Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी अपडेट…5 डिसेंबर रोजी फक्त एवढ्याच लोकांचा शपथविधी, बाकीच्यांचे काय?; काय घडतंय महायुतीत?

महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित नवीन सरकारचा शपथविधी सोहळ्याची तारीख नक्की झालेली आहे. गुरुवारी ५ तारखेला आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी घेतला आहे.

सर्वात मोठी अपडेट...5 डिसेंबर रोजी फक्त एवढ्याच लोकांचा शपथविधी, बाकीच्यांचे काय?; काय घडतंय महायुतीत?
devendra fadnavis, eknath shinde and ajit pawar
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 2:34 PM

महाराष्ट्रात महायुतीला मोठे बहुमत मिळून देखील दहा दिवस झाले तरी सरकार स्थापन झालेले नाही. आता अखेर महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळ्याची तारीख निश्चित झालेली आहे. गुरुवार ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात समारंभ होणार आहे.सीएम आणि दोन डेप्युटी सीएम शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी खास या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या आधी भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. भाजपाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात पाठविले आहे.यांच्या उपस्थिती भाजपच्या विधीमंडळ पक्ष नेत्याची निवड होणार आहे. त्यानंतर हे नावाची माहिती पक्षश्रेष्टींना दिली जाणार आहे. त्यानंतरच मुख्यमंत्र्‍यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

या आधी मुंबईत महायुतीच्या तीन्ही घटक पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी मिटींग घेतली जाणार आहे. नव्या मुख्यमंत्र्‍यांच्या नावापासून ते मंत्रिमंडळातील सदस्यांच्या नावावर या बैठकीत सहमती घेतली जाणार आहे. परंतू एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती बरी नसल्याने त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल केलेले आहे. त्यामुळे बैठका पुढे ढकल्यात येत आहेत. शिंदे यांच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात येत आहे. त्यांना ताप आल्याने कमजोरी आली आहे. तसेच पांढऱ्या पेशींची संख्या देखील वाढलेली आहे. त्यांना घशाचा संसर्ग देखील झालेला आहे.

हे सुद्धा वाचा

रुसवा कसा दूर करणार ?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरुन महायुतीत एकनाश शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरुन स्पर्धा सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र पद पुन्हा मिळावे अशी इच्छा एकनाथ शिंदे यांची आहे. परंतू भाजपाच्या पक्षश्रेष्टींना त्यासाठी साफ नकार देत मुख्यमंत्री यंदा भाजपाचा होणार असा फैसला सुनावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात गृहमंत्रीपद किंवा इतर मोठे पद मिळावे अशी एकनाथ शिंदे यांची मागणी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा रुसवा आता भाजपा पक्ष श्रेष्टी कसा काढतात याकडे सर्व लक्ष लागले आहे.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.