AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget 2026-27 : किती लाखापर्यंतची काम निविदेशिवाय मिळणार, स्टार्टअप्ससाठी काय महत्वाची घोषणा?

Maharashtra Budget 2026-27 : "या संस्थेच्या माध्यमातून आपल्या तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा कौशल्य, आर्थिक मार्गदर्शन केलं जाईल. समुपदेशन सेवेचा विस्तार 36 नवदिशा केंद्र स्थापन करण्यात येईल" अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Maharashtra Budget 2026-27 : किती लाखापर्यंतची काम निविदेशिवाय मिळणार, स्टार्टअप्ससाठी काय महत्वाची घोषणा?
CM Fadnavis
| Updated on: Mar 06, 2026 | 3:35 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2026-27 वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज मांडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली. त्यात स्टार्टअप्ससाठी केलेल्या काही घोषणा महत्वाच्या आहेत, त्या जाणून घ्या. “जागतिक बँकेच्या सहकार्याने आपण दक्ष महत्वाकांक्षी प्रकल्प राबवतोय. त्यासाठी महिमा महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड अॅडव्हान्समेंट संस्थेची स्थापना केली जाईल. या संस्थेच्या माध्यमातून आपल्या तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा कौशल्य, आर्थिक मार्गदर्शन केलं जाईल. समुपदेशन सेवेचा विस्तार 36 नवदिशा केंद्र स्थापन करण्यात येईल” अशा घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“मला सांगताना अभिमान वाटतोय केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र देशाचा स्टार्ट अप कॅपिटल ठरला आहे. युनिकॉनच्या संख्येत आपलं राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याला जागतिक केंद्र बनवण्यासाठी नवीन स्टार्टअप नावीन्य धोरण 2025 जाहीर केलय. पुढच्या पाचवर्षात 1 लाख 25 हजार उद्योजक घडवणं, 50 हजार स्टार्टअप्सना बळ देणं हा उद्देश आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

किती लाखापर्यंतची काम निविदेशिवाय दिली जाणार?

“तळागाळातील नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्योजक महाफंड स्थापन करत आहोत. त्यातून निवडक स्टार्टअप्सना थेट आर्थिक मदत दिली जाईल. या उपक्रमातंर्गत 50 सर्वोत्तम स्टार्टअप्सची निवड केली जाईल. त्यांचे नावीन्यपूर्ण प्रकल्प शासन विभागात राबवण्यासाठी 25 लाख रुपयापर्यंतची काम निविदेशिवाय थेट दिली जातील” असं मुख्यमंत्री म्हणाले.

बिरसा योजना काय?

“चर्मकार डिझाइन उत्पादन केंद्र वांद्रे येथे स्थापित करण्याचे प्रस्तावित आहे. नवीन उद्योजक केंद्र, सर्व सुविधांसह बांधण्याचा प्रस्ताव आदिवासी जमातीतील युवकांना नावीन्यतेच्या आधारावर उद्योजक बनवण्यासाठी भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्ट फॉर आत्मनिर्भरता बिरसा ही योजना राबवणार आहोत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.

Follow Us
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय