 AM (IST)

  मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

  मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई..

  सायन परिसरातुन जवळपास 21 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त..

  एका ड्रग्स सप्लायर महिलेला अटक, राजस्थान,प्रतापगड परिसरातून मुंबई पोलिसांची टीम गेल्यानंतर करण्यात आली कारवाई..

  सायन परिसरातून 7 किलो हेरॉईन ड्रग्स जप्त करण्यात आलं..

  अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वात घाटकोपर युनिटची कारवाई..

 • 20 Oct 2021 06:51 AM (IST)

  ठाणे जिल्ह्यात रब्बी हंगामाचे १२ हजार हेक्टर क्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न

  ठाणे

  ठाणे जिल्ह्यात रब्बी हंगामाचे १२ हजार हेक्टर क्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न

  ७४५ हेक्टरवर हरभरा लागवड;

  ४४७ क्विंटल बियाणांचा पुरवठा तालुकास्तरावर करण्यात आल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली.

  २४ ऑक्टोबरपर्यंत बियाणे वाटप सप्ताह

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI