AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता रस्त्यांचा कायापालट होणार, उभे केले 8500 कोटी; मंत्रिमंडळ बैठकीत धडाधड 3 सर्वात मोठे निर्णय!

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील रस्त्यांचा कायापालट व्हावा तसेच रस्ते बांधणीला वेग यावा, यासाठीही सरकारने दोन मोठे निर्णय घेतलेले आहेत.

आता रस्त्यांचा कायापालट होणार, उभे केले 8500 कोटी; मंत्रिमंडळ बैठकीत धडाधड 3 सर्वात मोठे निर्णय!
maharashtra cabinet meeting decision todayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2026 | 2:56 PM
Share

Maharashtra Cabinet Meeting Decision Today : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज (2 जून) पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरही या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील रस्त्यांचा कायापालट व्हावा तसेच रस्ते बांधणीला वेग यावा, यासाठीही सरकारने दोन मोठे निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयामुळे आता रस्त्यांच्या बांधणीकरीता हजारो कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकत घेण्यात आलेले हे निर्णय कोणते आहेत, ते जाणून घेऊ या..

राज्यमंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय कोणते?

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य निधीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे.

८ हजार ७०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार

तसेच, रस्त्यांच्या सुधारणेसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँके व न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय मिळालेले असून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला दोन्ही बँकाकडून प्रत्येकी ८ हजार ७०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. या अर्थसहाय्याामुळे राज्यातील रस्ते सुधारणा व विकासाला आणखी गती मिळणार आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत केले जात आहे.

सहा महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय

हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये सहा महाविद्यालयांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. यामध्ये प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, मुंबई, किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, मुंबई,  श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई, ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्ल असोमुल्ल विज्ञान महाविद्यालय, मुंबई व थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई यांचा घटक महाविद्यालये म्हणून समावेश होणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्याची शिक्षण तसेच रस्ते विकासात मोठी प्रगती होणार आहे. लवकरच राज्यात या निर्णयांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

महामंडलात अधिकाऱ्यांची केली जाणार नेमणूक

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत परशुराम अर्थिक महामंडळ, लिंगायत समाजासाठी असे एकूण चार महामंडळातील अधिकारी भरण्याच्या संदर्भात आज निर्णय झाला आहे. त्यासाठी ⁠५० कोटी रुपये निधी दिला जाणार आहे.

रस्त्यांचा विकास कसा होणार?

1) राज्य सरकार ग्रामविकास खाते आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत येणाऱ्या विकासकामांसाठी कर्ज घेण्यात येणार येणार आहे.

2) ग्रामविकास खात्यासाठी ४ हजार २२९ कोटी रुपये तर सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी १ हजार दशलक्ष डॉलर इतके कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

3) राज्यातील ३ हजार ५०० किमी रस्त्यांची कामे करण्यात येणार यात राज्य सरकारचा १९२९ कोटी रुपयांचा हिस्सा असेल.

4) सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत १ हजार दशलक्ष अमेरिकन डॉलर कर्ज २ टप्प्यात घेण्यात येणार आहे.

5) एशियन इन्फ्रास्ट्रकचर इन्व्हेसमेंट बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेण्यात येणार आहे.

Follow Us
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध