Maharashtra News LIVE Update | सोनू सूदच्या घरी इन्कम टॅक्सची धाड, सलग 14 तासांपासून चौकशी सुरु

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | सोनू सूदच्या घरी इन्कम टॅक्सची धाड, सलग 14 तासांपासून चौकशी सुरु
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 15 Sep 2021 20:53 PM (IST)

  सोनू सूदच्या घरी इन्कम टॅक्सची धाड, सलग 14 तासांपासून चौकशी सुरु

  सिनेअभिनेता सोनू सूद याचे घर, हॉटेल आणि संबंधित सहा ठिकाणी पहाटे सहा वाजेपासून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची रेड सुरू आहे. तब्बल 14 तास होत आले अजूनही ही रेड सुरू आहे. पहाटे सहा वाजेच्या दरम्यान बारा अधिकाऱ्यांचे पथक त्याच्या घरी दाखल झाले आहे. पथक घरी आल्यावर त्यांनी तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांचे आणि कुटुंबाचे संपर्क बंद केले आहेत आणि कसून चौकशी सुरू आहे.

 • 15 Sep 2021 19:37 PM (IST)

  अध्यादेश काढण्याचा सरकारचा निर्णय योग्य- देवेंद्र फडणीस

  सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय उशिराने घेतला असला तरी योग्य आहे. मात्र एवढा निर्णय घेऊन हा प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी राज्य मगासवर्ग आयोगाकडून एक रिपोर्ट घ्यावा लागेल. ज्यामुळे सुप्रिम कोर्टाची ट्रिपल टेस्ट आपण पास करु शकू.

 • 15 Sep 2021 19:36 PM (IST)

  ओबीसी आरक्षणासाठी सरकारने अध्यादेश आधीच काढायला हवा होता : देवेंद्र फडणवीस

  सरकारने अध्यादेश आधीच काढायला हवा होता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

  देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

  उशिरा घेतलेला असला तरी योग्य निर्णय
  राज्य मागासवर्ग आयोगाकडून एक रिपोर्ट घ्यावा लागेल जेणेकरुन सुप्रीम कोर्टानं सांगितलेली ट्रिपल टेस्ट पूर्ण करु शकतो
  ही टेस्ट जरी सरकारनं करुन घेतली तर यातून मार्ग निघू शकतो

  आयोगाला तत्काळ निधी दिला पाहिजे. जेणेकरुन आयोग दोन महिन्यात इम्पिरिकेल डेटा गोळा करण्यास मदत होईल.

  राज्य सरकारनं अध्यादेश काढल्याने दोन टेस्ट पूर्ण होतील, एक टेस्ट यानंतरही शिल्लक राहील,

  त्यासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाकडून अंतरिम अहवाल तयार करून घेतला पाहिजे मग तिसरी टेस्ट पूर्ण होईल आणि मग कुणिही न्यायालयात आव्हान देऊ शकणार नाही,

  सरकारने हे आधीच करायला पाहिजे होतं,

  13-12-19 ला हे केलं असतं तर आरक्षण गेलंच नसतं,

  सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, योग्य निर्णय आहे,

  मात्र यानंतरही पोटनिवडणुका होत असलेल्या पाच जिल्ह्यात ओबीसींची एकही जागा राहणार नाही, इतर तीन चार जिल्ह्यात समस्या येतील, त्या सोडवाव्या लागतील,

  भविष्यात कशा प्रकारे आरक्षण टिकवता येईल याचा विचार केला पाहिजे,

  हे प्रश्न नेहमीसाठी सोडवायचे असेल तर राज्य मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल घेऊन सर्वोच्च न्यायालयाची ट्रिपल टेस्ट ची अट पूर्ण केली पाहिजे

 • 15 Sep 2021 19:25 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 199 नवे कोरोनाबाधित

  पुणे :
  दिवसभरात १९९ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
  – दिवसभरात २२५ रुग्णांना डिस्चार्ज.
  – पुण्यात करोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०५.
  – १८८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९८६६७.
  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १८५८.
  – एकूण मृत्यू -८९८६.
  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८७८२३.
  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७९७३.

