Maharashtra News LIVE Update | मुंबईहून कोकणात जाणाऱ्या कोची स्पेशल एक्स्प्रेसचं कपलिंग तुटलं, इंजिन आणि दोन डबे पुढे गेले, उर्वरित गाडी मागे राहिली

| Updated on: Sep 11, 2021 | 11:10 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | मुंबईहून कोकणात जाणाऱ्या कोची स्पेशल एक्स्प्रेसचं कपलिंग तुटलं, इंजिन आणि दोन डबे पुढे गेले, उर्वरित गाडी मागे राहिली
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Sep 2021 08:48 PM (IST)

    मुंबईहून कोकणात जाणाऱ्या कोची स्पेशल एक्स्प्रेसचं कपलिंग तुटलं, इंजिन आणि दोन डबे पुढे गेले, उर्वरित गाडी मागे राहिली

    मुंबईहून कोकणात जाणाऱ्या कोची स्पेशल एक्स्प्रेसचं कपलिंग तुटलं

    इंजिन आणि दोन डबे पुढे गेले, उर्वरित गाडी मागे राहिली

    माणगाव स्टेशन जवळ 5 मिनिटांपूर्वी घडलेली घटना

    ट्रेनमधील प्रवाशांमध्ये खळबळ आणि घबराट

  • 11 Sep 2021 08:03 PM (IST)

    साकीनाका बलात्कार प्रकरण, मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली

     मुंबई : साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घुण बलात्कार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना असून एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे जेणे करून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी असे स्पष्ट निर्देश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ  पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. मुंबईची एक सुरक्षित शहर अशी प्रतिमा आहे आणि या एका घटनेमुळे  ती डागाळणार नाही याची काळजी घेण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

  • 11 Sep 2021 07:32 PM (IST)

    ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय धक्कादायक : विजय वडेट्टीवार

    चंद्रपूर : 

    सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक असल्याची ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, हे आरक्षण कुठल्याही स्थितीत टिकविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत, फेब्रुवारी-मार्च 2022 पर्यंत होणाऱ्या निवडणुकांसाठी एम्पिरिकल डेटा गोळा करून आरक्षण टिकवणार असल्याचा विश्वास, या निवडणुका चार महिने पुढे ढकलाव्यात अशी सर्वपक्षीय भूमिका, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे कायदाच असल्याने तो देशाला लागू झाल्याने देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याचे मत, केंद्र सरकारने केलेली जनगणना व त्याची आकडेवारी-डेटा तातडीने राज्याला द्यावी अशी मागणी, पुढील अल्पकालावधीत राज्य मागासवर्ग आयोग एम्पिरिकल डेटा गोळा करून हे आरक्षण टिकविण्यासाठी बाबत ठोस कृती करेल असा व्यक्त केला विश्वास

  • 11 Sep 2021 06:07 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 134 नवे कोरोनाबाधित, 5 जणांचा मृत्यू

    पुणे : दिवसभरात १३४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात २८७ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१. - २१५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९७९८७. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०६७. - एकूण मृत्यू -८९७३. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८६९४७. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६८७९.

  • 11 Sep 2021 06:04 PM (IST)

    ओबीसी राजकीय आरक्षणा संदर्भातील मोठी बातमी, निवडणुकांना स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

    ओबीसी राजकीय आरक्षणा संदर्भातील सर्वात मोठी बातमी, निवडणुकांना स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, निवडणुकांबाबत सर्व अधिकार निवडणूक आयोगाला

  • 11 Sep 2021 05:58 PM (IST)

    दीड दिवसाचा गणपती विसर्जन करण्यासाठी  गेलेला मजूर गेला वाहून

    सोलापूर - दीड दिवसाचा गणपती विसर्जन करण्यासाठी  गेलेला मजूर गेला वाहून

    मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील आष्टी बंधाऱ्यात मजूर वाहून गेला

    आपल्या सहकाऱ्यांसमवेत गेला होता दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी

    वडवळच्या रेल्वे स्लीपर कारखान्यात करत होता काम

    कोळेगाव येथील कोळी बांधव आणि पोलीस प्रशासन घेत आहेत शोध

  • 11 Sep 2021 05:56 PM (IST)

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा एमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा एमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा,

    राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचं वेळापत्रक पुढील आठवड्यात होणार प्रसिद्ध

    2022 चं परीक्षांच अंदाजित वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये होणार प्रसिद्ध,

    दरवर्षी डिसेंबर महिन्यात आयोगाकडून पुढील वर्षाच अंदाजित वेळापत्रक जाहीर केलं जातं

    मात्र यंदा नोव्हेंबरमध्येच वेळापत्रक जाहीर होत असल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षांचा अंदाज येणार,

    एमपीएससी आयोगानं दिली माहिती

  • 11 Sep 2021 05:41 PM (IST)

    साकीनाका बलात्काराची घटना अत्यंत दुर्देवी, यावर राजकारण नको : सुधीर मुनगुंटीवार

    चंद्रपूर -

    साकीनाका बलात्कार प्रकरणात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया :

    ही अत्यंत दुर्दैवी घटना असून यावर राजकारण नको असे मत, महिला अत्याचारासंबंधी आरोपीना पाठीशी घातले जात असून यावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन बोलविण्याची मागणी, राज्यात पोलिसांचा वापर राजकीय फायद्यासाठी होत असून राजकीय शत्रू अशा माध्यमातून संपविले जात असल्याचा आरोप, राज्यातील आया-बहिणींना राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे याची जाणीव व्हावी अशी भावना, महिला अत्याचार रोखण्यासाठी विशेष न्यायालये आणि 6 महिन्यात निकाल अशी तरतूद करण्याची मागणी

  • 11 Sep 2021 05:38 PM (IST)

    महिला सुरक्षाबाबत महत्त्वाच्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने नीलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

    पुणे -

    - महिला सुरक्षाबाबत महत्त्वाच्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने नीलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन,

    - मुंबईतील लोकल मधील महिलांना होणाऱ्या त्रासबाबत CCTV संख्या वाढविणे,

    - गस्ती वाढविणे, वारंवार घटना घडणाऱ्या ठिकाणी लाईट लावणे,

    - पॉक्सो कायद्याअंतर्गत प्रलंबित केसेस तात्काळ निकाली काढण्यासाठी फिरती फास्टट्रॅक न्यायालये,

    - शिवाय फिरती न्यायालये कार्यान्वित करण्याची नीलम गोऱ्हे यांची मागणी.

  • 11 Sep 2021 05:37 PM (IST)

    पालकमंत्री भुजबळ यांचा पूरग्रस्त दौरा वादळी

    मनमाड :

    - पालकमंत्री भुजबळ यांचा पूरग्रस्त दौरा वादळी

    - दौऱ्यांनंतर झालेल्या आढावा बैठकीत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात खडाजंगी

    - आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची

    - आढावा बैठकीत उडाला गोंधळ

    - आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर केली घोषणाबाजी

  • 11 Sep 2021 04:27 PM (IST)

    औरंगाबादमध्ये महिला अत्याचाराच्या निषेधार्थ महिला मोर्चा आक्रमक

    औरंगाबाद ब्रेकिंग :-

    महिला अत्याचाराच्या निषेधार्थ महिला मोर्चा आक्रमक

    आघाडी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन सुरू

    औरंगाबादच्या न्यू गणेश मंडळासमोर आंदोलन सुरू

    भाजपच्या महिलांची आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

  • 11 Sep 2021 03:00 PM (IST)

    अज्ञाताकडून पाझर तलाव फोडण्याचा प्रयत्न, गावकऱ्यांनी लक्ष घातल्याने मोठी दुर्घटना टळली

    बीड : अज्ञाताकडून पाझर तलाव फोडण्याचा प्रयत्न

    गावकऱ्यांनी लक्ष घातल्याने मोठी दुर्घटना टळली

    गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथील घटना

    तहसील कर्मचारी घटनास्थळी दाखल

    संतप्त गावकऱ्यांचा तहसील कर्मचाऱ्यांना घेराव

    तलाव फुटला असता तर दोन गावात पाणी शिरले असते

    अज्ञातांना शोधून गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी

  • 11 Sep 2021 12:33 PM (IST)

    मी निशब्ध झाली आहे, आता माझ्याकडे याविषयावर बोलायला शब्द नाहीये, चित्रा वाघ गहिवरल्या

    मी निशब्ध झाली आहे, आता माझ्याकडे याविषयावर बोलायला शब्द नाहीये

    ज्या पद्धतीने आणि ज्या राक्षसी पद्धतीने एका महिलेवर अत्याचार झालाय

    मी डॉक्टरांशी बोलले, तिला बघून आले, तिचे आतडे कापले गेले, तिच्या गुप्तांगामध्ये रॉड टाकले

    हे अत्याचार थांबायला हवे, आता आमचे शब्द संपले

    महाराष्ट्रातील महिलेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, हे मला सरकारला सांगायचं आहे

    गेल्या ८ दिवसांत साडे १३ वर्षांच्या मुलीवर १४ लोकांनी बलात्कार केला सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला ठाण्य़ात अधिकाऱ्याची बोटं छाटली जात आहेत

    आज अमरावतीच्या १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला, ती सात महिन्यांची गर्भवती होती, तिने गळफास घेतला

    साकीनाक्याची ही महिला मृत्यूझी झुंज देत होती

    आम्ही काहीही करु शकलेलो नाही

    आम्ही भाषणं आणि घोषणा देण्यापलिकडे काहीही करु शकलेलो नाही, ही आमची हार आहे याचं मला दु:ख आहे

  • 11 Sep 2021 12:09 PM (IST)

    निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत शिक्षिकेवर बलात्कार

    पिंपरी-चिंचवड

    -निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत शिक्षिकेवर केला बलात्कार

    -संबंधित शिक्षिकेला पैशांची आर्थिक अडचण असल्याने त्यांनी ओळखीच्या आरोपी विकास अवस्थी यांच्याकडे पैशाची मागणी केली, आरोपीने दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून पीडित महिलेला घरी बोलावून त्यांच्याकडून दोन कोऱ्या चेक वर कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या

    - पीडित महिलेला सॉफ्टड्रिंक देऊन केले दुष्कृत्य, तसेच पीडित महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून ते सर्वांना दाखवेल आणि तिची बदनामी करेल अशी धमकी दिली

    -तसेच आरोपी विकास अवस्थीने पीडित महिलेला दुचाकीवरून घेऊन चालला असताना पीडित महिलेने प्रतिकार केला असता तर तुला, तुझ्या घरच्यांना मारून टाकेल, मी सहाय्यक पोलीस आयुक्त आहे माझं कोणीही काही करू शकत नाही अशी धमकी दिली व जबरदस्तीने शारिरीक संभोग ही केला

    -सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तोतया सहाय्यक पोलीस आयुक्ताविरोधात गुन्हा दाखल

  • 11 Sep 2021 11:58 AM (IST)

    साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

    मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

    या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता

    या अमानुष अत्याचारानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे

    या महिलेची प्रकृती गंभीर होती, तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते

    मात्र तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

  • 11 Sep 2021 09:39 AM (IST)

    लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईलाच संपवलं

    कोल्हापूर -

    लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईलाच संपवलं

    कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातल्या आल्याचीवाडी इथली घटना

    लता परीट असं मृत आईच नाव

    आरोपी गुरुप्रसाद माडभगत याला पोलिसांनी केली अटक

    लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने माडभगत यांन परीट यांच्यावर केला खुरप्याने हल्ला

  • 11 Sep 2021 09:39 AM (IST)

    जळगावात महापौर यांनी हातात झाडू घेऊन केली शहराची स्वच्छता

    जळगाव -

    महापौर यांनी हातात झाडू घेऊन केली शहराची स्वच्छता

    सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत शहरात राबविले स्वच्छता अभियान

    निर्माल्य स्वच्छ करण्यासाठी राबविले अभियान

  • 11 Sep 2021 07:11 AM (IST)

    नागपूर मेट्रोत आरक्षण डावलून पदभरती घोटाळा प्रकरण

    - नागपूर मेट्रोत आरक्षण डावलून पदभरती घोटाळा प्रकरण

    - आरक्षण डावलल्याने ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार संतप्त

    - ‘बॅकलॅाग भरा अन्यथा कारवाईस तयार राहा’

    - ‘बॅकलॅाग भरला नाही तर मुख्यमंत्र्यांशी बोलून FIR दाखल करणार’

    - ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा नागपूर मेट्रोला इशारा

    - ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेणार’

    - ‘ओबीसी, एससी, एनटींना डावलून ओपनच्या जास्त जागा भरल्या’

    - ‘मंत्री असूनंही मेट्रो विरोधात मोठी भुमिका स्वीकारणार’

    - ‘मेट्रो भरती घोटाळ्याची चौकशी करणार’

  • 11 Sep 2021 06:56 AM (IST)

    नागपुरात मैदानावर वीज कोसळून दोन खेळाडूंचा मृत्यू

    - मैदानावर वीज कोसळून दोन खेळाडूंचा मृत्यू

    - नागपूर जिल्ह्यातील चकनापूर येथील घटना

    - मैदानावर खेळत असताना कोसळली वीज

    - दोन खेळाडूंचा मृत्यू, एक खेळाडू जखमी

    - मृतकांमध्ये अनुज कुशवाह आणि तन्मय दहीकर यांचा समावेश

  • 11 Sep 2021 06:56 AM (IST)

    पुण्यात आज होणाऱ्या दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी पालिकेची तयारी पूर्ण

    पुणे :

    आज होणाऱ्या दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी पालिकेची तयारी पूर्ण

    दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी शहरात १९० फिरते हौद

    तर २४७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात

    नागरिकांनी घरच्या घरी विसर्जन करावे यासाठी सुमारे १९० मेट्रीक टन अमोनिअम बायकार्बोनेटचे वितरण

  • 11 Sep 2021 06:48 AM (IST)

    नागपुरात कुत्र्यांच्या नसबंदीवर एक कोटी 62 लाख रुपये खर्च

    - नागपुरात कुत्र्यांच्या नसबंदीवर एक कोटी 62 लाख रुपये खर्च

    - सहा वर्षात एक कोटी 62 लाख खर्च करुनंही कुत्र्यांची वाढती संख्या

    - नागपुरात मोकाट श्वानांची मोठी दहशत

    - मनपाने कोट्यवधी रुपये खर्च करुनंही कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर

    - नागपुरात दीड वर्षात 3565 जणांना चावली बेवारस कुत्री

    - कुत्री दुचाकीच्या मागे धावल्याने झाले अनेक अपघात

  • 11 Sep 2021 06:43 AM (IST)

    नागपुरात लसीकरणानंतरंही पुन्हा पाच एमबीबीएसचे विद्यार्थी पॅाझीटीव्ह

    - नागपुरात लसीकरणानंतरंही पुन्हा पाच एमबीबीएसचे विद्यार्थी पॅाझीटीव्ह

    - कोरोनाबाधीत एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची संख्या पोहोचलीय १६ वर

    - गेल्या २४ तासांत नागपूर जिल्हयात ७ नव्या कोरोना रुग्णांची भर

    - नागपूर ग्रामीणमध्ये चार तर शहरात तीन नव्या कोरोना रुग्णांची भर

    - लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरंही एमबीबीएसचे विद्यार्थी येत आहेत कोरोना पॅाझीटीव्ह

Published On - Sep 11,2021 6:42 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.