AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Update : ‘या’ देशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक

जे आंतरराष्ट्रीय प्रवासी यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या देशांमधून अथवा या देशांमार्गे हवाई प्रवास करुन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतील, त्या सर्व प्रवाशांना विमानतळावर आगमनानंतर स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे.

Maharashtra Corona Update : 'या' देशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 5:51 PM
Share

मुंबई : कोविड-१९ विषाणूचे नवीन आणि वेगाने फैलावणारे प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने, भारतात येणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार, जे आंतरराष्ट्रीय प्रवासी यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या देशांमधून अथवा या देशांमार्गे हवाई प्रवास करुन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतील, त्या सर्व प्रवाशांना विमानतळावर आगमनानंतर स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे. 3 सप्टेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून हा नियम लागू राहणार आहे. (RTPCR test mandatory for passengers arriving at Mumbai Airport)

सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, हवाई प्रवास करुन येणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची (institutional quarantine) तरतूद रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून खालील नमूद केल्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना

1. यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या सर्व देशांमधून अथवा या देशांमार्गे हवाई प्रवास करुन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतील, त्या सर्व प्रवाशांना मुंबई विमानतळावर आगमनानंतर स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे. 3 सप्टेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून हा नियम लागू राहणार आहे.

2. चाचणीच्या अनुषंगाने, याआधीच्या परिपत्रकांनुसार अपवाद करण्यात आलेले सर्व निर्णय आता रद्दबादल करण्यात येत आहेत. (जसे की, पूर्ण / दोन्ही कोविड डोस झालेले प्रवासी, 65 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक इत्यादी)

3. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणारे. तसंच आगमन होवून पुढे जाण्यासाठी दुसरे विमान निवडलेले इतर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवासी (यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे वगळता) यांना मागील 72 तासांमधील निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करणे आवश्यक असेल. त्यानंतर ते विमानतळ सोडू शकतात. असा निगेटिव्ह चाचणी अहवाल सादर करणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक नसेल. ही तरतूद देखील 3 सप्टेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून लागू राहणार आहे.

4. सर्व प्रवाशांनी विहित नमुन्यातील स्वयंघोषणा-पत्र (self-declaration form) तसेच हमीपत्र (undertaking) भरुन मुंबई विमानतळावर नियुक्त संबंधित अधिकाऱयांकडे देणे आवश्यक असेल आणि या प्रवाशांना 14 दिवस गृह विलगीकरणात (home quarantine) राहणे बंधनकारक असेल.

प्रतितास सुमारे 600 प्रवाशांची चाचणी

वरील सर्व मार्गदर्शक सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी यासाठी, मुंबई विमानतळाचे संचालन करणाऱया यंत्रणेकडून, प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार, म्हणजे 3 सप्टेंबर 2021 रोजी लागू असलेले प्रति चाचणी रुपये 600 रुपये याप्रमाणे चाचणीसाठीचे शुल्क आकारण्यात येईल. चाचण्या वेगाने करणे शक्य व्हावे म्हणून प्रतितास सुमारे 600 प्रवाशांची चाचणी करता येईल, इतक्या क्षमतेची व्यवस्था करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

किरीट सोमय्या यांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप, आता भुजबळांचं प्रत्युत्तर

ठाकरेंचा उमेदवार, मात्र हातावर ‘देवेन्द्र’चा टॅटू, आता फडणवीस म्हणतात, हृदयात फक्त प्राची वहिनींना ठेवा!

RTPCR test mandatory for passengers arriving at Mumbai Airport

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...