 • 15 Sep 2021 19:23 PM (IST)

  पुणे-सोलापूर महामार्गावर गॅसचा टँकर पलटी, संबंधित परिसर सील, इंदापूर शहराकडे येणारी वाहतूक थांबविली

  इंदापूर :

  पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर शहराजवळ गॅसचा टँकर पलटी
  घटनास्थळी दोन अग्निशमन दलाच्या गाड्या व रूग्णवाहिका दाखल
  पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल
  पोलिसांकडून संबंधित परिसर सील करण्याचे काम सुरू
  इंदापूर शहराकडे येणारी वाहतूक थांबविली

 • 15 Sep 2021 17:56 PM (IST)

  तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणाला 3 हजार कोटींची कायम स्वरूपी उपाययोजना, राज्य सरकारचा मोठा निर्णय

  मंत्रीमंडल बैठक निर्णय :

  तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणाला 3 हजार कोटींची कायम स्वरूपी उपाय योजना खर्च करणार

  पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड धूप प्रतिबंधक बंधारा, शेल्टर हाऊस,

  वीज पुरवठा अंडर ग्राउंड केबलिंग

 • 15 Sep 2021 17:51 PM (IST)

  ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार काढणार अध्यादेश, राज्याच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्तावाला मंजुरी

  ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार काढणार अध्यादेश, राज्याच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्तावाला मंजुरी, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

  छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

  ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत

  सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक जाहीर झाल्या आहेत

  काही प्रमाणात ओबीसी जागा कमी होतील

  ५० टक्केच्यावर आम्ही आरक्षण होऊ देणार नाही

  आंध्रप्रदेश तेलंगणा प्रमाणे अध्यादेश काढला आहे आणि ५० टक्के मर्यादा ठेबली त्या प्रमाणे राज्यात आपण अध्यादेश काढणार आहोत

  १० ते १२ टक्के जागा कमी होतील मात्र इतर ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत

   

 • 15 Sep 2021 17:01 PM (IST)

  उत्तर प्रदेशातून आणखी 3 अतिरेक्यांना अटक, दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला

  उत्तर प्रदेशातून आणखी 3 दहशतवाद्यांना अटक, दोघांना रायबरेली तर एकाला प्रयागराजमधून अटक, दोन दिवसात 9 दहशतवाद्यांना अटक, दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला

 • 15 Sep 2021 16:54 PM (IST)

  भाजपमध्ये दिग्गज महिला कलाकार, त्यांच्याबद्दलही असंच बोलणार का ? बाबासाहेब पाटलांचा दरेकरांना सवाल

  मुंबई : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या एका विधानामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. “राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे”, असं विधान प्रवीण दरेकर यांनी केलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून संतप्तजनक प्रतिक्रिया येत असताना नुकतंच राष्ट्रवादी सांस्कृतिक चे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनीही भाजपवर टीका केली आहे. “भाजपमध्येही अनेक दिग्गज कलाकार आहेत. हेमा मालिनी, स्मृती इराणी, अमृता फडणवीस, मग या सर्व महिलांबद्दलही तुम्ही असचं बोलणार आहात का?” असा संतापजनक सवाल राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी केला आहे.

 • 15 Sep 2021 16:43 PM (IST)

  सोनू सूदच्या कार्यालयावर छापा टाकला नाही, आयकर विभागाचे स्पष्टीकरण

  अभिनेता सोनू सूदच्या कार्यालयावर छापा टाकला नाही, फक्त कार्यालयाची पाहणी, आयकर विभागाने सर्व्हे केल्याची माहिती

 • 15 Sep 2021 16:29 PM (IST)

  सुरेखा पुणेकरांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, प्रविण दरेकरांना माफी मागण्याचा इशारा

  पुणे :

  सुरेखा पुणेकरांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश,

  राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नव्हे तर महिलांचा आदर करणारा पक्ष,  म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतीये

  प्रवीण दरेकरांना महिलांचा सन्मान करता येत नसेल तर करू नका मात्र अवहेलना करण्याचा अधिकार दिला कोणी?

  प्रवीण दरेकरांनी माफी मागावी त्याशिवाय महिला शांत बसणार नाहीत

  मी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती

  कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात आले, चित्रपटातले लोक राजकारणात जातात लावणीतले जाऊ शकत नाहीत का ?

  पक्ष प्रवेश झाला की अध्यक्ष शरद पवारांना भेटणार

  सुरेखा पुणेकरांची पक्ष प्रवेशावर स्पष्टीकरण

 • 15 Sep 2021 15:57 PM (IST)

  बार्शी आमदार राजेंद्र राऊत आणि पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यात वाद, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  सोलापूर :

  बार्शी आमदार राजेंद्र राऊत आणि पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यात वादावादी

  वादाचा व्हिडिओ व्हायरल

  गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा करण्यावरून वाद

  गणेश मंडळाच्या मंडपात चार जणांना परवानगी असताना मंडपात गर्दी झाल्यामुळे पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि आमदार यांच्यात वाद झाल्याची माहिती

 • 15 Sep 2021 08:14 AM (IST)

  राज्य सरकारने मागणीपत्र पाठवलं तरचं एमपीएससी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करणार

  राज्य सरकारने मागणीपत्र पाठवलं तरचं एमपीएससी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करणार,

  एमपीएससी आयोगानं दिली माहिती

  राज्य सरकारची जबाबदारी वाढली, रिक्त पदांसाठी राज्य सरकारने अजून एमपीएससीला मागणीपत्र दिलं नाही,

  राज्य सरकार भरती करायला चालढकल करतंय एमपीएससी विद्यार्थ्यांचा आरोप,

  मात्र एमपीएससी आयोगानं आता चेंडू सरकारच्या कोर्टात टाकलाय,

  राज्य सरकारने लवकर मागणीपत्र आयोगाला दिलं नाही तर मग मात्र विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जा सरकारला इशारा,

  मात्र गेल्या वर्षभरात सरकारकडून एमपीएससीला एकही मागणीपत्र गेलं नाही…

  2021 चं वेळापत्रक कसं जाहीर करणार ? विद्यार्थ्यांचा सवाल ….

 • 15 Sep 2021 08:07 AM (IST)

  नवी मुंबई मध्ये मतदार यादीचा घोळ कायम

  नवी मुंबई मध्ये मतदार यादीचा घोळ कायम

  स्थळ पाहणी केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये

  महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेने केली विनंती

  आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेत दिले निवेदन

 • 15 Sep 2021 07:45 AM (IST)

  नाथबाबा उर्फ विशाल वाघमारे हाच मनोहर मामाच्या सर्व व्यवहारातील प्रमुख सूत्रधार असल्याचा संशय

  सोलापूर– नाथबाबा उर्फ विशाल वाघमारे हाच मनोहर मामाच्या सर्व व्यवहारातील प्रमुख सूत्रधार असल्याचा संशय

  विशाल वाघमारे आणि त्याचा एक अन्य साथीदार अद्यापही फरार

  फरार साथीदारांचा  पोलिसांकडून शोध सुरू

  मनोहर मामा भोसले आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी ताब्यात घेणे, फिर्यादी कडून कळले अडीच लाख रुपये हस्तगत करणे अद्यापही बाकी

  राजकीय नेत्यासोबतचे फोटो व्हायरल करून मनोहरमामा भोसले  आणि त्याचे दोन साथीदार करत होते भक्तांची फसवणूक

  मनोहर भोसले पोलीस कोठडीत असला तरी विशाल वाघमारे हाच मनोहर मामा च्या सर्व व्यवहारातील प्रमुख तर सूत्रधार

 • 15 Sep 2021 07:03 AM (IST)

  नागपुरात परवानगी नसतानाही नर्सरी स्कुल सुरु

  – नागपुरात परवानगी नसतानाही नर्सरी स्कुल सुरु

  – अंब्रेला नर्सिंग स्कुलने धोक्यात घातला लहान मुलांचा जीव

  – महानगरपालिकेच्या तपासनीत आढळली १२० मुलं

  – कामठी रोडवरील कडबी चौकात सुरु होतं नर्सरी स्कुल

  – नागपूर महानगरपालिकेने ठोठावला १५ हजारांचा दंड

  – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना नर्सरी स्कुल सुरु

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI