CCTV VIDEO | चौकात भरधाव बाईक चालवणं अंगलट, दुचाकीस्वारांची भीषण धडक, एक जण गंभीर

CCTV VIDEO | चौकात भरधाव बाईक चालवणं अंगलट, दुचाकीस्वारांची भीषण धडक, एक जण गंभीर
वसईत दोन बाईकस्वारांची धडक

वसईतील चौकात बाईकस्वारांची एकमेकांना धडक बसली. सुदैवाने अन्य एका दुचाकीवर बसलेली युवती वेळीच थांबल्याने अपघातातून बचावली. मात्र दुचाकीवरील दोघं जण जखमी झाले

विजय गायकवाड

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 15, 2021 | 10:23 AM

वसई : मुंबईजवळच्या वसई भागात दोन बाईकस्वारांचा भीषण अपघात (Vasai Bike Accident) झाला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. चौकात वेगाने बाईक चालवणं दोघाही चालकांच्या अंगलट आलं. अपघाताचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

वसई गाव परिसरातील सांडोर-अॅक्टन, ताली वाडी रोडवर गुणा नाका या ठिकाणी हा अपघात झाला. मंगळवारी दुपारी 4 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास बाईकस्वारांची एकमेकांना धडक बसली. सुदैवाने अन्य एका दुचाकीवर बसलेली युवती वेळीच थांबल्याने अपघातातून बचावली.

चौकात अपघात वाढले

गुणानाका परिसरात गावातील चार रस्ते एका ठिकाणी मिळतात. चारही बाजूने भरधाव वेगात येणारी वाहनं तात्काळ लक्षात येत नसल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

स्थानिक नागरिकांनी पालिका, ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रारी करूनही दाखल घेतल्या जात नसल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

अनैतिक संबंधातून महिलेकडून प्रियकराचीच हत्या!, लातूरमधील धक्कादायक घटना

वृद्धेच्या गळ्यावर चाकू ठेवून हिरेजडीत दागिने लुटले; 3 कोऱ्या चेकवर सह्याही घेतल्या

काय चाललंय हे? वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्याच गळ्यात टाकली दोर, औरंगबादेत दोघे अटकेत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें