AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका वाढला, आज एवढ्या रुग्णांची नोंद

देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे, आज महाराष्ट्रात 65 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा धोका वाढला, आज एवढ्या रुग्णांची नोंद
corona
| Updated on: Jun 01, 2025 | 9:32 PM
Share

देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे,  गेल्या  आठवडाभरात देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 3000 च्या वर पोहचला आहे. केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या 3,395 वर पोहोचली आहे, यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल 1336 रुग्णांची नोंद एकट्या केरळमध्ये झाली आहे. केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये केरळ एक नंबरला, महाराष्ट्र दोन नंबरला तर दिल्लीचा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

महाराष्ट्रात काय स्थिती? 

महाराष्ट्रात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं चित्र आहे. आज राज्यात 65 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये पुण्यात 25, मुंबईमध्ये 22, ठाण्यात 9 तर पिंपरी चिंचवडमध्ये 6 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 506 वर पोहोचला आहे.

राज्यात 1 जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत एकूण 11501 एवढ्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 814 जण  कोरोनाबाधित आढळून आले, त्यातील आता 300 पेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर सध्या स्थितीमध्ये राज्यात एकूण 506 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

ठाण्यातही धोका वाढला 

दरम्यान ठाण्यात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज ठाण्यामध्ये 9 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता हा आकडा 108 वर पोहोचला आहे, यापैकी 59 कोरोना रुग्णांचे पाच दिवसांचे गृह विलगीकरण पूर्ण झाले आहे. तर 16 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.  तर सध्या स्थितीमध्ये 32 जण गृह विलगीकरणात आहेत.

आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

दरम्यान देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आला आहे. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य आणि आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्र कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले. सरकार कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.